भाजप नेत्यांच्या कारस्थानामुळे लोकशाही धोक्यात
Rajura Duplicate Voters | राजुरा | लोकशाहीचा पाया म्हणजे स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रिया. पण या पायाला पोखरण्याचे काम जर थेट सत्ताधारी पक्षाचे नेते करू लागले, तर लोकशाहीला कोण वाचवणार हा प्रश्न प्रत्येक प्रामाणिक मतदारास छळू लागला आहे. देशभरात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या "मत चोरी"च्या मुद्द्यानेच आधीच खळबळ माजवली आहे. त्यावर अजून धूळ खाली बसलेली नसताना आता चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा विधानसभा क्षेत्रातून समोर आलेल्या दुबार नावांच्या प्रकरणाने लोकशाहीला हादरा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या जबाबदारीवरच जनतेचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे.
Rajura Duplicate Voters
राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादी तपासताना तीन प्रभावशाली भाजप नेत्यांची दुबार नावे उघडकीस आली आहेत. हे सर्वजण राजकीयदृष्ट्या सक्रिय असून, नगरपरिषद व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सक्रीय भूमिका बजावणारे आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे दुबार मतदानाची संधी असल्याचा आरोप सरळसरळ लोकशाहीला चाप लावणारा आहे.
Rajura Duplicate Voters
भाजपचे माजी गडचांदूर शहराध्यक्ष व माजी नगरपरिषद सदस्य सतीष उपलेंचीवार हे प्रत्यक्षात नांदा येथे राहत नसतानाही त्यांचे नाव नांदाच्या मतदार यादीत नोंदवले गेले आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या पत्नी व मुलींची नावे गडचांदूर नगरपरिषद मतदार यादीत कायम आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांचे नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणे हा सरळ कायदा व निवडणूक प्रक्रियेचा भंग आहे.
Rajura Duplicate Voters
याचप्रमाणे, जीवती पंचायत समितीचे माजी सभापती व भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष महेश देवकते यांची नावेही दोन ठिकाणी नोंदलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वणी (बुज.) येथे त्यांचे नाव अस्तित्वात असताना गडचांदूर नगरपरिषदेच्या मतदार यादीतही ते कायम आहे. अशा प्रकारे दोन मतदार यादीत नावे असल्यामुळे ते दोन्ही ठिकाणी मतदान करण्याच्या पात्रतेसह उभे आहेत.
Rajura Duplicate Voters
तिसरे प्रकरण म्हणजे भाजप युवा नेते व उद्योजक निलेश ताजणे यांचे. गडचांदूर नगरपरिषद आणि बाखर्डी ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणच्या यादीत त्यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी गडचांदूर नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. अशा व्यक्तीकडे दोन ठिकाणी मतदानाची संधी असणे हे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर थेट आघात करणारे आहे.
Rajura Duplicate Voters
दुबार नावे – निवडणूक प्रक्रियेवर काळा डाग
लोकशाहीचे वैधत्व हेच मतदारांच्या प्रामाणिक सहभागावर अवलंबून असते. परंतु जेव्हा सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांचीच नावे दुबार यादीत दिसतात, तेव्हा सामान्य मतदारांच्या विश्वासाला गालबोट लागते. नगरपरिषद निवडणुकीत एकदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा मतदान करण्याची सोय भाजप नेत्यांना उपलब्ध झाली आहे, हे वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते.
Rajura Duplicate Voters
ही बाब केवळ तांत्रिक चूक किंवा अपघात नाही. कारण एकाच नेत्यांची अनेक वर्षे राजकीय भूमिका असूनसुद्धा त्यांची नावे वेगवेगळ्या यादीत कायम राहणे हा सरळ कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप जनतेतून होऊ लागला आहे. ही परिस्थिती दुरुस्त न केल्यास लोकशाहीचा पाया ढासळण्यास वेळ लागणार नाही.
Rajura Duplicate Voters
मत चोरीच्या चर्चेतून राजुरातील घडामोडींकडे लक्ष
संपूर्ण देशभरात सध्या "मत चोरी" हा विषय राजकीय वादळ निर्माण करीत आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेत छेडछाड होत असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजप व निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. अशा वातावरणात राजुरा विधानसभा क्षेत्रातील ही घटना भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे.
