घरफोडीतील आरोपींना अटक, गोवंश तस्करी उघड
Chandrapur Crime | चंद्रपूर | १२ जुलै २०२५ चंद्रपूर जिल्ह्यात दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी वेगवेगळी महत्त्वपूर्ण कारवाई करत आरोपींना अटक केली असून, चोरीचा ऐवज आणि गोवंश जनावरे हस्तगत करण्यात आले आहेत.
वरोरा: घरफोडी प्रकरणात तीन कुख्यात गुन्हेगार अटकेत
दिनांक ११ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक वरोरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तीन रेकॉर्डवरील गुन्हेगार (१) अनिल उर्फ कुंभकर्ण येलज्जी लोणारे (३० वर्ष), (२) अरविंद उर्फ कावळा नामदेव सातपुते (३८ वर्ष), (३) रंगा शंकर चिंतलवार (५५ वर्ष) यांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान त्यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे दाखल असलेल्या गुन्हा क्र. ४२९/२०२५, कलम ३०५ (अ), ३३१ (४), भारतीय न्याय संहिता अंतर्गत घरफोडी केल्याची कबुली दिली. Chandrapur Crime सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, अटकेतील आरोपींना वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकामध्ये सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निभोरकर, सर्वेश बेलसरे, सफौ धनराज करकाडे, पोहवा अजय बागेसर, सचिन गुरनुले, चेतन गज्जलवार, पोअं किशोर वाकाटे, गणेश भोयर, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे, चापोअं वृषभ बारसिंगे व मिलिंद टेकाम यांचा समावेश होता.
गडचांदुर: गोवंश वाहतूक प्रकरणात ३९ जनावरांची सुटका, तीन आरोपी अटकेत
दिनांक १२ जुलै २०२५ रोजी गडचांदुर पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मौजा भोयगांव ते नारंडा मार्गावर टी-पॉईंट जवळ नाकाबंदी दरम्यान MH40-TC-4812 क्रमांकाच्या आयशर वाहनाची तपासणी केली असता, Chandrapur Crime त्यामध्ये क्षमता ओलांडून निर्दयतेने कोंबलेली एकूण ३९ गोवंश जनावरे आढळून आली.
सदर वाहनात जनावरांची अमानुषपणे वाहतूक केल्याप्रकरणी (१) हाफीज खान गुफरान खान, (२) करीम खान नबी खान, (३) सादीक नवाब खान — सर्व राहणार गडचांदुर या तिघांना अटक करण्यात आली.
या गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन तसेच ३९ गोवंश जनावरे जप्त करण्यात आले असून, मुद्देमालाची एकूण किंमत रु. १९,१०,०००/- इतकी आहे. Chandrapur Crime या प्रकरणात शेख इब्राहीम शेख इस्माईल (रा. उप्पलवाडी, नागपूर) हा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये पोउपनि राधिका गायकवाड, पोहवा शितल बोरकर, नापोअं बलवंत शर्मा, पोअं प्रकाश बाजगीर, सुरज ढोले, मनोहर जाधव, साईनाथ उपरे, श्रीनिवास सोडनर, रमेश कार्लेवाड आदींचा समावेश होता.
पोलीस प्रशासनाच्या या दोन्ही कामगिरीमुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत झाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ झाला आहे. Chandrapur Crime गुन्हेगारी कारवायांवर कठोर कारवाईसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावरून स्पष्ट होते.
What crime was reported in Warora on July 11, 2025?
What incident occurred in Gadchandur on July 12, 2025?
What laws were applied in both cases?
Who led the police operations?
#ChandrapurCrime #WaroraCrime #GadchandurNews #CattleRescue #IllegalTransport #ChandrapurPolice #MaharashtraCrime #BurglaryCase #PoliceAction #CrimeNews #AnimalWelfare #LawAndOrder #PoliceCrackdown #CattleSmuggling #RepeatOffenders #WaroraBurglary #GadchandurPolice #LawsEnforced #CrimeAlert #PoliceInvestigation #IndianLaw #RuralCrime #CrimeUpdate #PoliceReport #IllegalCattleTrade #BreakingNews #AnimalRights #JusticeServed #PolicePatrolling #ChandrapurNews #FIRFiled #CrimeNetwork #WaroraUpdates #CattleTrafficking #AntiCrimeOperation #PoliceOnDuty #LocalNews #PoliceSeized #CattleProtection #WaroraPolice #GadchandurCrime #CriminalsArrested #SPAction #PoliceForce #CriminalsCaught #LCBChandrapur #MaharashtraNews #ChandrapurUpdate #PatrollingSuccess #CrimeBusted #PoliceEfforts #Hafizkhangufrankhan #Karimkhannabikhan #Sadiqnawabkhan #Anil alias Kumbhakarna is the shameless one #Arvind alias Kavala Namdev's seven sons #Rangashankarchintalwar #ShivajiKadam #RadhikaGaykwad #ShitalBorkar #BalwantSharma #PrakashBajgir #Suraj Dhole, #ManoharJadhav #SainathUpre #SrinivasSodner #RameshKarlevad #GaneshBhoyar