के.डी. फूड जंक्शनच्या गल्लीतील कारवाई; गुन्हा नोंद, पोलिसांकडून तपास सुरू
Illegal Weapon Rajura | राजुरा | शहरातील के.डी. फूड जंक्शनच्या बाजूला असलेल्या गल्लीत एका ३२ वर्षीय युवकाकडून धारदार व टोकदार तलवार सापडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी वेळेवर कारवाई करत आरोपीस अटक केली असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते यांच्या फिर्यादीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५२/२०२५ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यानुसार नोंद करण्यात आला आहे.
आरोपी मारोती शंकर तग्रपवार (वय ३२ वर्षे, रा. चुनाभट्टी वॉर्ड, राजुरा) Illegal Weapon Rajura तो सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे धारदार व टोकदार लोखंडी तलवार बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, डीबी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कारवाईदरम्यान आरोपीकडून एक निमुळती, धारदार लोखंडी तलवार (एकूण लांबी ८४ सें.मी.) हस्तगत करण्यात आली. Illegal Weapon Rajura सदर तलवारीची अंदाजे किंमत ₹१,०००/- असून, पोलिसांनी ती जप्त करून राजुरा पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मोहररकडे जमा केली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपी के.डी. फूड जंक्शन बाजूला असलेल्या भंगार दुकानात काम करत असून स्थानिकांच्या माहिती नुसार सदरची तलवार याच भंगार दुकान परिसरातून दहशत मिरवण्यासाठी बाहेर काढली? तरी पोलीस त्याचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास आहे का, किंवा तो कुठल्या टोळीशी संबंधित आहे का यासंदर्भात तपास करीत आहे.
ही कारवाई राजुरा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भीष्मराज सोरते, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, पो.शी. शफीक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवाड, अविनाश बांबोळे, आणि राजीव दुबे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शहरात तलवारसारख्या घातक शस्त्रासह फिरणाऱ्या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Illegal Weapon Rajura अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि सार्वजनिक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सजग आहे.
राजुरा पोलिसांनी ही वेळेवर केलेली कारवाई ही केवळ एक यशस्वी हस्तक्षेप नाही तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणारी घटना ठरली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या परिसरात संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून अशा घटनांवर वेळीच नियंत्रण ठेवता येईल.
दरम्यान, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. Illegal Weapon Rajura तपास पूर्ण होईपर्यंत आरोपी पोलिस कोठडीत राहणार असून, अधिक माहिती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
What happened in Rajura on August 1, 2025?
Who was the accused in the case?
What legal action was taken by the police?
Who conducted the police operation?
#IllegalWeaponRajura #RajuraNews #IllegalWeapon #ArmsAct #SwordSeized #PoliceAction #ChandrapurPolice #CrimeNews #PublicSafety #RajuraUpdate #WeaponRecovery #ArmsActCase #IllegalArms #SharpWeapon #PoliceInvestigation #CriminalArrested #RajuraCrime #LawAndOrder #PoliceAlert #DBTeam #KDFoodJunction #CrimeWatch #WeaponSeizure #DangerousWeapon #LocalCrime #ChandrapurUpdates #WeaponCrackdown #PoliceOnDuty #DBSquad #RajuraPoliceStation #SafetyFirst #ChandrapurCrime #WeaponLaws #ArmsActIndia #IllegalSword #CrimeControl #ArrestNews #CriminalCaught #PatrollingSuccess #PoliceSuccess #CommunitySafety #CriminalInvestigation #LawEnforcement #WeaponCharges #NewsAlert #BreakingNews #PoliceForce #StreetSafety #CityCrime #Arrested #WeaponBan #PoliceResponse #MahawaniNews #MarathiNews #VeerPunekarReport #RajuraCrime #Bhishmarajasorate #SumitParteki #KishoreTumRaam #VickyNirvana #RameshwarChahare #ShafikSheikh #MaheshBolGodwar #Shardarathod #AnandMore #BalajiYamalwad #AvinashBambole #RajivDube