घरफोडी चक्क १० गुन्हे राजुरा पोलिसांकडून उघडीस !

 

पोलीस स्टेशन राजुरा गुन्हे विभागाची कारवाई. 



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२१ फेब्रुवारी २४

राजुरा : पोलीस स्टेशन राजुरा येथे १४ फेब्रुवारी रोजी फिर्यादी रमेश बापुराव बरडे (Ramesh Bapurao Barde) वय ५० वर्ष, रा. साखरावाही यांची तोंडी तक्रार दिनांक १३ फेब्रुवारी च्या सकाळी १०.०० च्या सुमारास फिर्यादी व त्याची पत्नी घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले होते सायंकाळी ०५.०० वा. परतले असता अज्ञात व्यक्तीने दराचा ताला तोडुन आत प्रवेश करून सामान अस्ताव्यस्त करून आलमारीच्या लॉकरमध्ये ठेवुन असलेले ०६ नग सोन्याचे जिवत्या प्रत्येकी अर्धा ग्रॉम वजनाचे कि. अं ६०००/- रु नगदी ५०००/-रू असा एकुण ११,०००/- रु चा मुद्देमाल लाप्पास केल्याची तक्रार नोंदवली होती. फिर्यादीचे तक्रारीवरून पो.स्टेला अप.क्र १२५/२०२४ कलम ४५४, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोद करून तपासात सुरु असता.

मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन (Hon. Superintendent of Police Mr. Mumakka Sudarshan) चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम चंद्रपुर मा. उप विभागिय पोलीस अधिकारी श्री. दिपक साखरे राजुरा यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी (Hon. Police Inspector Yogeshwar Pardhi) यांनी गुन्हे अन्वेषन विभाग राजुरा यांना पो. स्टेला घरफोडीचे गुन्हाची दाखल बाबत गांभीर्य लक्षात घेता अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिल्याने.

डि.बी इंचार्ज पोउपनि पांडुरंग हाके (S.I. Pandurang hake)  सोबत पोहवा सुनील गौरकार, पोहवा किशोर तुमराम, पोशि तिरूपती जाधव, पोशि महेश बोलगोडवार पोशि रामराव बिंगेवाड, पोशि योगेश पिदुरकर यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन घटनास्थळी भेट देवुन अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना १५ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रामपुर येथील समारू देवारसिंग निषाद (Samaru Dewarsingh Nishad) वय ४० वर्ष व बलराम दुर्जन निषाद (Balram Durjan Nishad) वय २७ वर्ष रा. चंद्रपुर यांना रामपुर हद्दीतील शिवमंदीरा मागे संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने पंचासमक्ष ताब्यात घेत विचारणा केली असता प्रथमता उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यांना बारकाईने विचारपुस केली असता गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यांना पोस्टे. राजुरा अप क्रमांक १२५ / २४ कलम ४५४, ३८० भादवी या गुन्हयात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांचेकडे पोस्टे. राजुरा येथील अभिलेखावर नोंद असलेले घरफोडीच्या गुन्हयाबाबत विश्वसात घेवुन विचारणा केली आरोपीने या अगोदर रामपुर, खामोना येथील दोन, माथरा, पांढरपौनी, पवनी, चनाखा, टेंबुरवाही, सोंडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण १० ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगतिलेवरून सदर घटने बाबत पो.स्टे राजुराचे अभिलेखानुसार पो.स्टे राजुरा १) अप क्र. १२५ / २४ कलम ४५४, ३८० भादवी २ ) अप.क्र ५३२ / २०२३ कलम ४५४,३८० भादवी, ३) अप.क्र ५८८/२०२३ कलम ४५४, ३८० भादवी, ४) अप.क्र ६२० / २०२३ कलम ४५४, ३८० भादवी, ५) अप. ०७/२०२४ कलम ४५४, ३८० भादवी, ६ ) अप.क्र ८० / २०२४ कलम ४५४, ३८० भादवी ८) ४७४ / २०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी तसेच पो.स्टे विरूर येथे १) अप.क्र ३५७ / २३ कलम ४५४, ३८० भादवी, २) अप. क ३१० / २०२४ कलम ४५४, ३८० भादवी ,३) ५३/२०२४ कलम ४५४,३८० भादवी अन्वये गुन्हे दाखल असुन असे वरील नोंद असलेल्या एकुण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी १) सोन्याचे दागिने अंदाजे वजन १४० ग्रॅम कि. अं.५,०८,५००/- २) चांदीचे दागिने अंदाजे वजन १७० ग्रॅम वजन कि. अं.८३००/-रू, ३) नगदी ७,००० /- रू ४) घरफोडी करणे करीता वापरलेले हत्यार कि.अं. १००/-रु ५) गुन्हा करतेवेळेस वापरलेली निळया रंगाची होन्डा साईन मोटार सायकल कि. अं.८०,०००/- असा एकुण. ६,०३,९०० /- रू चा माल आरोपी कडुन हस्तगत करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन  चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु (Hon. Upper Superintendent of Police Rina Janbandhu) मा. उप विभागिय पोलीस अधिकारी श्री. दिपक साखरे (Hon. Deputy Divisional Police Officer Shri. Deepak Sugar)  राजुरा यांचे मार्गदर्शनात व मा पोलीस निरीक्षक श्री योगेश्वर पारधी  यांचे नेतृत्वात गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी इंचार्ज पोउपनी श्री. पांडुरंग हाके पोहवा सुनिल गौरकार, पोहवा किशोर तुमराम, पोशी महेश बोलगोडवार, पोशी तिरूपती जाधव, पोशी रामराव बिंगेवाड, पोशी योगेश पिदुरकर, सफौ. खुशाल टेकाम यांनी पार पाडली. (rajura Police) (mahawani) (chandrapur) (crime)

To Top