राजुरा तालुका शिवसेना आढावा बैठक व पक्ष प्रवेश संपन्न

Mahawani

महावाणी - विरेंद्र पुणेकर
(१७ जुलै २०२३)

        माननीय किरण भाऊ पांडव यांचे आदेशानुसार शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख श्री. नितीन मते यांचे सूचनेनुसार  श्री सचिन गोरे तालुका प्रमुख राजुरा यांनी शिवसेना तालुका राजुरा आढावा बैठकीचे आयोजन आज दिनांक १६/०७/२०२३ रोज रविवारला आयोजित केली .या बैठकीला माननीय बंडूभाऊ हजारे सह संपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा, श्री. हर्षल शिंदे युवा सेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य, श्री सूर्या अडबाले युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, तथा श्री आशिष ठेंगणे  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर यांची उपस्थिती होती .माननीय नितीन मत्ते जिल्हाप्रमुख शिवसेना यांनी माननीय किरण भाऊ पांडव यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेची परिस्थिती जाणून घेण्याकरिता आज राजुरा येथे बैठक बोलविण्याच्या सूचना दिल्या होत्या या बैठकी मध्ये नितीन मत्ते यांनी राजुरा तालुक्यातील शिवसेनेची स्थिती जाणून घेतली व तालुका प्रमुख सचिन गोरे यांना तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रा मध्ये असलेल्या ग्रामपंचायत नुसार प्रत्येक गावात जाऊन बुथ प्रतिनिधी व शिवदूत तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची शिवसेना वाढीसाठी शिवसेनेच्या विविध पदांवर नियुक्ती करून जिल्हा परिषद क्षेत्र वाईज अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा त्यामध्ये उप -तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, बुथ प्रतिनिधी, शिवदूत यांची नेमणूक करावी अशा सूचना दिल्या . यावेळी मार्गदर्शन करताना श्री. बंडूभाऊ हजारे सह -संपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा यांनी पक्ष वाढीसाठी जिल्हा शिवसेनेतर्फे जी मदत लागेल ती माननीय जिल्हा प्रमुखांना सूचना देऊन पूर्ण करून घ्यावी अशी सूचना दिली . यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश तालुका प्रमुख सचिन भाऊ गोरे यांचे नेतृत्वात व जिल्हाप्रमुख तसेच सह संपर्क प्रमुख, महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य युवा सेना, युवा सेना जिल्हाप्रमुख यांचे उपस्थितीत घेण्यात आला . यावेळी राजुरा तालुकातील राजुरा शहर प्रमुख म्हणून खुशाल भाऊ सूर्यवंशी यांची नेमणूक केली . यावेळी जि .प . क्षेत्र वाईज उप -तालुका प्रमुखांची नेमणूक केली . या मध्ये राकेश लांडे उप तालुका प्रमुख आर्वी - पाचगाव जि .प . क्षेत्र, नबी खाँ पठान उप -तालुका प्रमुख विरूर - देवाडा जि.प . क्षेत्र, शैलेश चटकी उप -तालुका प्रमुख सास्ती - गोवारी जि .प . क्षेत्र, तसेच श्री संदीप वैरागडे यांची तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली . यावेळी श्री राजूभाऊ गड्डमवार यांनी शिवसेने मध्ये पक्ष प्रवेश केला व त्यांची नियुक्ती युवा सेना तालुका प्रमुख राजुरा पदी करण्यात आली या बैठकीला राजुरा तालुक्यातील व राजुरा शहरातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top