सास्ती परिसराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

महावाणी- विरेंद्र पुणेकर
(१७ जुलै २०२३)

    राजुरा: सास्ती वेकोली शेत्र जसे  खनिजाने भरले आहे तसेच चोरट्याने देखील भरले दिसून येत आहे. सास्ती वेकोली शेत्रात गेल्या काही दिवसां पासून लोहा, कोळसा, तांबे, डीझेल, इत्यादी चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. सदर शेत्र सास्ती पोलीस चौकी (Sasti Police Chouki) शेत्रात येत असून सदर पोलीस चौकीचे चोरट्यान कळे दुर्लक्ष होत आहे. रात्रो दोन ते चार च्या सुमारास पोवणी- कढोली मार्ग तसेच गोवरी कॉलोनी- बाबापूर- कढोली मार्गाने रोज रात्रो मोठ्या प्रमाणात चोरट्यांची याता-यात दिसून येत आहे. सदर मार्गाने असलेल्या शेतातील शेती विषयक अवजारे, पाणी पंप, पाणी सोडण्याचे पाईप, लोखंडी अवजारे शेतातून चोरी गेल्याच्या तक्रारी याआगोदर झाल्या असून पोलीस प्रशासन याकळे दुर्लक्ष करत आहे. आज या प्रकारचे तक्रारी होऊन देखील पोलीस नियंत्रन वाहन सदर शेत्राकळे दुंकवून देखील बघत नाही असे बोलले जात आहे. चोरट्याच्या वाढत्या वावराने सदर मार्गावरील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रो कित्तेकदा चोरटे सदर गावात अश्रेयाला थांबले असे गावातून बोलले जात आहे. रात्रोच्या काळोखात गावातील पाळीवप्राणी चोरीला गेल्याची माहिती गावकर्यांनी दिली आहे. पुन्हा याच प्रकारच्या चोऱ्या नाकारता येत नाही चोरट्याच्या पोलीस प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा आणि रोज या शेत्रात रात्रो बारा ते सहा परियंत पोलीस नियंत्रन वाहनाची (PCR VAN) दस्त असावी असी मांग सदर गावकर्यातून होत आहे.


To Top