RTE :- मूर्ख बनविण्याचा गोरखधंदा.

Mahawani

 

गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२० एप्रिल २०२४

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(RTE)  गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असतानाही यावर्षी मात्र नागरिकांची घोर निराशा करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो त्याच शाळा यावर्षी पोर्टलवर टाकून पालकांना जबर झटका देण्यात आला आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.राज्यभरातील बहुसंख्य शाळा यात नोंदणी करतात व  आरटीई  ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविते. दरवर्षी ही प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होते. यात लॉटरी पद्धतीने सोडत होते व त्यात निवडण्यात आलेले विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश दिला जातो.इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षणासाठी विद्यार्थी पात्र ठरतो.विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारच्या वतीने  शाळेला अदा केले जाते.अर्थात ते सरकारच्या दिरंगाईमुळे शाळांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे बहुतेक शाळा या प्रक्रियेत भाग घेत नाही.

यावर्षी मात्र सरकारने ही प्रक्रिया खूप उशिरा म्हणजे १६ एप्रिल पासून सुरू केली. ३० एप्रिल पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र जेव्हा पोर्टल उघळले गेले तेव्हा मात्र शासनाची हुशारी दिसून येते आहे.

दरवर्षी एक ते तीन किलोमीटर परिघातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा यात प्रवेशासाठी उपलब्ध असतात.यावेळी मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर उपलब्ध आहेत पण त्यात सेल्फ फायनान्स नॉट अविलेबल असा शेरा टाकून या शाळा प्रवेशासाठी नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यात ज्या शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्या सर्व शाळा महानगरपालिकेच्या आहेत.जेव्हा की महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा मोफत शिक्षण देतात. ज्या शाळा मोफत शिक्षण देतात त्याच शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय म्हणजे शिक्षण विभागाचा मूर्खपणा समजायचा की राज्यातील जनता मूर्ख आहे हे समजावे हेच कळतं नाही.

या प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेले पालक आता कपाळावर हात मारुन बसले आहेत.

महायुती सरकार गोरगरिबांची किती थट्टा करते याचे हे ताजे उदाहरण आहे. (mahawani) (RTE) (Government of Maharashtra)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top