सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप
Shegaon Crime | शेगाव/चिमूर | दिनांक २४ मे २०२५ रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. संबंधित प्रकरणात दिनांक ११ जुलै २०२५ रोजी दुपारी १:३० ते २:०० दरम्यान पीडितेने आणि तिच्या वडिलांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीची तातडीने दखल घेत, शेगाव पोलीसांनी या प्रकरणातील तीन आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेतले.
सदर गुन्ह्यात भारतीय माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत कलम ७०(२), १२३ तसेच २०२३ च्या नवीन न्याय संहितेतील सहकलम ४ व ६, पोक्सो कायदा, आणि IT Act मधील सहकलम ६६(ई), ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेले कृत्य केवळ गंभीर स्वरूपाचे नसून समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरवणारे आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, संपूर्ण तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव (चिमूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. Shegaon Crime पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने तपास सुरु केला असून, गुन्ह्यातील अन्य कोणत्याही व्यक्तींची संलिप्तता असल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, या अत्यंत संवेदनशील प्रकरणात नागरिकांनी संयम पाळावा, संबंधित कोणतेही फोटो अथवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, असे आवाहन शेगाव पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ अथवा इतर माहिती प्रसारित करणाऱ्यांवर देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
या प्रकारच्या गुन्ह्यांवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक असतेच, पण त्याचबरोबर अशा घटना रोखण्यासाठी समाजाने सजग राहणे, संवेदनशीलता राखणे आणि पीडितांच्या बाजूने ठाम उभं राहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. Shegaon Crime प्रशासन आणि पोलिसांकडून याप्रकरणी यथायोग्य आणि कठोर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
What happened in the Shegaon minor assault case?
When was the complaint filed and how did the police respond?
Under which laws have the accused been booked?
What advisory has the police issued to the public?
#ShegaonMinorAssault #ShegaonCrime #MinorAssault #POCSOAct #CyberCrime #JusticeForVictims #StopSexualViolence #ChildProtection #PoliceAction #IndianLaw #ITAct #SexualOffence #CrimesAgainstWomen #OnlineAbuse #ProtectChildren #DigitalSafety #JusticeDelayedJusticeDenied #FastTrackCourt #WomenSafety #ZeroTolerance #ViralVideoCase #ShegaonNews #MaharashtraPolice #NewsUpdate #BreakingNews #VictimSupport #EndRapeCulture #StrictAction #SocialMediaAbuse #DigitalCrime #StopAbuse #LawAndOrder #IndiaNews #POCSO2025 #CyberLaws #ShegaonUpdate #ChildRights #WomenEmpowerment #SafeIndia #NoMoreViolence #CriminalBehindBars #YouthAwareness #ProtectTheInnocent #MediaAlert #NewsReport #PoliceInvestigation #LegalAction #SensitiveCase #RespectPrivacy #MahaPolice #JournalismMatters #MarathiNews #MahawaniNews #VeerPunekarReport #ShegaonNews #MaharashtraPolice #Rakeshjadhav #ShegaonPolice