मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मन-की-बात कार्यक्रम

महावाणी - विरेंद्र पुणेकर

३१ डिसेंबर 23

राजुरा : स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी प्रसारित झालेल्या मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ( Hon. Prime Minister Narendra Modi ) यांच्या १०८ व्या मन-की-बात कार्यक्रमाचे सामुहिक दृकश्रवण राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे ( Devrao Bhongle ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. 

आजच्या मन की बात मध्ये मा. पंतप्रधानांनी निरोगी व सुदृढ शरीराच्या निर्मितीसाठी भारतीय व्यायामप्रकार आणि योगाची आवश्यकता विषद करत आपल्या जिवनात चैतन्य व सकारात्मक ऊर्जेसाठी त्यांचे महत्व मांडले. याचसोबतच काही दिवसांपुर्वी काशी येथे झालेल्या तमिळ भाषीय बांधवांच्या कार्यक्रमात मा. पंतप्रधानांनी AI भाषीनीचा वापर करून केलेल्या भखषणाचा संदर्भ देत या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आगामी काळात सर्वच क्षेत्रात होणाऱ्या उपयोगाची व्यापकता सांगीतली.

यावेळी विनोद नरेन्दुलवार, निलेश वडस्कर, गणेश मूनजेमवार, मनोहर ढोले, शुभम बलेवार, श्रावण मेडपल्लीवार, रोहन सिंग, वासू पाटकुल्ला, राजू गद्दे, राहुल शाहू, सुधाकर गिरसावळे, ममता सिंह, गुडीया सिंह, गणेश रागीट, जनार्धन दुर्योधन, आकाश निब्रड, अमोल मोरे, रूणाली उपरे, स्वप्निल मेकलवार यांचेसह आदी मंडळी उपस्थित होते. ( man ki bat ) ( mahawani ) ( rajura )

To Top