मानवी श्रम, ३००० रु मोबदला आणि माजी सभापतींची राजकीय सांडशी?
Road Blockage | राजुरा | गोवरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीमुळे रामनगर-गुडा मार्गावरील बधारा ओसंडून वाहत होता. जलसंकटामुळे गावकऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. पण त्याहून मोठं संकट म्हणजे प्रशासनाच्या झोपेचे दर्शन या निमित्ताने घडले.
पाटबंधारे विभाग आणि ग्रामपंचायत गोवरी यांच्यातील समन्वयाचा संपूर्ण बोजवारा या घटनेमुळे उघड झाला. Road Blockage लोकांचे जीवन ठप्प झालं, शेतीचे काम रखडलं, तरीही कारवाईला उशीर होत राहिला. ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदन दिलं, पण "पाहणी"च्या पलीकडे काहीच घडलं नाही. पाहणी ही देखील एवढी वेळखाऊ आणि औपचारिक की ती कोणताही ठोस निर्णय किंवा कारवाई न करता संपली.
गावकऱ्यांचा संयम सुटला, आणि शेवटी हातात घेतली कुदळ
या निष्क्रियतेला वैतागून गावातील नागरिकांनी थेट सरपंच आशाताई बबन उरकुडे यांच्याकडे धाव घेतली. "रस्ता आम्हीच श्रमाने उघडतो, पण त्याचा मोबदला आम्हाला द्या," अशी सरळ मागणी करण्यात आली. प्रशासनाने देखील काहीसा शहाणपणा दाखवला आणि ग्रामपंचायतीच्या विशेष निधीतून चेतन बोबाटे यांना सर्वांच्या श्रमाचा मोबदला म्हणून ३००० रुपयांचा मोबदला मंजूर करत "फोनपे"नि दिला.
हा निर्णय म्हणजे एका बाजूने जनतेच्या श्रमाचा सन्मान असला तरी दुसऱ्या बाजूने लघु सिंचन विभाग राजुराचे अपयशाचं ताजं उदाहरण. Road Blockage पाहणीला काही होत नाही आणि शेवटी सामान्य माणूसच रस्त्यावर उतरतो.
माजी सभापतींचा राजकारणाचा कांगावा
या संपूर्ण परिस्थितीत राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तो गावातील माजी सभापतींनी. Road Blockage गावकऱ्यांनी आणि पंचायतीने संयुक्तरीत्या काम करून मार्ग मोकळा केला असतानाही, त्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप लावत, “ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमतेवरही मोठा सवाल उपस्थित,” अशा प्रकारचे चुकीचे विधान केल्याचे व हे विधान म्हणजे एकप्रकारे जनतेच्या श्रमाचा अपमान आहे. राजकारणासाठी माणसं श्रम करत असतात असं जर काही लोकांना वाटत असेल, तर अशा मानसिकतेचा तीव्र निषेध होणे गरजेचे आहे. असे सरपंच आशाताई उरकुडे यांनी स्पष्ट केले आहे.
पंचायतीचा सक्रियपणा, पण यंत्रणांचा दारुण अपयश
ग्रामपंचायत गोवरीने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ निधी मंजूर करून रस्ता मोकळा केला हे निश्चितच उल्लेखनीय आहे. Road Blockage पण ज्यांनी हे काम करायचं होतं – पाटबंधारे विभाग – त्यांनी या प्रकरणात ढिम्म भूमिका घेतली हे नाकारता येणार नाही.

सरपंच आशाताई उरकुडे यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, “पाटबंधारे विभागाशी वेळोवेळी संपर्क करून आम्ही त्यांना परिस्थितीची माहिती दिली होती. पण कारवाईत होणारा विलंब यंत्रणांच्या ढिसाळपणाचे द्योतक आहे.”
स्थानिकांनी दाखवली एकजूट, पण प्रश्न कायम
गावातील नागरिकांनी फावडं, कुदळ आणि घामाच्या जोरावर जे काम केलं, ते खरं तर सरकारी यंत्रणांनी वेळेवर करायला हवं होतं. Road Blockage परंतु, अशी अनेक उदाहरणं दरवर्षी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घडतात, जिथे सरकारी कर्मचारी केवळ पाहणी आणि कागदोपत्री कामापुरतेच सक्रिय असतात.
या संदर्भात विचार करताना प्रश्न उभा राहतो – सरकारी विभागांना एक रस्ता साफ करायला किती वेळ लागतो? आणि तो वेळ किती लोकांच्या जगण्यावर परिणाम करतो?
