Safari Fraud : ताडोबा सफारी बुकिंगमध्ये अफरातफर: वनविभागाची कठोर चौकशी सुरू

Mahawani

पावती व्यतिरिक्त अधिक रक्कम वसूल प्रकरण; भ्रष्टाचाराची शक्यता

Case of collecting more amount than the receipt; possibility of corruption

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी करवा व्याघ्र प्रकल्पातील सफारी पर्यटन बुकिंगमध्ये आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप उघडकीस आला आहे. Safari Fraud पर्यटकांनी अधिक रक्कम भरली मात्र कमी रकमेची पावती दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बल्लारशाह क्षेत्रातील वनरक्षकांना विचारणा करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. Tadoba-Andhari Tiger Reserve


दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी शुभम रमेश धनानेत यांनी बल्लारपूर कारवा गेटवरून ताडोबा सफारी केली. त्यांनी बुकिंगसाठी १५०० रुपये भरल्याची पावती क्रमांक ५८ मिळाली. मात्र, नंतर कळले की, गेटवरील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त रक्कम वसूल करूनही कमी रकमेची पावती दिली आहे.


      


हा प्रकार समजताच, पर्यटकांनी भूषण मेश्राम यांच्या माध्यमातून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना ईमेल करून तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले की, उशिरा आलेल्या पर्यटकांकडून "बुकिंग फुल" असल्याचे कारण सांगत अतिरिक्त रक्कम घेतली जात होती. ही बाब स्पष्टपणे आर्थिक भ्रष्टाचार असल्याचे त्यांनी नमूद केले.


वनविभागाची चौकशी सुरू:

या तक्रारीनंतर बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक व्ही.पी. रामटेके यांनी आर.एस. दुर्योधन (वनरक्षक, कारवा १) यांना विचारणा केली आहे. त्यांनी याप्रकरणी सात दिवसांच्या आत स्पष्ट स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.


वनविभागाने स्पष्ट केले आहे की, जर आरोपींनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर आर्थिक अफरातफरीचे प्रकरण मानून शिस्तभंग कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवला जाईल. Tadoba-Andhari


पर्यटकांकडून अधिक रक्कम घेऊन कमी रकमेची पावती देणे ही केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सचिवांच्या सहभागाबाबतही संशय व्यक्त करण्यात येत आहे. 


वनविभागाने यावर कठोर पाऊले उचलत तक्रारदाराच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू केली आहे. यामुळे भविष्यातील अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.


हे वाचा: लाखांचा अवैध तंबाखू साठा जप्त मात्र मुख्य सूत्रधार कोण?


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील प्रमुख पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे. परंतु, या प्रकारामुळे प्रकल्पाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये विश्वास टिकवण्यासाठी वनविभागाने पारदर्शक कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे.


अशा घटनांमुळे केवळ संबंधित अधिकाऱ्यांवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. पर्यटकांना दर्जेदार सुविधा देणे आणि त्यांचा विश्वास जपणे हे प्रत्येक पर्यटन प्रकल्पाचे कर्तव्य असते. परंतु, या प्रकाराने वनव्यवस्थापनावर लोकांचा विश्वास डळमळीत होण्याची मोठी भीती आहे. तसेच या प्रकरणा व्हतिरिक्त पुन्हा अशा अफरातफऱ्या झाल्या आहे का? असा संशय नागरीकातून व्यक्त केला जात असून सदर वन विभागाने अशा अफरातफरी झाल्या असल्यास पर्यटकांनी समोर येऊन तक्रार करण्याचे आव्हाहन वन विभागामार्फत MAHARASHTRA FOREST DEPARTMENT करण्यात यावे अशी मांग नागरिक करत आहे. 


ताडोबा सफारी बुकिंगमधील Safari Fraud हा प्रकार गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाने वनविभागाच्या कामकाजाची पारदर्शकता सिद्ध करणे गरजेचे बनले आहे.


सफारी बुकिंगमध्ये भ्रष्टाचार हा पर्यटन उद्योगासाठी धोकादायक आहे. वनविभागाने दोषींना तत्काळ कारवाई करून कायद्याचा सन्मान टिकवावा आणि पर्यटकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा.


#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Tadoba #TadobaAndhari #TourismCorruption #WildlifeSafari #MaharashtraForest #ForestDepartment #BookingFraud #TourismIssues #WildlifeTourism #EcoTourism #MaharashtraWildlife #CorruptionCase #ForestManagement #TourismTransparency #PublicAccountability #WildlifeProtection #MarathiUpdates #TourismScam #EcoSystem #SafariBooking #WildlifeReserve #ForestScandal #LocalTourism #TadobaSafari #TransparencyMatters #MarathiJournalism #VeerPunekarReports #WildlifeNews #PublicTransparency #AntiCorruption #TourismEthics #WildlifeConservation #IndianForests #TadobaNews #WildlifeCrime #ForestAccountability #PublicInterest #MaharashtraTourism #MarathiWildlife #NatureTourism #ForestFraud #EcoPark #WildlifeJustice #NatureLovers #SafariFraud

To Top