राजुरा तहसील कार्यालयातील चालक कडुकरवर गंभीर गैरप्रकारांचे आरोप
राजुरा | Tehsil Driver Scam: शासकीय यंत्रणेतील एक चालक, पण गैरप्रकारांचा "ड्रायव्हिंग फोर्स" ठरलेला—श्री. राजेश कडुकर, तहसील कार्यालय राजुरा येथील वाहन चालक, यांच्यावर शासकीय वाहनांच्या बोगस दौऱ्यांद्वारे फसवणूक केल्याचे गंभीर आरोप सध्या समोर आले आहेत. जिवती तहसील कार्यालयाने दि. २२ मे २०२५ रोजी अधिकृत पत्राद्वारे या प्रकरणात कडुकरांना खुलासा मागितला आहे. तसेच कडुकर यांच्या संपूर्ण कार्यकाळातील शासकीय थकबाकी आणि पेन्शन थांबवण्याची मांग तक्रारदारांनी केली आहे.
हे केवळ एका कर्मचाऱ्याचे अपयश नाही, तर संपूर्ण प्रशासनाची ढिली यंत्रणा, बेजबाबदार देखरेख आणि दोषींवर कारवाई करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव अधोरेखित करणारे गंभीर प्रकरण आहे.
गैरप्रकारांचे स्वरूप: लॉकबुकमध्ये बोगस नोंदी
कडुकर यांनी २०१२ ते २०१७ या काळात शासकीय वाहनाचा गैरवापर करत, वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. वाहनाच्या लॉकबुकमध्ये खोट्या नोंदी करून बोगस दौरे दाखवले गेले. Tehsil Driver Scam ही गंभीर तक्रार सचिन पुणेकर (Sachin Punekar) यांनी उपविभागीय अधिकारी (राजुरा) यांच्याकडे सादर केली होती. त्यानंतर ही फाईल तहसीलदार जिवती यांच्या कार्यालयात कारवाईसाठी पाठविण्यात आली.
कारवाईचा आग्रह असलेल्या पत्राची धार बोथट होणार?
तहसीलदार जिवती यांनी आपले पत्र जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि उपविभागीय अधिकारी राजुरा यांना पाठवले असले, तरी "खुलासा मागविणे" हाच उद्देश सध्या तरी अधिक स्पष्ट दिसतो. Tehsil Driver Scam म्हणजेच, कडुकर यांना अजून संधी दिली जात आहे. म्हणजे स्पष्ट पुरावे असूनही कारवाईऐवजी खुलासा मागवून वेळकाढूपणा सुरूच आहे.
उत्तर देणार कोण?
- राजेश कडुकरने चुकीच्या लॉकबुक नोंदींमुळे शासनाची किती आर्थिक हानी केली?
- ही बोगस दौरे कोणत्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने मंजूर झाले?
- या पद्धतीनं शासकीय निधीचा गैरवापर फक्त एकच चालक करत होता, की यामागे मोठं रॅकेट आहे?
- कारवाईस विलंब करणार्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाईल का?
राजकारण आणि कर्मचारी युतीचा गंध?
राजेश कडुकर (Rajesh Kadukar) यांच्यावरील आरोप हे सामान्य स्वरूपाचे नाहीत. यात एक प्रकारची संगनमताची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांच्या दौऱ्यांचे भोगवटा अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनेच तयार केले जातात. Tehsil Driver Scam यामध्ये कडुकर एकटा दोषी असण्याची शक्यता कमीच आहे.
या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जाणार का? की पुन्हा एकदा बळी दिला जाईल तो फक्त एक "निचला" कर्मचारी?
नागरिकांचा आक्रोश : "आमच्या करातून खोट्या दौऱ्यांचं पेट्रोल का?"
राजुरा, जिवती परिसरातील नागरिक संतप्त आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, "आमच्या कराच्या पैशातून खोट्या दौऱ्यांसाठी पेट्रोल जाळलं जात असेल, तर ही केवळ फसवणूक नाही, तर आमच्या विश्वासावरचा घात आहे." Tehsil Driver Scam शासन स्वतःच्या यंत्रणेतील गैरप्रकारांवर इतकं सौम्यपणे वागेल, तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा करावी?
ठोस कारवाईशिवाय प्रशासकीय निठळेपणा कायम
शासनाला जर खरंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर 'शून्य सहनशीलता' दाखवायची असेल, तर फक्त पत्रव्यवहार आणि खुलास्यांची नौटंकी थांबवून थेट निलंबन, विभागीय चौकशी आणि आर्थिक वसुली सुरू करावी. Tehsil Driver Scam अन्यथा, या प्रकारचा "नवरा मेलेलं दुःख" दाखवणं म्हणजे जनतेची फसवणूक आहे.
मुलभूत मागण्या:
- राजेश कडुकरवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी.
- त्याने केल्या बोगस दौऱ्यांचे सखोल ऑडिट करण्यात यावे.
- ३६ वर्षांची थकबाकी आणि पेन्शन यांचे योग्य ऑडिट करून ती रक्कम थेट शासनाकडे परत केली जावी.
- यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- जनतेसमोर चौकशी अहवाल पारदर्शक पद्धतीने मांडण्यात यावा.
हे प्रकरण एखाद्या व्यक्तीवर संपवून टाकण्याचा प्रयत्न झाला, तर ते व्यवस्थेचा अपमान ठरेल. Tehsil Driver Scam कारवाई झाली पाहिजे आणि ती फक्त कडुकरवर नव्हे, तर प्रत्येक दोषीवर—वरपासून खालपर्यंत.
काय उत्तर देणार आहात, मा. जिल्हाधिकारी साहेब?
कारवाई करणार आहात की ही फाईलही धूळ खात पडून राहणार?