लाखांचा अवैध तंबाखू साठा जप्त मात्र मुख्य सूत्रधार कोण?
चंद्रपूर : जिल्ह्यात भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा पकडण्यात आला आहे. आज २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कारवाईत ₹१.९३ लाखांच्या तंबाखूचा Tobacco Trade अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या तंबाखू तस्करीचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, तंबाखूची ही खेप नेमकी कुठून आली आणि कुठे जाणार होती, याचा तपशील पोलीस अजूनही उघड केलेला नाहीत.
भिसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. असून साठ्यात इगल सुगंधित तंबाखू (४३८ नग, प्रत्येकी २०० ग्रॅम) – ₹१,३५,७८०, होला हुक्का तंबाखू (२०५ नग, प्रत्येकी २०० ग्रॅम) – ₹३३,६२०, छोट्या पॅकिंगचा हुक्का तंबाखू (८४ नग, प्रत्येकी ४० ग्रॅम) – ₹३,३६०, इगल हुक्का तंबाखू (३३० नग, प्रत्येकी ४०० ग्रॅम) – ₹२१,१२० जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹१,९३,८८० इतकी आहे.
या प्रकरणात भिसी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २१९/२४ नोंदवण्यात आला असून, गुन्हा पुढील कलमांतर्गत नोंदवला आहे IPC कलम २७३, २७४, २७५ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ चे कलम ३०(२), २६(२)(अ), ३, ४, ५९(१) जप्त केलेला मुद्देमाल भिसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
स. फौ. धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, पोहवा नितीन कुरेकार, अजय बागेसर, पोकॉ प्रशांत नागोसे, शशांक बदामवार, आणि चापोहवा दिनेश अराडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
या तंबाखू तस्करीच्या मोठ्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. मात्र, काही गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत या अवैध साठ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे?, तंबाखूची ही खेप नेमकी कुठून आली आणि कुठे जाणार होती?, आरोपींना संरक्षण देणाऱ्या स्थानिक पातळीवरील कोणत्या व्यक्तींचा यात हात आहे?
हे वाचा: प्रतिबंधीत तंबाखूचा साठा जप्त
तंबाखू तस्करीमुळे समाजावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. या प्रकरणात फक्त आरोपींना अटक करून थांबणे पुरेसे नाही; तंबाखूच्या या नेटवर्कचे उच्चाटन होणे अत्यावश्यक आहे.
भिसी पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, तंबाखू Tobacco Trade तस्करीसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मुख्य सूत्रधार आणि त्यामागील नेटवर्कवर कठोर कारवाई न झाल्यास असे प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता आहे.
तंबाखूच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता या प्रकरणाची अधिक चौकशी करून मुख्य सूत्रधारांना गजाआड करावे. अशा कठोर पावले उचलल्यासच समाजात हा गैरप्रकार थांबवता येईल.
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #IllegalTobacco #TobaccoRaid #Bhandak #PoliceAction #TobaccoBan #CrimeNews #FoodSafetyAct #TobaccoTrade #ChandrapurPolice #SeizedTobacco #CrimeControl #PoliceSeizure #AntiTobacco #IllegalTrade #TobaccoCrime #HookahTobacco #ChandrapurUpdates #BhandakNews #TobaccoIssues #CrimeReport #ChandrapurCrime #LawAndOrder #HookahBan #IllegalBusiness #TobaccoProhibition #PoliceRaidUpdate #TobaccoNetwork #CrimeInvestigation #SeizureDetails #FoodSafetyViolation #ProhibitedTobacco #CrimeInChandrapur #TobaccoSeizedNews #ChandrapurIllegal #CrimeNetwork #IllegalGoods #HookahCrime #ChandrapurIllegalTrade #TobaccoTrade