धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरूच; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास गतीमान करण्याची नागरिकांची मागणी
Rajura Road Accident | राजुरा | तालुक्यातील सोंडो परिसरातील शेतकरी श्री. संजय गणपत बोरुले (वय ४० वर्षे) रा. भेदोडा यांचा १ जून रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा अद्याप शोध लागला नसल्याने स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय बोरुले हे सोंडो शेतशिवारातील आपल्या शेतात मिरची पिकाची पाहणी करून परत येत होते. दरम्यान, ग्रील इन्फ्रा कंपनीसमोरील रस्त्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर सुरक्षा उपाय म्हणून गतिरोधक आणि बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याची केवळ एकच बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली होती.
Rajura Road Accident
याच दरम्यान वाहतुकीची मोठी वर्दळ असताना संजय बोरुले हे आपल्या बाजूने प्रवास करीत होते. प्राथमिक माहितीनुसार, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन वाहनांनी एकाच वेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती धोकादायक बनली. त्याच वेळी आसिफाबादच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव वाहनाने बोरुले यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत ते हवेत फेकले गेले आणि डोक्याला व मेंदूला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Rajura Road Accident
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन आणि त्याचा चालक अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तपासाच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Rajura Road Accident
स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तपास यंत्रणेकडे ठोस मागणी केली आहे की, ग्रील इन्फ्रा कंपनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच विसापूर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तातडीने तपासून संबंधित वाहनाचा मागोवा घ्यावा. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनाचा मार्ग, क्रमांक आणि चालकाची ओळख पटविण्यासाठी आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.
Rajura Road Accident
दरम्यान, अपघातात कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने बोरुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी कुटुंबातील या दुर्दैवी घटनेमुळे सोंडो व परिसरात शोककळा पसरली असून दोषी वाहनचालकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी पुढे येत आहे.
Rajura Road Accident
सदर प्रकरणात सीसीटीव्ही पुरावे, टोलनाका नोंदी आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास अधिक वेगाने करण्यात आला तर अपघातास जबाबदार असलेल्या वाहनाचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता राजुरा पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Who was killed in the Rajura road accident?
How did the accident occur?
Has the vehicle responsible for the accident been identified?
What are the demands of local residents and relatives?
#RajuraAccident #HitAndRun #RoadAccident #SanjayBorule #RajuraNews #ChandrapurNews #MaharashtraNews #BreakingNews #AccidentNews #RoadSafety #TrafficAccident #FarmerDeath #JusticeForSanjayBorule #GreelInfra #HitAndRunCase #PoliceInvestigation #CrimeNews #LocalNews #ViralNews #TrendingNews #IndiaNews #HighwayAccident #CCTVFootage #RoadTragedy #AsifabadRoad #Chandrapur #Rajura #Maharashtra #LatestNews #PublicSafety #TrafficRules #AccidentInvestigation #FatalAccident #NewsUpdate #CitizenDemand #TollPlazaCCTV #RoadCrash #FarmerNews #HitAndRunInvestigation #LawAndOrder #BreakingUpdate #IndianRoads #TrafficSafety #AccidentAlert #CrimeUpdate #JusticeDemand #RoadVictim #NewsHeadline #RegionalNews #PublicInterest #RajuraNews #VeerPunekarReport #MahawaniNews #MarathiNews
.png)

.png)