WCL Mine Accident | गोवरी डीप माईन दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणाने घेतले गंभीर वळण

Mahawani
0

Workers and villagers stage a protest outside a WCL Ballarpur Area office after the death of contract worker Prakash Mohare in the Govari Deep Mine accident, demanding accountability, safety reforms, and action against responsible officials.

सुरक्षा नियमांची पायमल्ली की अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा?; कंत्राटी कामगाराच्या मृत्यूनंतर जबाबदारांवर कारवाईची मागणी तीव्र

WCL Mine Accident | राजुरा | वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी-साखरी उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी डीप माईनमध्ये विद्युत वाहिनीच्या लोखंडी खांबावर काम करताना झालेल्या भीषण दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगार प्रकाश मोहारे Prakash Mohare यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ७ जून २०२६ रोजी घडलेल्या या दुर्घटनेनंतर नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचार सुरू असताना १३ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र या अत्यंत गंभीर घटनेनंतरही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

WCL Mine Accident

मिळालेल्या माहितीनुसार, पोवनी-साखरी उपक्षेत्रातील गोवरी डीप माईनमध्ये विद्युत वाहिनी उभारणीचे काम पी. आर. इलेक्ट्रिकल कंपनी, चंद्रपूरमार्फत करण्यात येत होते. या कामाचे कंत्राट प्रशिक रोहनकर यांच्या कंपनीकडे देण्यात आले होते. दुर्घटनेच्या दिवशी प्रकाश मोहारे हे लोखंडी विद्युत खांबावर काम करीत असताना अचानक संपूर्ण खांब कोसळला आणि ते मोठ्या उंचीवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली होती.

WCL Mine Accident

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा खांब उभारण्यात आला होता तेथे माती सैल स्वरूपाची होती. अशा परिस्थितीत खांब योग्य खोलीपर्यंत गाडून त्यास काँक्रीटचा मजबूत आधार देणे आवश्यक होते. मात्र संबंधित कामात केवळ सुमारे दोन फूट खोलीपर्यंतच खांब बसविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आवश्यक काँक्रीटिंग न केल्याने खांबाला पुरेसा आधार मिळाला नाही आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

WCL Mine Accident

विशेष म्हणजे, कोणतेही तांत्रिक काम सुरक्षा नियम, मान्यताप्राप्त अंदाजपत्रक व खाण सुरक्षा कायद्यांनुसार होत आहे की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अभियंते, पर्यवेक्षक अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची असते. मात्र या प्रकरणात सुरक्षा मानकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप श्रमिक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. खाण क्षेत्रातील सुरक्षा नियमांचे उल्लंघन, कामाच्या दर्जाबाबतची निष्काळजीपणा आणि कथित भ्रष्टाचार यामुळेच एका गरीब कंत्राटी कामगाराला जीव गमवावा लागल्याची भावना व्यक्त होत आहे.

WCL Mine Accident

प्रकाश मोहारे यांच्या मृत्यूनंतर कंत्राटी कामगार संघटना, गावकरी आणि नातेवाईकांनी मृतदेहासह वेकोली बल्लारपूर क्षेत्रीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे प्रशासन आणि कंपनीवर मोठा दबाव निर्माण झाला. अखेर मृताच्या कुटुंबीयांना ३५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

WCL Mine Accident

दरम्यान, या प्रकरणाची नोंद नागपूर येथे संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी, अभियंते किंवा पर्यवेक्षकांवर अद्याप कोणतीही शिस्तभंगात्मक अथवा फौजदारी कारवाई झालेली नसल्याने संताप वाढत आहे. कामाच्या दर्जावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून निष्काळजीपणामुळे वेकोलीलाच तब्बल ३५ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची चर्चा सुरू आहे.

WCL Mine Accident

या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृतकाचे कुटुंबीय, कंत्राटी कामगार आणि श्रमिक संघटनांकडून जोर धरत आहे. संबंधित खाण व्यवस्थापक तसेच संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याकडून बोलण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

WCL Mine Accident

दरम्यान, ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी, देखरेखीचा अभाव आणि जबाबदार यंत्रणेच्या कथित निष्काळजीपणाचे भयावह उदाहरण असल्याची चर्चा संपूर्ण खाण परिसरात सुरू आहे. चौकशी अहवालात नेमके कोणाचे उत्तरदायित्व निश्चित होते आणि मृत कामगाराला न्याय मिळतो की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Who was the worker who died in the Govari Deep Mine accident?
The deceased worker was Prakash Mohare, a contract labourer who suffered critical injuries after an electric pole collapsed during work.
When did the accident and death occur?
The accident occurred on June 7, 2026, and Prakash Mohare died during treatment in a Nagpur hospital on June 13, 2026.
What compensation was provided to the victim's family?
Following protests by workers and villagers, a compensation amount of ₹35 lakh was reportedly agreed upon for the victim's family.
What allegations have been raised after the incident?
Workers and local residents have alleged safety violations, improper pole installation, negligence by responsible officials, and demanded strict legal action against those accountable.


#WCL #GovariMineAccident #MineAccident #CoalMineSafety #WorkerDeath #IndustrialAccident #MiningNews #ChandrapurNews #RajuraNews #BallarpurArea #WCLNews #MineSafety #LabourRights #WorkersSafety #ContractWorker #IndustrialSafety #NagpurNews #MaharashtraNews #CoalMining #MineWorkers #CompensationCase #WorkplaceAccident #BreakingNews #AccidentInvestigation #SafetyViolation #MiningIndustry #WorkerJustice #LabourUnion #MineCollapse #CoalSector #IndustrialNegligence #MiningAccident #SafetyStandards #WorkerProtection #CoalIndia #PublicInterest #MineManagement #ContractLabour #JusticeForWorkers #MiningSafetyRules #IndustrialTragedy #WorkplaceSafety #FatalAccident #NewsUpdate #MaharashtraBreaking #LabourIssues #HumanRights #MineOperations #Accountability #LatestNews #MahawaniNews #VeerPunekarReport #RajuraNews #VidarbhNews #MarathiNews #CandrapurNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top