रेल्वे वसाहतीजवळ अवैध शस्त्रासह युवक अटकेत, डिबी पथकाची वेळीच कारवाई
Rajura Illegal Weapon Case | राजुरा | स्थानिक सोनिया नगर रेल्वे वसाहतीसमोरील परिसरात एका १९ वर्षीय युवकाकडून अवैध शस्त्र साठा आढळून आला असून राजुरा पोलीसांनी सदर व्यक्तीकडून धारदार लोखंडी तलवार जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी (दि. २६ जुलै २०२५) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास केली.
राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते यांच्या फिर्यादीवरून अकिब नासिर खान (वय १९, रा. चुनाभट्टी वॉर्ड, राजुरा) याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३४६/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
शस्त्राचे वर्णन
आरोपीकडून जप्त करण्यात आलेली धारदार व टोकदार तलवार ही चमकदार पाते असलेली असून, तिची एकूण लांबी ८१ सेमी आहे. Rajura Illegal Weapon Case मुठीपासून टोकापर्यंत मोजले असता मुठची लांबी १६ सेमी तर पात्याची लांबी ६५ सेमी व मध्यभागी रुंदी ७ सेमी आहे. सदर शस्त्राची अंदाजे किंमत ₹२०००/- असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रँच पथकाने केली. Rajura Illegal Weapon Case यामध्ये पोउपनि. भीष्मराज सोरते, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, शफीक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवाड, अविनाश बांबोळे आणि राजीव दुबे यांचा समावेश होता.
गुन्ह्यातील पुढील तपास सुरू
सदर शस्त्रसाठा आरोपीने कोणत्या उद्देशाने जवळ बाळगला होता, याचा तपास सध्या राजुरा पोलीस करत असून पुढील तपासासाठी जप्त मुद्देमाल पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मोहररकडे जमा करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शहरात अवैध शस्त्र साठ्याचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून, पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य गुन्हा टळला असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. Rajura Illegal Weapon Case तसेच पोलीस प्रशासनाच्या गस्तीत आणखी काटेकोरपणा अपेक्षित असल्याचेही स्थानिकांकडून सूचित करण्यात आले.
Who was caught with the illegal weapon in Rajura?
What charges were filed against the accused?
Where and when did the incident take place?
Who conducted the police operation?
#RajuraNews #IllegalWeapon #ArmsActViolation #PoliceAction #SwordSeized #YouthArrested #DBSquad #ChandrapurDistrict #RailwayColonyRaid #CrimeNews #WeaponRecovery #RajuraPolice #CriminalCase #MaharashtraNews #UnderArrest #SwordCase #IndianArmsAct #CrimePatrol #WeaponsInPublic #PoliceInvestigation #YouthCrime #RajuraUpdates #ChandrapurCrime #BreakingNews #PublicSafety #WeaponSeizure #LocalCrimeNews #19YearOldArrested #RajuraIncident #LawEnforcement #PoliceAlert #PoliceCrackdown #DBTeamAction #IllegalArmsCase #CrimePrevention #WeaponControl #UrbanSafety #CrimeAwareness #RajuraYouth #PoliceForce #FieldOperation #SafetyFirst #WeaponBan #MaharashtraCrime #RajuraLiveNews #LegalAction #CriminalLaw #PublicAlert #CivicSafety #SwordArrest #MahawaniNews #VeerPunekarReport #Batmya #MarathiNews #SumitParteki ##Bhishmarajasorate