Vidarbha Rain Alert | विदर्भात पुन्हा एकदा निसर्गाचा तांडव

Mahawani
0
Special bulletin issued from Nagpur today

गोंदिया-गडचिरोलीला झोडपले, अनेक गावांचा संपर्क तुटला; वीज व वाहतुकीवर मोठा परिणाम

Vidarbha Rain Alert | नागपूरबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात गेल्या २४ तासांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मारा सुरू आहे. भारत हवामान विभागाने (IMD) आज नागपूर येथून जारी केलेल्या विशेष बुलेटिनमध्ये पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले असून, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.


भामरागड, बल्लारपूर, आहिरी, एटापल्ली, सुकळी, गोंदिया, ब्रम्हपुरी, अर्मोरी, साकोली, मुलचेरा, देशाईगंज, चामोर्शी, राजुरा, गडचिरोली, चंद्रपूर, तिरोडा, गोंडपिपरी, कुही, रामटेक या भागांत ४ ते ११ सेंमी पर्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी तर संपूर्ण गावात पाणी शिरले असून, वीजपुरवठा पूर्णतः ठप्प आहे.


विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे सर्वाधिक ११ सेंमी पावसाची नोंद झाली आहे, तर बल्लारपूर व आहिरी येथे ८ सेंमी, एटापल्ली, अर्मोरी, गोंदिया विमानतळ परिसरात ७ सेंमी पर्यंत वर्षाव झाला. Vidarbha Rain Alert अशा मुसळधार पावसामुळे या परिसरातील पूल, घाटमार्ग, रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.


काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून निर्माण झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र कोलकात्याच्या दक्षिण-पूर्वेस १०० किमी अंतरावर असून, हे पश्चिम व उत्तर-पश्चिम दिशेने झारखंडमार्गे विदर्भात सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या २४ ते ४८ तासांदरम्यान गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि अतिमुसळधार पावसाची तीव्र शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवाव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. मात्र यंत्रणा अजूनही अपुऱ्या आहेत. Vidarbha Rain Alert गडचिरोलीतील आदिवासी भागांमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला असून, तिथे प्रशासन अध्याप पोहोचलेले नाही.


प्रशासन पुरतं गारद – जबाबदारी कोण घेणार?

वर्षानुवर्षे गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीची पुनरावृत्ती होतेय. दरवर्षी या जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे पुलंवरून पाणी वाहते, रस्ते खचतात, आणि संपर्कविहीन गावं निर्माण होतात. पण यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायची जबाबदारी घेणारे कुठे आहेत?


गोंदिया जिल्ह्यातील साकोली, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी मार्गांवर पाण्याचा प्रचंड निचरा असून शेकडो प्रवासी अडकले आहेत. Vidarbha Rain Alert मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते गायब. गोंदियातील ‘सदाकरजुनी घाट’ हा दरवर्षीच्या पावसात धोकादायक ठरतो, तरी त्यावर कोणतीही तात्पुरती वा कायमस्वरूपी उपाययोजना झाली नाही.


गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वीज गेल्यानंतर अवशाक्तेनुसार जनरेटर नसल्याने औषधांची साठवण बिघडलीय आणि रुग्ण उपचाराविना असहाय झालेत. जिल्हा आरोग्य अधिकारी याकडे बघणार कोण?


SDRF/NDRF कोठे आहेत?

प्रत्येक पावसाळ्यात हवामान विभाग लाल, पिवळा व हिरवा अलर्ट जारी करतो. पण जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण, महसूल यंत्रणा, पंचायत समित्या, तहसील कार्यालय यांचे समन्वय अपूर्णच राहतो. Vidarbha Rain Alert बुलेटिनमध्ये स्पष्ट 'अत्यंत शक्यतेने' धोक्याचा इशारा दिला जातो, पण ना तात्पुरत्या निवारा केंद्रांची निर्मिती, ना एसडीआरएफचे तैनाती आदेश.

हवामानात तापमानही पडले!

अकोला येथे कमाल तापमान केवळ ३०.३°C तर अमरावती येथे किमान तापमान २२.१°C नोंदले गेले. विदर्भात थंडीची सौम्य झळ जाणवू लागली आहे. मात्र आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागांत वीजपुरवठा बंद असल्यामुळे संपूर्ण अंधारात जीवन जगावे लागत आहे.


शेती पिकांवर परिणाम

या अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पेरण्या झालेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. Vidarbha Rain Alert सोयाबीन, तूर, कपास, भाताचे रोपे पाण्याखाली गेल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी फक्त कागदोपत्री मदत करत असून शेतकऱ्यांपर्यंत काहीही पोहोचलेले नाही. तूर, कपास, सोयाबीन  व भातपीकांचे वाचवण्याचे कुठलेही निर्देश जिल्हा स्तरावरून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.


IMD नागपूरने व नागरिकांना सतत अपडेट्स तपासण्याचे आणि वादळी, विजेच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न राहण्याचे आवाहन केले आहे. कोणीही नदी नाल्यांच्या प्रवाहात उतरणे टाळण्याचे व नागरिकांना हवामान खात्याचे सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


Why is there heavy rainfall in Vidarbha right now?
A low-pressure system over the Bay of Bengal has moved towards inland areas, causing widespread rainfall in Vidarbha with isolated extremely heavy showers.
Which districts are most affected by the current rainfall?
Chandrapur, Gadchiroli, Gondia, and Bhandara districts have recorded the highest rainfall, with Bharmagad receiving 11 cm, followed by Ballarpur and Ahiri with 8 cm each.
Has the India Meteorological Department (IMD) issued any warnings?
Yes, IMD has issued a red alert for isolated extremely heavy rainfall in eastern Vidarbha and warned of thunderstorms with lightning in the next 48 hours.
What precautions should citizens take during this weather condition?
Citizens are advised to avoid waterlogged areas, stay indoors during thunderstorms, follow updates from IMD, and ensure safety from possible flash floods or lightning.


#VidarbhaRainAlert #IMDWarning #ChandrapurRains #GadchiroliFlood #NagpurWeather #Monsoon2025 #BengalLowPressure #HeavyRainfall #RainRedAlert #GondiaWeather #RainUpdate #IMDNagpur #DisasterAlert #MaharashtraRains #WeatherBulletin #RainfallReport #FlashFloodAlert #SDRF #NDRFDeployment #FloodRescue #RainImpact #MonsoonNews #RainForecast #AgricultureLoss #PaddyFieldsFlooded #SoyabeanDamage #DistrictAdministration #WeatherUpdateIndia #IndianMonsoon #RainfallToday #GondiaRains #GadchiroliRainfall #ChandrapurUpdates #NagpurRainNews #IMDAlert #MonsoonDisaster #BayOfBengalSystem #CyclonicCirculation #MonsoonImpact #VidarbhaMonsoon #WeatherEmergency #RainfallWarning #RainfallAdvisory #SchoolHolidayAlert #FlashFlood #RuralCrisis #PowerCut #TransportDisruption #MonsoonCrisis #FarmerAlert #MahawaniNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top