महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांचा प्रचारार्थ पवन कल्याण चंद्रपूर दौऱ्यावर
चंद्रपूर : आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण Pawan Kalyan आज १७ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर दौऱ्यावर येणार आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी पवन कल्याण भव्य रोड शोद्वारे Chandrapur Roadshow सहभागी होणार असल्याने या दौऱ्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पवन कल्याण यांच्या रोड शोची सुरुवात दुपारी ३:३० वाजता बागला चौकातून होणार असून गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस, बसस्थानक मार्गे रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे संपेल. या भव्य रोड शोमध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी केंद्रीय मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारख्या भाजपच्या स्टार प्रचारकांनी Kishore Jorgewar जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूरात सभा घेतल्या. या सभा चांगल्याच गाजल्या असून प्रचार मोहीम अधिक तीव्र झाली आहे. भाजपकडून मतदारांना विकासकामांच्या आश्वासनांचा उल्लेख वारंवार करण्यात येत आहे.
पवन कल्याण यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. दक्षिणेत लोकप्रिय असलेले पवन कल्याण चंद्रपूरसारख्या विदर्भीय मतदारसंघात प्रचारासाठी येत असल्याने हा भाजपचा आक्रमक प्रचारतंत्राचा भाग मानला जातो. पवन कल्याण यांची लोकप्रियता आणि त्यांचा प्रभाव, विशेषतः तरुणांमध्ये, महायुतीसाठी मतांचे गणित साधण्यात उपयुक्त ठरू शकतो.
अधिक वाचा: चंद्रपूरातील विकासात समान न्यायाची वचनबद्धता
तथापि, चंद्रपूर मतदारसंघात असलेल्या स्थानिक प्रश्नांवर अद्याप पुरेशी चर्चा झालेली नाही. रोजगारनिर्मिती, शेतीसंबंधी प्रश्न, धान-कापूस दरवाढ, तसेच पायाभूत सुविधांवरील कामे यांसारख्या मुद्द्यांवर नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. रोड शो Chandrapur Roadshow आणि सभांमधून या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली जाणार का, याकडे मतदारांचे लक्ष आहे.
पवन कल्याण यांच्या चंद्रपूर दौऱ्यामुळे महायुतीच्या प्रचार मोहीमेला नवा जोश मिळणार आहे. मात्र, या रोड शोद्वारे स्थानिक प्रश्नांवर समाधानकारक चर्चा होईल का? यावर आगामी निवडणुकीतील वातावरण अवलंबून असेल. मतदारसंघात मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#Mahawani #MahawaniNews #VeerPunekar #Chandrapur #BJP #Election2024 #PowerStar #PawanKalyan #ChandrapurElection #VidarbhaPolitics #PoliticalCampaign #RoadShow #ChandrapurUpdates #DevelopmentAgenda #ChandrapurNews #ChandrapurRoadshow