ग्रामपंचायत मानोली (बूज) “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। WCD


लोकवाणी - विरेंद्र पुणेकर
(31 मे २०२३)

                    महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दिनांक ३१ मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याच निर्णयाला अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करीत ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन ग्रामपंचायत मानोली (बूज) कडून सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरुप म्हणून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ (नारळ), आणि रोख रक्कम (रु.५००/- प्रती महिला) ग्रामपंचायत कार्यालयात मानोली बूज च्या माध्यमातून वितरित करण्यात आले. या वेळी पारितोषिक विजेत्या- कुमारी. शबरी शेडमके, सौ. वर्षा भीमराव वनकर ग्रा.पं. सरपंच सौ. मंगला आत्राम, उपसरपंच- वरारकर, सदस्य- सुभाष आत्राम, विरेंद्र पुणेकर, अंगणवाडी सेविका- कमलाबाई कर्डभुजे, रत्नमाला सेडमाके,  परिचारिका- सौ. सारिका चेंनुरवार, ग्रा. पं शिपाई- सुधाकर विरुटकर उपस्थित होते।
To Top