रामनगर गुड्याच्या रस्त्यावरील कचरा हटवून उरकुडे यांचे पाऊलगाठ कार्य
Gouri Road Blockage | राजुरा | गोवरी गावातून रामनगर गुड्याकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णतः ठप्प झाला होता. बुधवारी झालेल्या जोरदार पावसात गुड्याच्या दिशेने जाणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. पाण्यासोबत वाहून आलेले मोठे मोठे खोड, झाडपाला आणि प्लास्टिकचा कचरा पुलावर साचल्याने गावाचा मुख्य मार्ग पूर्णतः बंद झाला. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांचे हाल सुरू झाले.
या संपूर्ण परिस्थितीकडे दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीने डोळेझाक केली होती. कोणतीही यंत्रणा, कामगार अथवा जबाबदार व्यक्ती घटनास्थळी पोहोचली नाही. Gouri Road Blockage गावकऱ्यांनी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. मात्र ही उदासीनता लक्षात घेऊन माजी सभापती सुनिल उरकुडे यांनी पुढाकार घेतला.
उरकुडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत गावातील तरुण कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एकत्र केले. Gouri Road Blockage कोणत्याही सरकारी यंत्रणेची वाट न पाहता, त्यांनी स्वतः पुढे येत पुलावर अडथळा ठरलेले मोठे खोड, झाडांचे बुंधे आणि साचलेला कचरा स्वखर्चाने साफ केला. तब्बल चार तासांच्या अथक श्रमांनंतर मार्ग पूर्णतः मोकळा झाला. जे काम मोठ्या यंत्रांनीही शक्य झालं नसतं, ते कार्यकर्त्यांनी एकी आणि धाडसाने करून दाखवलं.
या उपक्रमामुळे केवळ मार्ग मोकळा झाला नाही, तर ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमतेवरही मोठा सवाल उपस्थित झाला आहे. Gouri Road Blockage पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जर रस्ते बंद पडत असतील आणि ग्रामपंचायत कुंभकर्णी झोप घेत असेल, तर पुढचे तीन महिने गावकऱ्यांनी संकटांचा सामना एकट्याने करायचा काय?
स्थानिक शेतकरी, वाहनचालक आणि वृद्ध नागरिकांनी माजी सभापतींच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. "हे काम प्रशासनाने करायला हवं होतं, पण शेवटी पुन्हा आमचेच लोक पुढे आले," असे संतप्त शब्दांत एका वृद्ध नागरिकाने प्रतिक्रियेत दिले आहें.
पावसाळ्याच्या दिवसात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ग्रामपंचायतीने सजगता बाळगणे आवश्यक आहे. Gouri Road Blockage अन्यथा जनता कोणत्याही क्षणी प्रश्न विचारेल की, "तुम्ही निवडून आलात, पण काम कोण करतंय?"
या प्रकारानंतर गावकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामसेवक व सरपंच यांच्या निष्क्रियतेविरोधात कारवाईची मागणी केली असून, याची प्रत तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयातही देण्यात आली आहे.
सतत पडणाऱ्या पावसात अशा घटना वाढत असताना ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा थांबणार कधी? Gouri Road Blockage की उरकुडे यांसारखे नागरिकच पुढे येऊन प्रत्येक वेळेस 'ग्रामविकास' करणार?
What caused the road from Gouri to Guda to be blocked?
How did the road get cleared if no official help arrived?
Did the Gram Panchayat respond to the situation?
What action are villagers demanding now?
#Gouri #RamnagarGuda #Rajura #RoadBlocked #HeavyRain #FloodRelief #BridgeBlocked #SunilUrkude #VillagersHelp #DisasterResponse #MaharashtraFloods #Monsoon2024 #GramPanchayat #RuralNeglect #LocalLeadership #GroundAction #RainDamage #InfrastructureCrisis #GouriBridge #UrgentRelief #BlockedRoads #VillageNews #CitizenInitiative #GrassrootAction #BridgeCleared #HeroicEffort #FloodImpact #PanchayatFailure #PublicNegligence #VillagersUnite #MonsoonAlert #DisasterNegligence #CommunitySupport #RuralIndia #Waterlogging #BlockedConnectivity #EmergencyHelp #FloodRecovery #CommonManHero #VolunteerAction #MonsoonProblems #PeoplePower #GrassrootsLeadership #IgnoredVillages #NeglectedRoads #PanchayatAbsent #LocalHero #MaharashtraMonsoon #RuralStruggles #BridgeCleanup #GouriRoadBlockage #MahawaniNews #RajuraNews #VeerPunekarReport #SunilUrkude