Chandrapur Assembly Election | यंदाहि जोरगेवार राखतील मागील मताधिक्य?

Mahawani

जोरगेवारांच्या यशाची पुनरावृत्ती?

A repeat of Jorgeva's success?


चंद्रपूर : विधानसभा क्षेत्रातील राजकारणाचे एक महत्त्वाचे नाव म्हणजे किशोर जोरगेवार. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून तब्बल १,१७,५७० मते मिळवत, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नानाजी शामकुळे Nanaji Shamkule यांना ७२,६६१ मतांनी पराभूत करून इतिहास घडवला होता. या विजयाने चंद्रपूर मतदारसंघात Chandrapur Assembly Election जोरगेवारांचे प्रभावी नेतृत्व अधोरेखित केले. सध्या प्रचाराची रंगधुमाडी थांबली असून राजकीय विश्लेशक आप आपले विशलेशन मांडत आहे. चंद्रपूर मतदार संघात मागच्या निवडणुकी प्रमाणेच चित्र असणार असल्याचे बोलल्या जात असुन २०१९ च्या निवडणूकीत मिळालेले मताधिक्य यंदाही जोरगेवार राखणार असल्याचे अंदाज बांधले जात आहे.


किशोर जोरगेवार Kishore Jorgewar यांच्या मागील कारकीर्दीकडे पाहता, त्यांची कामगिरी विकासाभिमुख, पारदर्शक आणि सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी ठेवणारी होती. त्यांच्या "आमचा टिफिन" Ammacha Tiffin या उपक्रमाने मतदारसंघातील जनतेशी आपुलकी वाढवली. या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष जनतेशी संपर्क साधला, त्यांचे प्रश्न जाणून घेतले, आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहिले.


      


त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास, जल व्यवस्थापन, आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांनी प्रत्येक समाजघटकाला सोबत घेतले. या कार्यशैलीमुळे मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी विश्वास निर्माण झाला.


यंदाच्या निवडणुकीत जोरगेवार हे भारतीय जनता पक्षाचे BJP उमेदवार आहेत. अपक्ष म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर आता पक्षाच्या समर्थनासह ते अधिक ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारामध्ये पक्षाचे मोठं-मोठे स्टार प्रचारक सहभागी झाल्याने प्रचाराला व्यापक गती मिळाली आहे.


अधिक वाचा: पवन कल्याण यांच्या चंद्रपुरात रोड


तसेच, जोरगेवार यांनी सातत्याने मतदारांशी संपर्क ठेवून त्यांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या मताधिक्यात ५ ते १० हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार पाझरे, पडवेकर, आणि झोडे यांच्या निवडणुकीतील सहभागामुळे मतविभाजन होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, जो जोरगेवारांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट करतो.


किशोर जोरगेवार यांनी भूतकाळात दाखवलेल्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे आणि मतदारसंघात सतत केलेल्या कामामुळे त्यांचे यंदाचे स्थान अधिक बळकट झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या बॅनरखाली त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आधार मिळाला असून, यंदाची निवडणूक Chandrapur Assembly Election त्यांच्यासाठी अपेक्षेपेक्षा सोपी ठरण्याची शक्यता आहे.


जोरगेवार यांनी २०१९ मध्ये दाखवलेल्या उल्लेखनीय यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी ते सज्ज आहेत. त्यांची कार्यक्षमता, जनतेशी असलेला जवळीक, आणि पक्षाचे पाठबळ यामुळे त्यांचा विजय निश्चित वाटतो. आगामी निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विजयाचे दार उघडणारे असावे, असा कयास बांधला जातो.


#Mahawani #VeerPunekar #Chandrapur  #MahawaniNews #MarathiNews #ElectionUpdates #AssemblyElection #AssemblyPolls #JorgewarLeadership #BJPChandrapur #MarathiPolitics #VidarbhaPolitics #Election2024 #KishorJorgewar #BJPIndia #MaharashtraPolitics #ChandrapurElection #RajuraUpdates #KorpanaUpdates #MahawaniElection #ChandrapurNews #VidarbhaUpdates #GrassrootLeadership #VoterAnalysis #JorgewarForChandrapur #ElectionTrends #MaharashtraUpdates #AssemblyNews #BJPUpdates #ChandrapurDevelopment #VoterSupport #PoliticalInsights #RajuraElection #VidarbhaAssembly #StarCampaigner #TiffinCampaign #ChandrapurProgress #ElectionFocus #BJPVictory #ChandrapurCandidates #RajuraLeaders #VidarbhaNews #LeadershipFocus #MarathiUpdates #ElectionSuccess #DevelopmentAgenda #BJPStarCandidates #ChandrapurTrends #PoliticalSuccess #Chandrapur Assembly Election

To Top