जागतिक पर्यावरण दिनी केवळ औपचारिकता नव्हे, झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही आहे.
बाबापूर / राजुरा | World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशभरात पर्यावरण रक्षणाचे विविध उपक्रम राबवले जातात, परंतु बहुतांश वेळा हे उपक्रम केवळ छायाचित्रापुरते मर्यादित राहतात. मात्र बाबापूर येथील रमाई महिला बचत गट यांनी केवळ औपचारिक वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी त्याला दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा स्वरूप दिला आहे. त्यांनी फक्त झाडे लावली नाहीत, तर "संगोपनाची जबाबदारी आमचीच!" हा निर्धारही गावसमोर ठामपणे मांडला.
या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहेत त्या रमाई महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या सौ. योगिता इंद्रजित वनकर, (Yogita Indrajit Wankar) मंगला सुभाष आत्राम, सारिका चेन्नूरवार, मिनाबाई आत्राम, अनिता देठे, भावना वनकर, छाया बांदूरकर, करुणा नगराळे होत्या. पारंपरिक व्यवस्थांमध्ये सामाजिक कामांमध्ये महिलांचा सहभाग दुय्यम मानला जातो, पण बाबापूरमध्ये ही स्थिती उलटी आहे. World Environment Day बचत गटाच्या अध्यक्षा सौ. योगिता इंद्रजित वनकर म्हणाल्या, "पर्यावरण रक्षण ही केवळ घोषणांची बाब राहिली आहे. आपण कृतीने समाजासमोर आदर्श ठेवला पाहिजे. झाडं लावली म्हणजे काम संपत नाही, ती जपणं ही खरी जबाबदारी आहे."
गावाच्या विकासात ‘स्त्री शक्ती’चा ठसा
या उपक्रमाद्वारे महिलांनी संपूर्ण गावाला एक संदेश दिला—गावाच्या प्रगतीत आणि पर्यावरण संवर्धनात "स्त्री शक्ती हा निर्णायक घटक". World Environment Day विविध प्रकारची झाडे—गुलमोहर, करंज, जास्वंद, बदाम, अशोक—लावून केवळ सौंदर्यवाढ केली नाही, तर पाणी साठवण, हवामान नियंत्रण, आणि प्रदूषण नियंत्रण या मुद्द्यांवरही आपला ठोस सहभाग नोंदवला आहे. याशनी गावातील इंद्रजित वनकर, श्वेता वनकर, चंद्रकला पारखी, विठ्ठल पारखी, संघर्ष वनकर, छायाबाई वनकर, संतोष चेन्नूरवार या सोबत इतर नागरिक उपस्थित होते.
औपचारिकता नव्हे, कृतीतून प्रतिबद्धता
खेदाची बाब अशी की, अनेक सरकारी उपक्रम, CSR प्रकल्प किंवा शाळा-कॉलेजांतून होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये ‘झाड’ हा केवळ एक फोटोसाठी वापरला जाणारा ‘प्रॉप’ बनतो. दोन आठवड्यांतच ती रोपे कोरडीत मरतात आणि सामाजिक जबाबदारीची नौटंकी संपते. World Environment Day पण रमाई महिला बचत गटाने याला फाटकारून "प्रत्येक झाड हे एक जीव आहे, त्याच्या वाढीला आम्ही आईसारखी साथ देणार!" अशी भूमिका घेतली आहे.
प्रशासन कुठे आहे?
➠ या उपक्रमाचे कौतुक जरूर, पण या निमित्ताने काही तीव्र प्रश्न विचारणे आवश्यक आहे:
- ग्रामपंचायतने स्वतःचा पर्यावरण आराखडा तयार केला आहे का?
- गावात किती झाडं मागील तीन वर्षांत लावली गेली आणि त्यापैकी किती वाचली?
- स्थानिक प्रशासन स्वतःहून असे उपक्रम राबवते का, की केवळ लोकांच्या पुढाकारावर विसंबते?
