पुन्हा एक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नगदी २४,७५,००० रोख जप्त.

Mahawani


बल्लारपूर मार्गाने चंद्रपूरच्या दिशेने एक दुचाकीस्वार काळया रंगाच्या बॅगमध्ये मोठया प्रमाणात नगदी रोकड


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०८ मार्च २४

चंद्रपूर/बल्लारपूर : ०७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार बल्लारपूर मार्गाने चंद्रपूरच्या दिशेने एक दुचाकीस्वार काळया रंगाच्या बॅगमध्ये मोठया प्रमाणात नगदी रोकड घेवून येणार असल्याची खात्रीशीर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. महेश कोंडावार P. I Mahesh Kondawar यांनी स.पो.नि. हर्षल एकरे a. p. i Harshal yekre, पो. उपनि विनोद भुरले S. I Vinod Bhurle, पो. हवा. संजय आतकुलवार, ना. पो. कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे याचे पथक कारवाई करीता नेमून यांना आदेशीत केले.

        सदर पथक मिळालेल्या माहिती प्रमाणे बल्लारपूर मार्गावर विसापूर टोलनाक्या समोरील वळणार साफळा रचला असता माहिती प्रमाणे दुचाकीस्वार एक इसम पाठीवर बॅग लटकवून येतांना दिसता दुचाकीस्वाराला थांबवून त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने नाव ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे Dnyaneshwar Ramesh Chandbatwe (34) रा. सदभावना नगर, नागपूर असे सांगीतले. 

            त्यास थांबविण्याचे कारण सांगून ओळखपत्र दाखवत पोलीस असल्याची ओळख देवून त्याचे जवळील काळया रंगाची कॉलेज बॅगची पंचासमक्ष झडती घेतली असता बॅगमध्ये नोटाचे बंडल आढळून आले. ते पंचासमक्ष बॅगमधुन बाहेर काढून पाहणी केली असता 1) 22,26,000/- रू. ज्यात 500/- रू. च्या 4652 नोटा 2) 1,49,000/-रू. ज्यात 200/-रू.च्या 745 नोटा असा एकूण 24,75,000/- रू नगदी रक्कम मिळून आली. 

          इतक्या मोठया प्रमाणात नगदी रोकड मिळून आल्याने सदर रोकड त्याने चोरी किंवा अवैध्य मार्गाने प्राप्त केली असावी असा पोलिसांचा संशय असल्याने कलम 41(1)(ड) दं.प्र. सं. अन्वये सदर रोकड ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली असून समोरील तपास करीत आहे. 

            सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन Superintendent of Police Shri. Mummaka Sudarshan, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु Additional Superintendent of Police Rina Janbandhu यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि. हर्षल एकरे, पो.उपनि. विनोद भुरले, पो. हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे मदतीने केली असुन सदर रोकड बाबतचा तपास पोउपनि विनोद भुरले, स्था.गु.शा. चंद्रपूर हे करीत आहे. #mahawani #ballarpur #chandrapur #chandrapurpolice #lcb @LCBchandrapur

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top