वरोरा येथे मोठा राजकीय झोका, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोहळा पार
BJP Joining | चंद्रपूर | आज एका मोठ्या राजकीय घडामोडीला सुरुवात झाली. श्री. वासुदेव ठाकरे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा श्री. रवींद्रभाऊ शिंदे (उ.बा.ठा) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपला नवा बळकटीचा टक्का मिळाला असून, स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
या प्रवेश सोहळ्यास मा. प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील, आमदार श्री. करण संजय देवतळे, आ. श्री. किशोरभाऊ जोरगेवार व आ. श्री. बंटीभाऊ भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या साक्षीने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
श्री. वासुदेव ठाकरे आणि श्री. रवींद्रभाऊ शिंदे हे दोघेही वरोरा तालुक्यात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. BJP Joining दोघांचेही ग्रामपातळीवरील कार्य, शेतकऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि समाजातील विविध घटकांशी असलेला संपर्क पाहता, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पक्षासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असे मत यावेळी नेत्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना आ. करण देवतळे यांनी सांगितले, "भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. देशाच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेसाठी जेवढं काम भाजपने केलं आहे, तेवढं अन्य कोणत्याही पक्षाने केलं नाही. आज ठाकरे आणि शिंदे यांच्यासारखी अनुभवसंपन्न, जनतेशी जोडलेली माणसं पक्षात दाखल होणं, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे."
मा. चंद्रकांतदादा पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनीही आपल्या भाषणात वरोरा परिसरात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या वाढत्या बळाचे उल्लेख करत नव्याने दाखल झालेल्या नेत्यांचे स्वागत केले. BJP Joining आगामी काळात हे नेते पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहोचवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात मोठे वळण आले असून, वरोराच्या राजकीय गणितात नव्याने फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. BJP Joining नुकतीच झालेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक आणि भाजपकडून आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये हे दोघे नेते सक्रियपणे काम करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Who joined BJP in Warora on 15th July 2025?
Which key leaders were present during the joining ceremony?
What is the political significance of this event in Warora?
What roles are expected from the new entrants in BJP?
#BJP #BJPJoining #WaroraPolitics #VasudevThakare #RavindraShinde #RavindraChavan #ChandrakantPatil #KaranDeotale #KishorJorgewar #BuntyBhangdiya #MaharashtraPolitics #PoliticalSwitch #BJPStrength #GrassrootsLeadership #WaroraNews #BJPWarora #ShivSenaToBJP #UddhavGroupExit #ChandrapurPolitics #MahaPolitics #LeadershipChange #BJPFamily #JoiningCeremony #PoliticalRealignment #AssemblyPolitics #RuralLeadership #BJPGrowth #LocalPolitics #VikasachiWatchal #BJPMovement #NewEntrantsBJP #PoliticalBuzz #MahaUpdates #BJPLead #Election2025 #BJP2025 #MarathaPolitics #VidarbhaPolitics #WaroraUpdates #PowerShift #PoliticalLandscape #BJPChandrapur #BJPChhattisgarhBorder #GrassrootsPolitics #PoliticalStrategy #BJPInfluence #LocalSupport #MahaBJP #TeamBJP #WinningTeam #BJP #Warora #KaranDeotale #VikasachiWatchal #RavindraChavan #Chandrakantdada #BJPJoinings #MarathiNews #MahawaniNews #VeerPunekarReport