Rajura Duplicate Voters
कारण, जर सरळसरळ नेत्यांचीच दुबार नावे असतील तर कार्यकर्त्यांच्या, समर्थकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या यादीत किती प्रमाणात दुबार नावे असतील, हा नैसर्गिक प्रश्न उभा राहतो. या प्रकारामुळे राजकीय लाभासाठी मतदार यादीचे जाणीवपूर्वक फेरबदल केले जात असल्याची शंका बळावली आहे.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोग हा देशाच्या लोकशाहीचा संरक्षक मानला जातो. पण जेव्हा थेट मतदार यादीतील चुका किंवा गैरव्यवहार उघडकीस येतात, तेव्हा आयोगाची निष्क्रियता आणि पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहते. आयोगाने दरवर्षी मतदार यादी पुनरावलोकनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीसुद्धा राजुरा सारख्या विधानसभा क्षेत्रात इतकी उघडकीची व अनधिकृत दुबार नावे राहणे हा आयोगाच्या कारभारावर काळा डाग आहे.
Rajura Duplicate Voters
जर ही दुबार नावे तातडीने वगळली नाहीत, तर केवळ लोकशाही प्रक्रियेवरच नाही तर मतदारांच्या विश्वासावरही घाला बसेल. आज जनता "आयोग लोकशाहीचे रक्षण करते की सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली वागत आहे?" हा प्रश्न थेट विचारत आहे.
Rajura Duplicate Voters
भाजपच्या नैतिकतेवर आघात
लोकशाहीचे तत्त्व सांगणारा भाजप जर आपल्या नेत्यांनाच दुबार नावे ठेवू देत असेल, तर पक्षाच्या नैतिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. एका बाजूला "एक देश – एक निवडणूक"चा गजर करीत पारदर्शकतेची भाषा करणारा पक्ष, आणि दुसऱ्या बाजूला दोन-दोन मतदार यादीत आपली नावे ठेवणारे त्याचेच नेते. ही सरळ सरळ दुटप्पी भूमिका आहे.
Rajura Duplicate Voters
भाजपकडून या प्रकरणात स्पष्टीकरण अपेक्षित आहे. अन्यथा राजुरातील घोटाळा हा राष्ट्रीय पातळीवरील "मत चोरी"च्या वादात ठळक ठरणार हे निश्चित आहे.
Rajura Duplicate Voters
लोकशाहीचा पाया धोक्यात
राजुरा विधानसभा क्षेत्रातील दुबार नावे ही केवळ स्थानिक घटना नाही. ही देशातील लोकशाही प्रक्रियेला गालबोट लावणारी गंभीर बाब आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच जर कायद्याचा गैरफायदा घेऊन स्वतःसाठी दुबार मतदानाची संधी जपली, तर ही परिस्थिती संपूर्ण निवडणूक व्यवस्थेलाच कलंक लावणारी आहे.
Rajura Duplicate Voters
लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक आयोगाने या नेत्यांची नावे तातडीने रद्द करणे, जबाबदारी निश्चित करणे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा राजुरातून उफाळलेली ही ठिणगी देशभरातील लोकशाहीच्या विश्वासाला राख करणारी ठरेल.
What is the controversy in Rajura about?
Who are the leaders named in this duplicate voter list issue?
Why is this case considered serious for democracy?
What action is expected from the Election Commission?
#Rajura #Chandrapur #BJP #DuplicateVoters #VoterFraud #ElectionScam #DemocracyAtRisk #VoterList #ElectionCommission #VoteScam #PoliticalCorruption #BJPLeaders #RajuraAssembly #ChandrapurPolitics #VoteRigging #DuplicateNames #ElectoralFraud #Election2025 #IndiaPolitics #Opposition #RahulGandhi #VoteScandal #VoterIDFraud #ElectionReform #StopVoterFraud #SaveDemocracy #ElectionCommissionFail #DoubleVoting #VoterRights #PoliticalFraud #ElectionCorruption #BJPControversy #RajuraNews #ChandrapurNews #IndianDemocracy #ElectionIntegrity #VotingRights #ElectionCrisis #VoteTheft #PoliticalScam #CorruptPolitics #ECIAccountability #BJPUnderFire #RajuraAssemblyElection #VoterScam #VoterCheating #ElectionProbe #DuplicateEntries #ElectionMisuse #PoliticalAccountability #IndiaNews #MahawaniNews #MarathiNews #RajuraNews #KorpanaNews #JiwatiNews #VeerPunekarReport #SurajThakreNews #CongressNews #GondpipariNews #EciNews #ElecationNews