राजुरा येथे भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन.


महावाणी - विरेंद्र पुणेकर 

31 डिसेंबर २३

राजुरा  : भिमाकोरेगाव शौर्य दिना निमीत्त जगातिल महान यौध्द्यांना मानवंदना देण्यासाठी समता सैनिक दल  राजुरा तालुका शाखा तथा शहर शाखा च्या नेतृत्वात  दि.1 जानेवारी 2024 ला सकाळी 10:30. वाजता

बुध्दभूमी (बस स्टाप जवळ)  राजुरा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ( संविधान चौक ) ज्या ठिकाणी भव्य  56 फुट ऊंचिची भिमाकोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती ऊभारल्या गेली आहे. त्या स्त॔भास अभिवादन मार्च (पथसंचलन) शहराच्या मुख्य मार्गाने हजारो स्वातंत्र समता बंधुभाव ,न्याय या मानवी मुल्यावर  राष्ट्रिय ऐक्यावर प्रेम करणारे भारतिय नागरीक  मार्च मध्ये सहभागी होऊन विजय स्तंभास मानवंदना देणार आहेत.

त्यानंतर ऊपस्थितांना भोजनदान देण्यात येणार आहे. सायं 6:30 ते 8:00 वाजता मार्शल  एड.गौतम खरतडे सर, केंद्रिय सदस्य  स.सै.दल यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली भिमा कोरेगाव युध्दाचा इतिहास " वर मार्गदर्शन होणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख ऊपस्थिती म्हनुन मार्शल  विवेक बक्षी , मार्शल निवारण कांबळे , आनंद दुबे , प्रदिप पुणेकर  ,लवकुमार शिंदेसर , विजय अलोणे  , सर्वानंद वाघमारे  ,महिला विंग मनिषा गावंडे  ,सुनिता अलोणे  , लता कांबळे , साधना शिंदे , शारदा जगताप  ,पल्लवी रामटेके  ऊपस्थित राहणार आहे.  रात्रौ 8 ते 10 वाजता निळाई मंच संगीतमय संध्या सादर करणार आहे. विशेष म्हणजे मागील एक महिन्यापासुन स्तंभाची प्रतिकृती बनविने त्यास सुशोभित करणे  कार्यक्रमाचे नियोजन मार्शल श्रिनील कांबळे , रोशन ढोके  व संपुर्ण युवा मंडळी  तसेच  परीसरातिल सर्व बुध्द विहार  मंडळ कार्यक्रम यशस्वी करण्यात  प्रयत्न करीत आहेत.  अभिवादन मार्च मध्ये सामील होऊन   मार्ग दर्शनाचा लाभ घ्यावा असे जिल्हा निमंत्रक मार्शल प्रदिप पुणेकर  यानी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे! ( Organized Bhimakoregaon Shaurya Day program at Rajura. ) ( mahawani )

To Top