MPDAखाली विनित तावडेला तुरुंगाची वेस
MPDA Action Chandrapur | चंद्रपूर | शहरात आणि जिल्ह्यात राक्षसी अवतार घेऊन सामान्य माणसाच्या जगण्यात रोजचा उच्छ्वास घालणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलीस प्रशासनाने अखेर MPDAचा चाप बसवला आहे. घरफोड्या, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार प्रयत्न, अवैध हत्यार बाळगणे, धमक्या, जाळपोळ आणि जनजीवन अस्थिर करणाऱ्या कारवायांनी समाजात दहशत पसरवणाऱ्या ‘विनित नानाजी तावडे’ या सराईत गुन्हेगाराला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
२८ वर्षीय विनित तावडे, रा. बापट नगर, ओम भवन जवळ, चंद्रपूर — या व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर व बल्लारपूर येथे तब्बल १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. MPDA Action Chandrapur या गुन्ह्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, दहशतीच्या धमक्या, आणि जनतेला हैराण करणाऱ्या अन्य कृत्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांची पद्धत आणि सातत्य पाहता प्रशासनाने त्याला सामान्य गुन्हेगार न मानता ‘धोकादायक इसम’ म्हणून MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा निर्णय घेतला.
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांनी जिल्ह्यातील अशा धोकादायक गुन्हेगारांविरुद्ध एक विशेष मोहीम सुरू केली असून, MPDA कायद्याचा वापर करून अशा व्यक्तींना तुरुंगात डांबण्याचे ठोस नियोजन केले आहे. याच धोरणांतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री आसिफराजा शेख यांनी विनित तावडेविरुद्ध MPDA कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार केला.
कलम ३ (१) अंतर्गत, महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडीओ पायरेट्स, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात वापरल्या जाणाऱ्या MPDA कायद्यानुसार हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. MPDA Action Chandrapur स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांनी संपूर्ण दस्तऐवजाची बारकाईने छाननी केली. त्यानंतर सपोनि श्री योगेश खरसान (ठाणेदार, पोस्टे कोठारी) यांनी अंतिम प्रस्ताव तयार केला.
हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर होताच, मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तत्काळ MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. त्यानुसार विनित तावडेला तातडीने अटक करून चंद्रपूर जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले.
ही कारवाई म्हणजे केवळ एका गुन्हेगाराला स्थानबद्ध करणं नव्हे, तर चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचा फडशा पाडण्याचे एक जाहीर युद्धसंग्राम आहे. MPDA Action Chandrapur जनता दमली होती, घाबरली होती, रोजच्या जगण्यात दहशतीचा श्वास घेत होती. पण पोलिसांनी दाखवलेल्या निर्णायकतेमुळे आता दहशतीच्या अंधारात पुन्हा कायद्याचा उजेड झळकू लागलाय.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील गुन्हेगारी पाशाला छेद देण्यासाठी MPDA हे शस्त्र प्रभावी ठरत आहे. MPDA Action Chandrapur अशा ठोस कारवायांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण होतोय आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आता "बेल नाही, जेलच!" या संदेशासोबत कठोर इशारा मिळतोय.
Who is Vinit Tawade?
What legal action was taken against him?
Why was action delayed despite so many offences?
What is the MPDA Act?
#MPDA #ChandrapurCrime #VinitTawade #HabitualOffender #PoliceAction #MaharashtraNews #CrimeReport #LawAndOrder #JailForCriminals #MPDAAct #ChandrapurPolice #BreakingNews #CriminalBehindBars #JusticeForPublic #FearlessJournalism #GroundReport #BoldNews #MarathiNews #LocalCrime #SeriousOffences #PublicSafety #PoliceAlert #StopCrime #15Cases #ArrestedNow #WhySoLate #ToughLaws #NoSafeHaven #CriminalWatch #LawEnforcement #ZeroTolerance #Crackdown #DangerousCriminal #MPDAAlert #CitizenRights #DistrictCollector #ChandrapurUpdates #ActionTaken #CrimeControl #LegalAction #GundaGiriBand #FearInPublic #DelayedJustice #WakeUpSystem #PoliceResponsibility #BoldReporting #NewsThatMatters #ExposeTruth #DemandAccountability #PublicQuestions #ChandrapurNews #MarathiNews #VeerPunekarReport