‘पापा’ उर्फ विनोद जाधव यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींचा हल्ला
Rajura Court Shooting | राजुरा | शहरात आज सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास न्यायालयासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी ‘पापा’ उर्फ विनोद जाधव यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा न्यायालयासमोर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Rajura Court Shooting
गोळीबारानंतर जखमी Vinod Jadhav यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Rajura Court Shooting
या घटनेमुळे राजुरा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयासारख्या संवेदनशील आणि वर्दळीच्या परिसरात गोळीबार झाल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
Rajura Court Shooting
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. गोळीबार करणाऱ्या दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
What happened in Rajura on August 24, 2026?
Where was Vinod Jadhav initially treated?
Why was Vinod Jadhav shifted to Chandrapur?
Have the accused been arrested?
#Rajura #RajuraNews #RajuraShooting #CourtShooting #VinodJadhav #PapaJadhav #Chandrapur #ChandrapurNews #MaharashtraNews #BreakingNews #BreakingNewsIndia #CrimeNews #CrimeUpdate #ShootingIncident #GunFire #PoliceInvestigation #PoliceNews #LawAndOrder #RajuraCrime #ChandrapurCrime #MaharashtraCrime #LatestNews #NewsAlert #BreakingUpdate #CrimeAlert #PoliceSearch #AccusedOnTheRun #CourtNews #RajuraCourt #DistrictHospitalChandrapur #MaharashtraBreaking #VidarbhaNews #Vidarbha #ChandrapurDistrict #RajuraLive #RajuraBreaking #MarathiNews #LocalNews #NewsUpdate #MahawaniNews #VeerPunekarReport #Journalism #InvestigativeJournalism #CrimeReport #PublicSafety #PoliceAction #MaharashtraBreakingNews #IndiaNews #LatestUpdate
.png)

.png)