सुशिक्षित तरुणांचे भविष्य अनिश्चित; वचन पूर्ततेचा प्रश्न चर्चेत
राजुरा : विधानसभा मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगारीचा Unemployment Issue प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुभाष धोटे यांनी बेरोजगार तरुणांना दरमहा ₹५०००/- भत्ता देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. या मुद्द्यावर त्यांनी २५०१ मतांनी विजय मिळवला, परंतु आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सुभाष धोटे यांनी मित्र पक्ष, महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या वतीने २०१९ च्या निवडणुकीत रोजगार भत्त्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्या सत्ताकाळात ना भत्त्याचा अंमल झाला, ना रोजगारासाठी ठोस योजना राबविल्या गेल्या. यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
राजुरा हा खाणकाम, सिमेंट उद्योग, आणि लघुउद्योगांसाठी ओळखला जातो. परंतु या क्षेत्रांमध्ये स्थानिक सुशिक्षित तरुणांना काम मिळत नाही. आकडेवारीनुसार, बेरोजगारांचा टक्का सतत वाढत असून स्थानिक रोजगारात बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याने स्थानिक तरुणांना रोजगारा पासून वंचित राहावे लागत या साठी रोजगार हमी योजना आणि उद्योगक्षेत्राचा विकास या बाबतीत ठोस पावले नउचलल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांपैकी बहुतेकांना त्यांच्या पात्रतेनुसार संधी मिळालेली नाही.
२०१९ च्या निवडणूक आमदार साहेबांच्या जाहीरनाम्यातील रोजगार भत्त्याच्या आश्वासनाचे छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे. अनेक तरुण सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत “वचन दिले होते, पण पाच वर्षांत काहीच केले नाही.” “आमचा रोजगार भत्ता कुठे गेला?” असे सवाल विचारले जात आहे. या संतापामुळे आगामी निवडणुकीत हा मुद्दा सुभाष धोटे यांच्यासाठी अडचण ठरू शकतो. तसेच विरोधी पक्षांनी या प्रकरणावर सुभाष धोटे यांच्यावर तीव्र टीका करत “तरुणांना आश्वासन देऊन फसवले गेले.” “काँग्रेसचे वचन म्हणजे निव्वळ दिखावा.” असे बोलत धारेवर धरले आहे.
अधिक वाचा: मूर्ती-विहिरगांव विमानतळ: स्वप्न की फसवणूक?
राजुरा मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न Unemployment Issue सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज होती मात्र स्थानिक पातळीवर उद्योग आणि रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यात, तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी विशेष कौशल्य विकास योजना हाती घेण्यात, बेरोजगारी भत्त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करणे गरजेचे होते जे मागील काळात करण्यात आले नाही.
राजुरा मतदारसंघातील बेरोजगारी हा केवळ राजकीय मुद्दा नसून तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आमदारांनी दिलेले वचन पाळणे गरजेचे होते, अन्यथा ते विश्वासार्हता गमावू शकतात. आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल हा या मुद्द्यावरच ठरण्याची शक्यता आहे.
#Mahawani #veerpunekar #Rajura #Chandrapur #MarathiNews #RajuraYouth #MahawaniNews #RajuraEmployment #ChandrapurJobs #BerojgariIssue #VidarbhaNews #KorpanaUpdates #RajuraMLA #UnemploymentCrisis #YouthProblems #RajuraDevelopment #MarathiUpdates #YouthEmployment #RajuraIssues #PoliticalPromises #ChandrapurUpdates #MahawaniNewsHub #EmploymentPromise #RajuraPolitics #VidarbhaDevelopment #LocalNews #VidarbhaPolitics #ElectionPromises #RajuraFuture #JobCrisis #EmploymentNews #YouthConcerns #MahawaniMedia #PoliticalAnalysis #UnemploymentSolution #KorpanaEmployment #RajuraProgress #ChandrapurIssues #VidarbhaYouth #RajuraDebate #MahawaniFocus #YouthAwareness #RajuraChallenges #MahawaniUpdate #VidarbhaProblems #MarathiJournalism #VidarbhaEmployment #ChandrapurFocus #LocalEmployment #RajuraHope #RajuraYouth #MahawaniNews #UnemploymentIssue