टाटा Harrier गाडीसह १७.५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अज्ञात चालक फरार
चंद्रपूर : आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू Illegal Tobacco अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या टाटा Harrier गाडी (क्रमांक MH 44 S 3838) सह तब्बल १७,५५,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, गाडी चालक पोलिसांचा पाठलाग टाळून पळून गेला, त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाईत १) इगल सुगंधित तंबाखू - ४२ किलो (५६,७०० रुपये), २) इगल सुगंधित तंबाखू (७५ किलो) - १,१२,५०० रुपये, ३) होला सुगंधित तंबाखू (१५५ किलो) - १,२७,१०० रुपये, ४) पान पराग प्रीमियम मसाला (८ किलो) - १०,२४० रुपये, ५) टाटा Harrier वाहन - १५,००,००० रुपये. असा एकूण १७,५५,४४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि भिसी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. पथकात सपोनी बलराम झाडोकार, पोउपनि मधुकर सामलवार, संतोष निंभोरकर, सुरेंद्र महतो, संजय वाढई, गणेश मोहुर्ले, प्रमोद कोटणाके यांचा समावेश होता.
ही कारवाई कौतुकास्पद असली तरी यामध्ये काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या तंबाखूचा साठा नेमका कुठून येतो? त्याचे मूळ स्रोत कोण आहेत? ही वाहतूक कोणाच्या देखरेखीखाली सुरू होती? असा मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखूचा साठा नेमका कुठून आला? या तंबाखू वाहतुकीचे मुळ थांबवण्यासाठी पोलिसांकडून काय कारवाई केली जात आहे? जर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती, तर तस्करीचे मूळ शोधण्यासाठी संपूर्ण नेटवर्कवर धडक कारवाई का होत नाही? यावर पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली दिसत नाही.
अधिक वाचा: मूर्ती-विहिरगांव विमानतळ: स्वप्न की फसवणूक?
अशा प्रकारच्या कारवायांमुळे तस्करीला तात्पुरता आळा बसतो, परंतु तस्करीची मुळे शोधून ती कायमची नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना गरजेच्या आहेत. पोलिसांनी अशा प्रकारच्या प्रकरणांवर अधिक गंभीर होऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू Illegal Tobacco जप्त करून तात्पुरता फटका बसवला असला तरी वाहतुकीचे मूळ थांबवणे गरजेचे आहे. अशा कारवायांमुळे जनतेत पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल, मात्र त्यासाठी संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करणे हेच अंतिम ध्येय असले पाहिजे.
#Mahawani #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #MahawaniNews #TobaccoBan #IllegalTrafficking #PoliceAction #MaharashtraNews #ChandrapurPolice #CrimeNews #SmugglingNetwork #LocalNews #TobaccoSeized #HarrierSeized #IllegalTobacco #MaharashtraCrime #TobaccoSmuggling #SmugglingAlert #BhisiPolice #TobaccoTrafficking #CrimeUpdate #TobaccoMafia #ChandrapurDistrict #MarathiNews #PoliceRaid #CrimeInvestigation #SmugglingCase #TobaccoBanNews #MaharashtraUpdates #ChandrapurUpdates #CrimePrevention #SeizedTobacco #LawEnforcement #AntiSmuggling #PublicQuestions #PoliceNetwork #CrimeAnalysis #TobaccoCrime #Illegaltobacco