या सगळ्या प्रकरणाने तीन बाबी समोर येतात —
- पाटबंधारे विभागाचे अपयश
- ग्रामपंचायतीचा लवचिक आणि उत्तरदायी दृष्टिकोन
- गावकऱ्यांचा आत्मसन्मान आणि श्रमप्रतिष्ठा
राजकीय शाब्दिक मारामारीने जनतेचा प्रश्न सुटत नाही
या प्रकरणात काही राजकीय मंडळी केवळ आरोप-प्रत्यारोप करत बसले, पण प्रत्यक्ष काहीच केले नाही. Road Blockage "ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेने आम्हालाच जनहितासाठी मार्ग मोकळा करावा लागला असे आरोप योग्य नाही" आपत्तीच्या काळात कोणतीही तांत्रिक परवानगी किंवा कागदपत्रांची वाट पाहत बसणं म्हणजे केवळ परिस्थितीचं गांभीर्य न ओळखणं. म्हणून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करत उपाययोजने साठी आम्ही जेसीबी (JCB) चा शोध घेतला परंतु अनुपलब्धतेमुळे उशीर झाला. २५ तारखेला राजुरा इथून जेसीबी उपलब्ध झाली ते येण्यास सज्ज होताच गावातील सजक नागरिकांनी सांगिले कि, आमीच श्रमातून सदर मार्ग मोकळा करू या साठी पंच्यातीकडून समांजनक मोबदला द्यावा यासाठी जेसीबी थांबवत नागरिकांना श्रमाच्या मोबदल्यासह परवानगी दिली असेहि सरपंचानी सांगिले आहे.
शेवटी जनतेचा प्रश्न – ‘दरवर्षी असंच होणार का?’
गोवरीसारख्या गावात दरवर्षी पावसाळा आला की रस्ता बंद होतो, नागरिक अडकतात, शेतकरी हवालदिल होतो, आणि मग निवेदनं, पाहण्या, प्रतिक्षा, आणि शेवटी नागरिकांचा स्वबळावरचा मार्ग. Road Blockage ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी लागतील.
पाटबंधारे विभागाने पुढाकार घेऊन –
- बंधाऱ्याची उंची वाढवणे
- ओव्हरफ्लो रोखण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था करणे
- रस्त्याच्या दुतर्फा सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी खोदाई करणे
- दर पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची व बंधाऱ्यांची स्वच्छता करणे
या उपायांवर तात्काळ कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे.
या घटनेतून हे स्पष्ट होतं की, आजही गावांमध्ये ग्रामस्थांची एकजूट, पंचायतीची सक्रियता आणि समस्या सोडवण्याचा जिद्दीचा मार्गच विकासाचा खरा रस्ता ठरतो. Road Blockage मात्र, अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणांची गोंधळलेली आणि ढिसाळ भूमिका प्रश्नचिन्ह ठरते.
जर प्रशासनाने वेळेत लक्ष दिलं असतं, तर गावकऱ्यांना कुदळ-फावडं घेऊन रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. आज त्यांनी रस्ता साफ केला… उद्या पूल कोसळल्यावर काय करायचं?
Why was the Ramnagar-Guda road blocked?
What steps were taken by the administration to clear the blockage?
Who eventually cleared the road and how?
What controversies arose after the incident?
#RoadBlockage #BadharaOverflow #GouriGP #RamnagarGudaRoad #RuralCrisis #Monsoon2025 #RoadBlockage #FarmerAccess #ManualCleaning #JCBDelay #PanchayatAction #FloodedRoads #Waterlogging #ChandrapurNews #RajuraUpdate #DrainageFailure #PanchayatPolitics #CommonManEffort #RuralNews #GroundReality #MaharashtraFloods #VillageVoices #PublicEffort #GovtNegligence #PanchayatWork #LocalLeadership #GrassrootPolitics #RainImpact #RoadObstruction #RuralDevelopment #InfrastructureFailure #RuralConnectivity #VillageUnity #BlockedRoads #CitizensTakeCharge #GramPanchayat #DisasterResponse #NeglectExposed #GouriUpdates #ChandrapurDistrict #GrassrootsGovernance #FarmerIssues #PotholeProblem #FloodRelief #LocalDisasters #UnsungHeroes #PeoplePower #MonsoonDamage #BridgeOverflow #RoadClearance #AdministrativeDelay #MahawaniNews #RajuraNews #GouriNews #VeerPunekarReport #BabanUrkude #SunilUrkude #MarathiNews #Batmya