जवाहर नगर वार्डातील काटेरी झुडपं त्वरीत काढा.

 

महावाणी - विरेंद्र पुणेकर

३१ डिसेंबर २३

राजुरा : माता मंदिर परिसर जवाहर नगर येथील काटेरी झुडपे काडून स्वच्छता करण्याची मागणी मुख्याधिकारी, नगर परिषद राजुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे  माता मंदिर जवाहर नगर वार्ड वासीयांनी केली आहे.  राजुरा शहरातील जवाहर नगर वार्ड, माता मंदिर परिसरातीत काटेरी झुडूप मोठ्या प्रमाणात उगले असल्याने सदर परिसरात रानटी डुक्कर, जंगली जनावरांचा वावर वाढल्याचे वार्डवासियांतून बोलले जात आहे. सदर विषयाकडे  नगर परिषद यांचे दुर्लक्ष होत आहे असे नागरिकांनी केलेल्या निवेदनातून स्पष्ट होत आहे. जवाहर नगर वॉर्डला लागुन असलेल्या रिक्त जागे पासून रेल्वे मार्गा पर्यन्त काटेरी झुडपांचे जंगली साम्राज थाटले आहे. सदर भागा लगत लोकांची वस्ती, शाळा, महाविदयालये असून रानटी डुक्कर, वन्य श्वापद या भागात आपली हजेरी दर्शवली आहे. तसेच राजूरातून आशिफाबाद कडे जाणाऱ्या महामार्गाला सदर झुडपे लागून असल्याने रानटी डुक्कर, वन्य प्राणी आपल्या वेगवान गतीने सदर मार्गावर कुठल्याही वेळी आपले दर्शन देऊ शकते. त्यामुळे मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहतूक कर्त्यांचा अपघात होने नाकारता येत नाही. तसेच परिसरातील नागरिक झुडपात, रिक्त जागेत ओला, सुका कचरा, मृत जनावरे, प्रांणी टाकत असल्याने परिसर नेहमी घाणेरडा असल्याने परिसर दुर्गंधीत झाले असल्याने आजार उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. करीता नगर परिषद प्रशासनाने सदर परिसर स्वच्छ करण्याकरिता जवाहर नगर वासियांनी निवेदन दिले आहे. ! ( rajura ) ( mahawani ) ( nagar parishad rajura ) ( jawahar nagar rajuara )

To Top