पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने नियुक्त्यांना तात्पुरती स्थगिती; फसव्या पदाधिकाऱ्यांना थेट शिक्षा
Shiv Sena Appointments | वरोरा | विदर्भातील शिवसेना संघटनेत गोंधळ उडवणाऱ्या आणि पक्षशिस्त धाब्यावर बसवणाऱ्या भ्रामक पदाधिकाऱ्यांना अखेर कडक इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात वरोरा-भद्रावती, राजुरा आणि चिमूर या विधानसभा क्षेत्रांतील ज्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली होती, त्या सर्व नियुक्त्या पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्ट आदेशाने तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
याबाबत दि. २४ जुलै २०२५ रोजी वरोरा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कठोर भाषेत स्पष्ट सांगितले की, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही कोणीही नियुक्तीपत्राचा किंवा पदाचा गैरवापर करताना आढळल्यास त्या व्यक्तीविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, आणि संबंधिताला पक्षाच्या कोणत्याही पदावरून तात्काळ हटवण्यात येईल.”
पक्षशिस्तीवर लाथ – आता सहन होणार नाही
शिवसेना ही केवळ घोषणा किंवा बॅनर लावून कार्य करायची जागा नाही, हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार स्पष्ट करत आले आहेत. परंतु, काही अपात्र व्यक्तींनी पदनियुक्त्यांच्या आधीच स्वतःला पदाधिकारी घोषित करत सामाजिक माध्यमांपासून बॅनरबाजीपर्यंत निव्वळ गोंधळ माजवला. हे प्रकार पक्षाच्या मूलभूत शिस्तीला काळिमा फासणारे आहेत.
गेल्या ५ जून २०२५ रोजी ‘सामना’ वृत्तपत्रातून जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आता स्थगित करण्यात आल्याने या प्रकरणात अधिक गंभीरता आली आहे. पक्षनिष्ठेऐवजी हडेलहप्पी पद्धतीने स्थान मिळवणाऱ्या आणि बाहेरून आलेल्या लोकांना पुन्हा पदावर लादल्यास, पक्षामध्ये पुन्हा फुटीची भीती निर्माण होईल, असा थेट इशारा कट्टर शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.
“निवड कट्टर शिवसैनिकाचीच होणार” — संदीप गिर्हे
जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी यावेळी ठामपणे सांगितले की, “विदर्भ संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या अहवालानुसारच नव्या नियुक्त्या निश्चित होतील आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून शिवसेनेची ध्वजा उंचावणाऱ्या कट्टर शिवसैनिकालाच पद मिळेल.”
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ज्यांनी पक्षासाठी खांदे मिळवले, जेलमध्ये गेले, ज्यांनी मनसेच्या गडात भगवा फडकवला – त्यांनाच आता सन्मान मिळायला हवा. बाहेरून आलेल्या आणि चुकूनही शिवसेना फलक न लावणाऱ्या लोकांवर जर पदे लादली गेली, तर आम्ही गप्प बसणार नाही.”
“फसव्या लेटरबाजांची नावं जाहीर करा” — शिवसैनिकांची मागणी
प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित काही वरिष्ठ शिवसैनिकांनी अगदी रोखठोकपणे मागणी केली की, “गैरवापर करणाऱ्या व्यक्तींची यादी जिल्हा पातळीवर जाहीर करण्यात यावी. सोशल मीडियावर स्वतःला ‘तालुका प्रमुख’, ‘संघटक’, ‘उपप्रमुख’ म्हणून घोषित करणाऱ्यांवर पक्षशिस्तीचे कठोर उदाहरण व्हावे.”
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्यासह दत्ता बोरेकर, मनीष जेठाणी, वैभव डहाणे, बंडू डाखरे, अमित निब्रड, गणेश जानवे हे सर्व कट्टर शिवसैनिक उपस्थित होते. या सर्वांनी नियुक्त्या स्थगितीत करण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगतानाच, पुढील निवड प्रक्रियेत जिल्ह्याच्या भूमिपुत्रांना आणि निष्ठावान शिवसैनिकांना वगळल्यास संघर्ष अटळ असल्याचे ठासून सांगितले.
शिवसेनेतील शिस्त नव्याने परिभाषित
या साऱ्या घडामोडींनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता कोणत्याही प्रकारच्या अनुशासनभंगाला पाठीशी घालणार नाहीत. शिवसेना आता पुन्हा एकदा शिस्त, पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर उभारी घेत आहे.
गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा, निवड फक्त भूमिपुत्र कट्टर शिवसैनिकांचीच, बाहेरून आलेल्यांना दार बंद – असा थेट संदेश या पत्रकार परिषदेतून दिला गेला आहे.
राजकीय पातळीवर हा निर्णय विदर्भातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक निर्णायक टप्पा ठरेल, हे नक्की. आता उरली आहे ती केवळ खरी शिवसेनापरंपरा जपणाऱ्या कार्यकर्त्यांची नव्याने निवड – आणि ती देखील पूर्णपणे प्रामाणिकतेच्या कसोटीतूनच!
What action did Uddhav Thackeray take regarding recent Shiv Sena appointments?
What happens to those misusing the cancelled appointment letters?
When were the now-cancelled appointments originally announced?
Who addressed the media and confirmed these developments?
#UddhavThackeray #ShivSena #MaharashtraPolitics #WaroraNews #Rajura #Chimur #ShivSenaAppointments #PoliticalAlert #SenaOrder #SenaLeadership #SenaDirective #SenaPower #MaharashtraUpdates #ShivSainik #PartyDiscipline #AssemblyUpdate #FIRWarning #LetterMisuse #SenaStronghold #PoliticalCrisis #AppointmentsWithdrawn #PartyUnity #ShivSenaNews #DistrictChiefStatement #PressConference #SenaReform #PrashantKadam #SandeepGirhe #SenaInternalOrder #FakeAppointments #SenaConflict #FIRAgainstMisuse #ChandrapurNews #PoliticalTransparency #MaharashtraAssembly #LeadershipShakeup #ShivSenaFuture #GrassrootsCadre #SenaInstructions #StrictActionSena #SenaCadreWarning #UddhavCommand #ChimurUpdate #WaroraPolitics #RajuraAlert #AppointmentScam #SenaToughStand #PartyCleanUp #RealShivSainik #Samna #MahawaniNews #VeerPunekarReport #Batmya #MarathiNews #RajuraNews #ChandrapurUpdate