हा उपक्रम महिलांनी आपल्या खर्चाने, वेळेने आणि मेहनतीने पार पाडला. World Environment Day मग वन विभागारी किंवा जिल्हा प्रशासनाची भूमिका काय आहे? हे केवळ फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी असतात का? कि फक्त पगारावर मेजवानी?
यशस्वी उपक्रमाचे मूळ घटक
1. स्वतःचा निधी: कोणत्याही सरकारी मदतीशिवाय बचत गटाने स्वतःच्या निधीतून रोपांची खरेदी केली.
2. सामूहिक सहभाग: प्रत्येक सदस्याने किमान एक झाड लावण्याचा निर्णय घेतला.
3. संगोपन नियोजन: प्रत्येक झाडाच्या पाण्याची, खतांची व निगराणीची जबाबदारी गटातील वेगवेगळ्या महिलांवर वाटून दिली.
4. जनजागृती अभियान: गावात फिरून झाडांचे फायदे पटवून देणारे पत्रके वाटण्यात आली.
प्रशासनाने शिकण्याची वेळ
रमाई महिला बचत गटाचा (Ramai Mahila Bachat Gat) हा उपक्रम म्हणजे एक प्रातिनिधिक आरसा आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि वन विभागाने या महिलांकडून शिकण्याची गरज आहे. World Environment Day फक्त फाइलांमध्ये ग्रीन बेल्टच्या योजना दाखवून काही उपयोग नाही. प्रत्यक्ष कृती हवी.
नागरिकांचा कडवट सवाल
- गावातील सरकारी शाळेच्या मैदानात, अंगणवाडीत गेल्या दहा वर्षांत किती झाडे लावले गेली?
- वन विभागाची नेमकी जबाबदारी काय? त्यांनी गावपातळीवर किती रोपे वाटली आहेत?
- वर्षभरात वनमंत्री किंवा जिल्हा अधिकाऱ्यांनी बाबापूरला भेट दिली का?
हे प्रश्न जर कोणाच्या जिव्हारी लागत असतील, तर ते उत्तमच. कारण लोकशाहीत प्रशासनाला जाब विचारणे हीच खरी जबाबदारी आहे.
बाबापूरमधील रमाई महिला बचत गटाचा हा उपक्रम प्रशासनाच्या गालाला जोरात लगावणारा चपराक आहे. त्यांनी दाखवून दिले की, निधी नसलातरी इच्छाशक्ती असेल तर पर्यावरण वाचवता येते. अशा गटांना जिल्हास्तरीय गौरव, अधिकृत आर्थिक मदत व संगोपनासाठी साधनं मिळाली पाहिजेत. World Environment Day हे उदाहरण केवळ बाबापूरपुरते मर्यादित राहू नये, तर जिल्हाभर पसरले पाहिजे.
Who organized the tree plantation event in Babapur on World Environment Day?
What makes this tree plantation different from others?
What types of trees were planted during the initiative?
Was there any involvement from the local administration or forest department?
#Women-ledTreePlantation #WorldEnvironmentDay #TreePlantation #WomenForNature #GreenBabapur #SaveTheEarth #RamaiBachatGat #EcoWarriors #PlantMoreTrees #SustainableLiving #EnvironmentMatters #GoGreen #EcoWomen #ClimateAction #LocalLeadership #WomenPower #GrassrootsChange #TreeGuardians #NatureFirst #VillageInitiative #EnvironmentalJustice #GreenMission #RuralWomenLead #CleanAndGreen #IndiaForTrees #MotherEarth #CommunityEffort #WomensInitiative #ActForNature #TreesForFuture #WomensPower #BabapurGreens #ChangeMakers #EcoFriendly #NatureLovers #PlantHope #GreenRevolution #WomenGreenLeaders #SoilAndSoul #GreeningIndia #TreeHeroes #GreenChampions #WomenAndEnvironment #GreenGoals #EnvironmentAction #OurGreenPromise #GreenCommitment #EnvironmentDay2025 #EarthGuardians #WomenInAction #VillageGreens #LeadByExample #RajuraNews #marathiNews