चंद्रपुरात जागतिक ग्राहक दिन मोठ्या उल्हासात साजरा.

 

ग्राहक दीना निमित्य ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित..

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१५ मार्च २०२४

चंद्रपूर : दरवर्षी आज १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून जगभरात मोठ्या उल्हासात साजरा केला जातो जागतिक ग्राहक दीना निमित्य ग्राहकांची जनजागृती, त्यांचे हक्क, तक्रारी, वस्तू खरेदी, वापर करण्याचा अधिकार इत्यादी ग्राहक हितार्थ विषयासंधर्भात मार्गदर्शन करत आजचा दिवस ग्राहक दिन (World Consumer Day) म्हणून साजरा करत ग्राहकांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव करून दिली जाते. 

याचेच औचित्य साधून आज VIP विश्राम गृह तसेच ग्राहक न्यायालय, चंद्रपूर (Consumer Court, Chandrapur) येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शना नुसार ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूर तर्फे जागतिक ग्राहक दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात ग्राहक न्यायालय, चंद्रपूर येथे आयोजित ग्राहक दीना निमित्य ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होऊन ग्राहक न्यायालय येथील अधिकारी, न्यायाधीश व उपस्तितांना ग्राहक दीनाच्या सुभेक्छा देत ग्राहकांच्या समस्या, तक्रार निवारण करण्यासंधर्भात चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमात ग्राहक न्यायालय, चंद्रपूर मार्फत ग्राहकांच्या समस्या, तक्रार निवारण संधर्भात मार्गदर्शन करण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांन करीता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला. 

यावेळी चंद्रपूर ग्राहक न्यायालय अधिकारी सचिन जैस्वाल, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र पुणेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद धिमान, जिल्हा सचिव मुन्ना ईलटम, जिल्हा मिडिया प्रमुख धम्मशिल शेंडे व सर्व सहकारी उपस्थित होते. (mahawani) (chandrapur) (Consumer Protection Committee, Chandrapur) (veerendra punekar) (santosh parkhi)

To Top