गोंडपिपरी पोलिसांची अवैध मद्य वाहतूक तस्करावर धडक कारवाई.

Mahawani



चारचाकी वाहना समेत ४,५२,५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१६ मार्च २०२४

गोंडपिपरी : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसर १५ मार्च रोजी दुपार १:३० च्या सुमारस छ. शिवाजी महाराज चौक गोंडपिपरी (Shivaji Maharaj Chowk Gondpipari) पासून एक किलोमीटर अंतरावर राकेश पुन, पंकज चिलनकर रा. गोंडपिपरी या पंचा सह नाकाबंदी केली असता आरोपी प्रकाश विजय बोरकर रा. दुर्गापुर जि. चंद्रपुर, शैलेश वानखेडे रा. तुकुम चंद्रपुर हे भर धाव वेगाने यांच्या ताब्यातील हुडाई कम्पनिची चारचाकी वाहन क्र. एम. एच. ०५ सी. एच. १६९९ गोंडपिपरी च्या दिशेने येत असताना आढळून आले.

    गोपनीय माहिती नुसार सदर वाहनाची झळती घेतली असता वाहनात निळया रंगाचे आठ मोठया प्लास्टिक पिशव्यामध्ये रॉकेट संत्रा देशी दारूचे प्रत्येकी ९० एम. एल. चे ज्यावर आर. व्ही. बीन. ४२४ फेब २०२४ असे बॅच नंबर असलेले एकुण १५०० नग प्रत्येकी कि. ३५ रू प्रमाणे ५२,५०० रु चा माल, तसेच हुडाई कम्पनिची चारचाकी वाहन क्र. एम. एच. ०५ सी. एच. १६९९ (MH 05 CH 1699) किंमत ४००००० रु. एकुण ४,५२,५०० रू चा मुददेमाल अवैध्यरित्या बाळगुन वाहतुक करीत असल्याने पंच्या समक्ष जप्त करण्यात आला.

     मिळून आलेल्या मालाबाबत चौकशी केली असता सदर माल हा शैलेश वानखेडे (Shailesh Wankhede) या इसमाचा असून त्यांनी हा दारूचा माल लगामबोरी येथे नेण्यास सांगीतले वरून आरोपी (Prakash Vijay Borkar) प्रकाश विजय बोरकर (वाहन चालक) सदर दारूचा मुददेमाल वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने सदर आरोपीतां विरूध्द १०२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ म.दा.का. कलमाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून मुख्य आरोपी शैलेश वानखेडे पसार असून समोरील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे पो. उप. नि. मनोहर मोगरे (Manohar Mogre)पो. हवा माणिक वादरकर (Manik Vaderkar)पो.उप.नि.मरापे यांनी केली. (gonpipari) (chandrapur) (mahawani)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top