Gondpipari Farmers Protest | गोंडपिपरी तालुका पुन्हा अतिवृष्टी यादीत समावेश हा फक्त "शेतकऱ्यांचा विजय"

Mahawani
0
Shantanu Dhote, Youth Congress and a photograph of Vika found in the water

पैशाच्या जोरावर खोट्या बातम्या प्रसिद्ध करून राजकारण तापवने म्हणजे "आयत्या बिळावर नागोबा"

Gondpipari Farmers Protest | राजुरागोंडपिपरी तालुका पुन्हा अतिवृष्टीग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आल्याची बातमी काही मेजवानी प्राप्त माध्यमांनी “आमदारांचा मोठा दिलासा” म्हणून मिरवली. पण हा निर्णय फक्य शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे, ना की कोणत्याही आयात आमदाराचा “राजकीय उपकार”, असे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनु धोटे यांनी ठामपणे सांगितले. धोटे यांच्या मते, हह्या बातम्या पूर्णतः दिशाभूल करणाऱ्या असून पैशाच्या जोरावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.


गोंडपिपरी तालुक्याचा समावेश ९ ऑक्टोबरच्या यादीत आधीपासूनच होता. मात्र एका रात्रीत तालुक्याचं नाव वगळण्यात आलं — आणि हे कोणाच्या आदेशाने झालं, हे समाजाला ठाऊक आहे. गुरूंनीच चेल्याला धोका दिला. या निर्णयाने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आणि संपूर्ण तालुक्याची फसवणूक झाली.
— शंतनू धोटे जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस, चंद्रपूर


सत्ताधाऱ्यांचा ढोंगीपणा आणि माध्यमांची खोटी बाजू

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांकडून घेतलेली भूमिका ढोंगी आणि असंवेदनशील असल्याचा आरोप करत धोटे म्हणाले की, “काही माध्यमांनी पैशाच्या लालसेपायी वस्तुस्थिती विकली. शेतकऱ्यांचा लढा हा आमदाराच्या उपकारात दाखविण्याचा प्रयत्न म्हणजे पत्रकारितेचा अपमान आहे.”

Gondpipari Farmers Protest

त्यांनी प्रश्न उपस्थित केला — जर खरोखर सत्ताधारी शेतकऱ्यांविषयी संवेदनशील असतील, तर मग त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी काय केलं? सरसकट कर्जमाफीबाबत ते मौन का बाळगतात? बी-बियाणे, खत, आणि विजेच्या दरांवर ते आवाज का उठवत नाहीत?

Gondpipari Farmers Protest

“वाघ दिवसाढवळ्या शेतकरी आणि मजुरांना उचलून नेतो आहे, आणि वनमंत्री तुमचे असूनही तुम्ही चुप्पी साधली आहे. मग त्या पदाचा उपयोग तरी काय?” असा तीव्र प्रश्न धोटेंनी उपस्थित केला.

Gondpipari Farmers Protest

शेतकऱ्यांच्या आंदोलनाने प्रशासन झुकले

गोंडपिपरीचा समावेश पुन्हा करण्यात आला तो कोणत्याही आमदाराच्या हस्तक्षेपामुळे नव्हे, तर जनतेच्या दबावामुळे आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे, असे धोटे ठामपणे म्हणाले.

“हा विजय आहे संघर्षाचा, आंदोलनाचा, आणि शेतकऱ्यांच्या चिकाटीचा. जे जमिनीवर लढले, त्यांनीच हा निकाल आणला. राजकीय श्रेय घेणाऱ्यांनी आरशात बघावं,” असे त्यांनी सडेतोड शब्दांत सांगितले.

Gondpipari Farmers Protest

धोटे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, “गोंडपिपरीचा समावेश कागदावर नको — प्रत्यक्ष मदत, कर्जमाफी आणि नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. अन्यथा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल.”

Gondpipari Farmers Protest

“दादा निभावतात वादा” की “दादा निभावतात प्रचार”?

भाजपकडून “दादा निभावतात वादा” असा प्रचार केला जातो. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र हेच “दादा” मौन धारण करतात, असा टोला धोटेंनी लगावला. “सोशल मीडियावर पोस्ट टाकणं, फोटो काढणं, आणि खोट्या बातम्यांना निधी देणं — एवढंच आजच्या सत्ताधाऱ्यांचं शेतकरीप्रेम आहे. पण जेव्हा शेतात उभं राहून शेतकऱ्यांसोबत संवाद साधायचा प्रसंग येतो, तेव्हा त्यांची हिंमत कुठेच दिसत नाही.” त्यांनी पुढे म्हटलं, “खरी सेवा ती, जी जनता जाणते. पैशाने बातमी विकत घेता येईल, पण जनतेचा विश्वास विकत घेता येत नाही.”

