पोलिसांची यशस्वी कारवाई चार घरफोड्यांचा उलगडा, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
Bhadravati Police | भद्रावती | शहरातील सुरक्षा नगर परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणातील आरोपीस अखेर भद्रावती पोलिसांनी तडीस नेले आहे. प्रमोद उर्फ मोबाईल अरुण गेडाम (वय ३२, रा. रासा घोंसा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपी चोरीच्या उद्देशाने शहरात वावरत असताना पोलिसांच्या सावध कारवाईमुळे तो ताब्यात घेण्यात आला. Bhadravati Police प्रारंभी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने काही वेळ टाळाटाळ केली, मात्र अधिक खणून काढल्यानंतर त्याने सुरक्षा नगर येथील घरफोडीची कबुली दिली. या घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून तब्बल ₹२,५०,१०० चा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.
विशेष म्हणजे चौकशीत आरोपीने याआधी आणखी तीन घरफोड्या केल्याचे उघड झाले असून, त्या प्रकरणातही त्याची गुन्हेगारी संगत सिद्ध झाली आहे. Bhadravati Police पोलिसांनी त्याच्याकडून या सर्व घरफोड्यांतील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही यशस्वी कारवाई ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्वात विरेंद्र केदारे, गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोळे व भूषण चौधरी या पोलिस अधिकाऱ्यांनी केली.
भद्रावती शहरात अलीकडे वाढत्या घरफोडींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. Bhadravati Police मात्र या कारवाईमुळे पोलिसांनी गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवत नागरिकांच्या सुरक्षेचा विश्वास पुन्हा प्राप्त केला आहे.
या घटनेमुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या तत्परतेचे व कुशलतेचे कौतुक होत आहे. Bhadravati Police आरोपीचा आणखी गुन्हेगारी इतिहास उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
Who is the main accused in the recent Bhadravati house break-in case?
How many cases has the accused been linked to?
What was recovered from the accused during the arrest?
Who led the successful police operation?
#BhadravatiHouseTheftArrest #Bhadravati #HouseBreakIn #MobileGedam #BhadravatiPolice #CrimeNews #PoliceAction #TheftCaseSolved #CriminalCaught #StolenJewellery #CityCrime #ChandrapurNews #HomeSecurity #RepeatOffender #HouseRobbery #GoldRecovery #SilverRecovery #StolenCash #BhadravatiUpdate #CriminalBehindBars #PoliceSuccess #InvestigationSuccess #BhadravatiSafety #PoliceEfficiency #CrimeControl #TheftCrackdown #CitySafety #HomeInvasion #BreakInAlert #PublicSafety #ChandrapurPolice #LawAndOrder #PoliceAlertness #CrimeRate #CriminalHistory #SecurityThreat #PublicTrustRestored #BoldBurglary #AccusedArrested #FIRUpdate #AccusedConfession #CityCrimeWatch #PoliceInvestigation #RepeatTheft #MobileThief #CrimePatrol #RecoveredProperty #SuspectArrested #CriminalInvestigation #BhadravatiWatch #RobberyCaseClosed #PoliceDedication #Yogeshpardhi