श्री हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर आप राजुरा तर्फे बुंदी व शरबत वाटपाचे नियोजन.

 

सुरजभाऊ ठाकरे यांना येत्या विधानसभा निवडणुक आमदार म्हणून पाहण्याची आवड -समर्थक


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२२ एप्रिल २०२४

राजुरा : आम आदमी पार्टी, उपजिल्हाध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्यावतीने आम आदमी पार्टी, राजुरा कार्यालया तर्फे संकट मोचक ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत उद्या शहरात पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालया समोर बुंदी व शरबत वाटप करण्यात येणार आहे. 

राजुरा विधानसभा क्षेत्रामधील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, तथा जनसामान्यांच्या गंभीर समस्यांचे निवारण करण्याकरिता श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या जनतेप्रती ची भूमिका ही नेहमीच संकट मोचक सारखीच असल्याने राजुरातील स्थानिक आजी-माजींकळे ज्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत अशा निराश झालेल्या नागरिकांच्या समस्या श्री. सुरजभाऊ ठाकरे (Surajbhau Thackeray) यांनी वेळोवेळी मार्गी लावल्या असल्याने त्यांच्या याच कामाच्या आधारावर राजुरा येथील जनतेचं स्वप्न हे श्री. सुरजभाऊ ठाकरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून बघण्याचे झाले असल्याने जनतेच्या आग्रहास्तव निश्चितच निवडणुकीच्या रणांगणात श्री. सुरजभाऊ ठाकरे उतरतील हे निश्चित.  (Aam Aadmi Party plans to distribute sweets and sherbet)

या पर्वाची सुरुवात ही हनुमान जयंती च्या पावन पर्वावर बुंदी व शरबत वाटप करून  करण्यात येत आहे.

(mahawani) (suraj thakre) (rajura) (hanuman Jayanti) (loksabha2024)

To Top