Gondpipari Farmers Protest

पत्रकारितेवरही गंभीर प्रश्नचिन्ह

धोटेंनी पत्रकारितेच्या जबाबदारीबद्दलही गंभीर भाष्य केले. “पत्रकारिता म्हणजे सत्तेची गुलामी नव्हे. सत्तेवर प्रश्न विचारणं, सत्य उघड करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं ही खरी पत्रकारितेची कसोटी आहे. पण काही मीडियाने या कसोटीचं उल्लंघन केलं आहे,” अशी टीका करत त्यांनी माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं.

Gondpipari Farmers Protest

युवक काँग्रेसचा स्पष्ट इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युवक काँग्रेस ठाम असून, भविष्यातील प्रत्येक अन्यायाला तोंड देण्यासाठी तयार आहे, असा इशारा धोटेंनी दिला. “गोंडपिपरीचा प्रश्न फक्त एका तालुक्याचा नाही, तर तो संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांचा आहे. ही लढाई आर्थिक न्यायाची आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

Gondpipari Farmers Protest

नागपूर शेतकरी आंदोलनाला युवक काँग्रेसचा पाठिंबा

धोटे यांनी जाहीर केलं की, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस बच्छू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नागपूर शेतकरी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहे. “आमचे युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि युवा शेतकरी नागपूर आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. आम्ही रस्त्यावर उतरण्याला मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्येक मागणीसाठी आम्ही सज्ज आहोत.”

Gondpipari Farmers Protest

‘राजकारणाच्या नफ्यासाठी नव्हे, शेतकऱ्यांच्या नाशाविरुद्ध लढा’

धोटेंनी स्पष्ट केलं की, युवक काँग्रेसचा लढा हा राजकीय नफा-तोट्याच्या गणितावर नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर आधारित आहे. “आम्ही मतांसाठी नव्हे, तर मातीसाठी लढतो. ही माती म्हणजे शेतकऱ्याचं अस्तित्व — आणि त्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत.”

Gondpipari Farmers Protest

शेवट करताना धोटेंनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं — “लोकांच्या संघर्षावर आपलं नाव कोरणारे नेते इतिहासात टिकत नाहीत. कारण शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकीय फुलं उमलत नाहीत. आम्ही शब्द नव्हे, कृती दाखवू.”

Gondpipari Farmers Protest

गोंडपिपरी तालुक्याचा अतिवृष्टी यादीत पुनः समावेश हा कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम नसून, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आणि जनतेच्या दबावाचा थेट परिणाम आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनु धोटे यांनी सत्ताधाऱ्यांच्या “खोट्या श्रेयवादावर” कठोर प्रहार करत, पत्रकारितेच्या नैतिकतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Gondpipari Farmers Protest

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु झालेला हा संघर्ष आता विदर्भाच्या राजकारणात नवी लाट निर्माण करणार, हे निश्चित आहे.

“सत्ता येते-जाते, पण सत्य कायम राहतं — आणि आज ते सत्य शेतकऱ्यांच्या बाजूने उभं आहे.”


Why did Shantanu Dhote criticize the BJP over Gondpipri’s inclusion in the flood relief list?
Dhote alleged that BJP leaders took false credit for the decision, which was actually the result of farmers’ protests and public pressure, not any MLA’s intervention.
Was Gondpipri previously included in the heavy rainfall-affected list?
Yes, Gondpipri was already part of the October 9 list, but it was later removed and reinstated only after widespread outrage and protests.
What demands has the Youth Congress made regarding Gondpipri’s farmers?
The Youth Congress demands direct compensation, loan waivers, and immediate crop insurance settlements for affected farmers, not just symbolic inclusion on paper.
How is the Youth Congress supporting the ongoing farmers’ movement?
Under Dhote’s leadership, the Chandrapur District Youth Congress has extended full support to Bachchu Kadu’s Nagpur protest and pledged to join any future demonstrations for farmers’ rights.


#Gondpipri #FarmersProtest #ShantanuDhote #YouthCongress #Chandrapur #VidarbhaPolitics #MaharashtraNews #BJP #PoliticalScam #FarmersRights #AgricultureCrisis #HeavyRainRelief #FarmersStruggle #TruthPrevails #RuralVoice #MediaEthics #IndianPolitics #CongressYouth #FarmersMovement #VidarbhaNews #FarmersFirst #FarmersWelfare #RuralMaharashtra #BachchuKadu #NagpurProtest #PoliticalAccountability #FarmersUnity #JusticeForFarmers #AntiCorruption #GrassrootPolitics #YouthPower #FarmersLivesMatter #SpeakUpForFarmers #AgricultureIndia #MaharashtraPolitics #FarmersRevolt #ChandrapurNews #FarmersVoice #PoliticalTruth #FarmersVictory #GondpipriFloods #FarmersCrisis #FarmersSupport #FarmersAwakening #FarmersFightBack #FarmersDemandJustice #FarmersRightsIndia #FarmersUprising #FarmersSolidarity #FarmersOfIndia #RajuraNews #GondpipariNews #VeerPunekarReport #MahawaniNews #Mahawani #RajuraUpdate

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top