Fake Voter | जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दीड महिन्यातच विस्मरणात

Mahawani

त्या ६,८५३ बोगस मतदारांपैकी कोणीच दोषी नाही?

None of those 6,853 bogus voters are guilty?

राजुरा: विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह ठरण्याच्या दृष्टीने मतदार नोंदणी प्रक्रियेला अत्यंत महत्त्व आहे. मात्र, राजुरा-७० विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर १ ऑक्टोबर २०२४ पासून युरो नेट ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून नव्या मतदार नोंदणीसंदर्भातील संशयास्पद प्रकार उघड झाला होता. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कासवगती कारवाईवरही नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नंतर दीड महिना लोटून गेला तरी ही सदर प्रकरणात ६,८५३ मतदार नोंदणी मधून अद्याप एकावरही गुन्हा निष्पन्न झाला नसल्याने अश्वशर्य व्यक्त केले जात आहे.


दिनांक १ ऑक्टोबर २०२४ पासून युरो नेट ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून नमुना अर्ज क्र. ६ द्वारे ६,८५३ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. ही नोंदणी मतदारसंघातील सामान्य आकड्याच्या तुलनेत खूपच मोठी असल्याने संशयास्पद मानली जात असून यातील दोषींना तातडीने शिक्षा होणे गरजेचे आहे मात्र १ महिना १९ दिवस उलटूनही कारवाईत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईने प्रकरणावर नागरिकात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


      


राजुरा काँग्रेसने याप्रकरणी संशय व्यक्त करत बोगस नोंदण्या रद्द करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तातडीने कारवाई करत संबंधित नोंदण्या रद्द केल्या आणि प्रकरणाची चौकशी राजुरा पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केली. मात्र, १ महिना १९ दिवस उलटूनही प्रकरणात दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांच्या मनात अस्वस्थता आहे.


या प्रकरणात प्रशासनाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असली तरी बोगस नोंदणीसाठी वापरण्यात आलेल्या संगणकांचे आयपी अ‍ॅड्रेस शोधणे, अर्ज भरलेल्या व्यक्तींची ओळख पटवणे यासारखी महत्त्वाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विशेषतः राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीत समाविष्ट झालेली काही नावे स्थानिक नागरिकांनी कधी ऐकलेलीच नाहीत.


अधिक वाचा: राजुरा मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर


निवडणूक निकालावर प्रभाव टाकण्यासाठी या नोंदण्या केल्या गेल्या असाव्यात, असा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे बोगस नोंदण्या करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची गरज अधोरेखित होत आहे. मतदानाच्या अवघ्या एका दिवसावरही या प्रकरणाचा उलगडा झाला नसल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. काँग्रेसने प्रकरणाचा ठोस तपास झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता मात्र आता त्यांच्या कडून देखील या प्रकरणावर सखोल चौकशी करण्या करिता कुठलाही उठाव होताना दिसत नाही.


या पप्रकरणाचा उद्देश राजुरा-७० मतदारसंघात मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर नावे घालून निकालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात असून मतदार नोंदणी प्रक्रियेतील हे प्रकरण केवळ स्थानिक नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित करते. प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करत दोषींना लवकरात-लवकर न्यायालयात उभे करणे आवश्यक आहे.


सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सखोल चौकशी केली जात आहे. मात्र, तपासाच्या गोपनीयतेमुळे याबाबत अतिरिक्त माहिती सध्या देता येणार नाही. - योगेश पारधी, पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी, राजुरा


#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #VoterFraud #ElectionScam #FakeVoters #AssemblyElection #Election2024 #RajuraElection #BogusVoters #VoterRegistration #OnlineFraud #ElectionManipulation #CongressDemand #DistrictCollector #ElectionCommission #PoliticalScam #VoterList #RajuraNews #ChandrapurPolitics #RajuraConspiracy #ElectionIrregularities #VoterRights #RajuraAssembly #FakeEntries #ElectionTransparency #ElectionAccountability #BogusRegistration #RajuraPolice #ElectionIntegrity #ElectionProtest #VoterAwareness #VoterVerification #ElectionMalpractice #ElectoralFraud #PoliticalAccountability #VoterScam #RajuraAssemblyNews #CitizenRights #ElectionJustice #VoterSecurity #ElectoralProcess #FakeRegistration #FraudInvestigation #ElectionProbe #FakeVoter

To Top