राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते विशेष नियुक्ती; जिल्हास्तरावर ग्राहक हक्कांसाठी लढण्याची जबाबदारी
Consumer Protection Committee | चंद्रपूर | भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी श्री. संतोष दशरथ पारखी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अविनाश झोटिंग यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
संतोष पारखी हे शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही सक्रिय असून, सामाजिक व कायदेशीर क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या ग्राहक हक्कांबद्दलच्या जागरूकतेची, संघटन कौशल्याची आणि निस्वार्थ सामाजिक सेवाभावाची दखल घेऊन त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे.
ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व सुधारित २०१९ अंतर्गत देशभर काम करणारी ही संस्था नागरिकांच्या हक्कासाठी कायदेशीर आणि संघटित स्वरूपात लढा देत असते. Consumer Protection Committee विशेषतः ग्रामीण व उपविभागीय भागात ग्राहकांची फसवणूक, चुकीच्या दरात वस्तू विक्री, भेसळयुक्त उत्पादने, खोटी जाहिरातबाजी, सेवा क्षेत्रातील गैरप्रकार यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने काम करणारी ही संघटना चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सक्रिय होणार आहे.
संतोष पारखी यांच्याकडे आता जिल्ह्यातील सर्व तालुके, शहर, गाव आणि वॉर्ड स्तरावर "जागो ग्राहक जागो" या अभियानाअंतर्गत शाखा स्थापनेचे आणि कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार असणार आहेत. ग्राहक हक्कांसंबंधी माहिती असलेल्या जाणकार व्यक्ती, कायदेतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी, युवक आणि शिक्षित बेरोजगार यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
ग्राहक संरक्षण समितीच्या कार्याचा एक भाग म्हणून सरकारी, निमसरकारी, खाजगी व सहकारी क्षेत्रांमधील ग्राहकांचे अधिकार, दावे प्रक्रिया, कायदेशीर सल्ला, न्यायालयीन मदत, आणि फसवणुकीच्या घटनांवर त्वरित कारवाई करण्याच्या बाबतीत समिती कार्यरत राहणार आहे. Consumer Protection Committee या अनुषंगाने प्रशिक्षण, जनजागृती शिबिरे, सल्ला केंद्र, तसेच ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली उभारण्याची दिशाही ठरवण्यात आली आहे.
या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी संतोष पारखी यांना शुभेच्छा देत, चंद्रपूरसारख्या संवेदनशील जिल्ह्यात ग्राहक हक्कांसाठी चळवळ उभी करण्याचे आवाहन केले. सचिव डॉ. झोटिंग यांनीही या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त करताना, “संतोष पारखी यांच्यासारखा जिज्ञासू, अभ्यासू आणि जनतेसाठी कार्यरत असलेला नेता जिल्हाध्यक्षपदी नेमणं, हे जिल्ह्यातील ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे,” असे प्रतिपादन केले.
संतोष पारखी यांनी नियुक्तीबद्दल आभार मानत, “चंद्रपूर जिल्ह्यात ग्राहकांच्या अडचणी, अन्यायकारक सेवा, वाजवीपेक्षा जास्त दर, अपूर्ण माहिती आणि फसवणूक याविरुद्ध लढा उभारणे ही माझी जबाबदारी आहे. Consumer Protection Committee ग्राहक समितीच्या माध्यमातून मी प्रत्येक तालुक्यात, गावात आणि शहरात समितीचा झेंडा उभारणार आहे. लवकरच जिल्हाभरात जनजागृती मोहिमा, शिबिरे आणि कायदेशीर सल्ला केंद्रे सुरू केली जातील,” अशी प्रतिक्रिया दिली.
या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात ग्राहक हितासाठी नवीन दिशा, ठोस अंमलबजावणी व कायदेशीर लढ्याचे मजबूत व्यासपीठ निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील सामाजिक व कायदेतज्ज्ञ वर्तुळातून उमटत आहे.
Who has been appointed as the Chandrapur District President of the Consumer Protection Committee?
Under which organization is this committee functioning?
What is the term duration of the current appointment?
What responsibilities will the district president have?
#ConsumerProtectionCommittee #ConsumerProtection #ChandrapurNews #SantoshParkhi #ManuskhiFoundation #ConsumerRights #IndiaConsumerLaw #JagoGrahakJago #ConsumerAwareness #GrahakSuraksha #ConsumerCommittee #LegalAwareness #DistrictPresident #ConsumerSafety #ConsumerSupport #ChandrapurUpdates #SocialService #ShivsenaLeader #PublicInterest #ConsumerJustice #LegalRights #IndianConsumers #ConsumerLeadership #ConsumerForum #GrahakJagran #AwarenessCampaign #ConsumerWelfare #SocialActivism #ChandrapurDistrict #LegalEmpowerment #MaharashtraNews #LegalAid #ConsumerEducation #ConsumerProtectionAct #2025Updates #ConsumerHelp #ConsumerLegalRights #GrassrootLeadership #Jansamvad #LawAndJustice #NewAppointment #ConsumerFirst #PublicHelpDesk #GrahakKalyan #GrahakManch #ChandrapurBuzz #ManuskhiSocialFoundation #ChandrapurActivists #LegalSupport #PeopleEmpowerment #ConsumerVoice #MahawaniNews #MarathiNews #Batmya #SantoshParkhiNews