Coal Mine Scam: खाजगीकरणात स्थानिकांची फसवणूक

Mahawani
8 minute read
0

It has been revealed that unemployed youths were extorted Rs 30,000 to 40,000 by claiming to get them jobs in Mr. Buddha OB Handling Company. There is a serious allegation that some self-proclaimed leaders, bogus brokers, and the company's PRO were involved in this chain fraud that has hit the pockets of the youths who were dreaming of jobs.

बल्लारपूर कोळसा प्रकल्पात हडपला स्थानिकांचा रोजगार; दलाल-नेते-पीआरओ संगनमताचा गंभीर आरोप

राजुरा | Coal Mine Scam: तालुक्यातील बल्लारपूर वेकोली कोळसा खाणी प्रकल्पात सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेमुळे स्थानिक बेरोजगार युवकांची घोर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार ४ जून २०२५ उघड झाला आहे. जवळपास ७० टक्के काम खासगी कंपन्यांकडून करून घेतले जात असून, त्यात ओबी हँडलिंग, कोळसा ट्रान्सपोर्टिंग, साइडिंग व्यवस्थापन यांसारखी मुख्य कामे खासगी हाती देण्यात आली आहेत. मात्र, यामध्ये स्थानिकांना डावलून बाहेरील राज्यांतील लोकांना प्राधान्य देण्यात येत असल्याची वस्तुस्थिती आता बेपर्दा झाली आहे.


श्री. बुद्धा (Shri Buddha Company) ओबी हँडलिंग कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगून बेरोजगार तरुणांकडून ३० ते ४० हजार रुपये उकळले गेल्याचे उघड झाले आहे. Coal Mine Scam नोकरीच्या आशेवर स्वप्न रंगवणाऱ्या युवकांच्या खिशाला फटका देणाऱ्या या साखळी फसवणुकीत काही स्वयंघोषित नेते, बोगस दलाल, आणि कंपनीचे पीआरओ संगनमताने गुंतल्याचा गंभीर आरोप आहे.


आमदार भोंगळे यांचे नाव गैरवापरात?

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या फसवणुकीत आमदार देवराव भोंगळे (MLA Devrao Bhongale) यांचे नाव वापरण्यात येत असल्याचा आरोप आहे. "नाव आमदारांचं, खेळ दलालांचा!" – अशी स्थिती निर्माण झाली आहे. Coal Mine Scam भोंगळे यांना या फसवणुकीची माहितीच नव्हती, असे सांगितले जात असले तरी, त्यांचं नाव फसवणुकीसाठी वापरणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन चौकशीची मागणी का केली नाही, हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो.


घुग्घूस, तेलंगणा, चंद्रपूरहून मजूर; स्थानिक मात्र डावलले!

या प्रकरणात स्थानिक युवकांना नोकरी नाकारून मजूर व कामगार म्हणून घुग्घूस, चंद्रपूर, तेलंगणा, पाचगाव, चंदनवाही, विरूर स्टेशन आदी भागांतील बाहेरील लोकांना प्राधान्य देण्यात आले आहे. Coal Mine Scam इतक्या मोठ्या प्रकल्प क्षेत्रात रोजगाराची संधी स्थानिकांना मिळणार, अशी ग्वाही आंदोलकांनी मिळवली होती. मात्र आजही कोळशाच्या धुळीत काम करणाऱ्या युवकांमध्ये स्थानिकांचे प्रमाण अत्यल्प आहे, ही कटू वस्तुस्थिती आहे.


वेकोलीच्या दुर्लक्षाने विश्वासघात

वेकोलीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या नावाखाली लाखो रुपयांचे CSR प्रकल्प जाहीर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याचा आटापिटा केला असला, तरी स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत मात्र ती पूर्णतः अपयशी ठरली आहे. Coal Mine Scam वेकोलीच्या देखरेखीखाली चालणाऱ्या प्रकल्पांत बिनधास्त फसवणूक, दलालशाही आणि खाजगी हितसंबंधांचे वर्चस्व वाढत चालले आहे.


कोण आहेत हे 'दलाल'? कोणाच्या आशीर्वादाने चालतो हा गोरखधंदा?

या दलाली टोळीमध्ये अर्थिक आणि राजकीय हात असल्याची चर्चा रंगली आहे. Coal Mine Scam स्थानिक युवकांच्या फसवणुकीसाठी काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, नावे सांगण्यास घाबरणारे स्थानिक नेते आणि दलालांनी संगनमताने या ‘रोजगार विक्री’चा बाजार मांडला आहे. प्रश्न असा आहे की — कोण आहे यामागचा मेंदू? कोणाच्या वरदहस्ताने चालतो हा गोरखधंदा?


फसवणुकीला कोण जबाबदार?

1. वेकोली – मुख्य प्रकल्प मालक असून देखील कामगार भरतीवर कोणतीही नियंत्रण यंत्रणा नाही. ही निष्काळजीपणा नव्हे तर प्रत्यक्ष जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आहे.

2. बुद्धा ओबी हँडलिंग कंपनी – नोकरीच्या आश्वासनावर पैसे उकळल्याचे आरोप, तरीही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.

3. स्थानिक प्रशासन – जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने आजवर एकही दलाल गजाआड का नाही घातला? फक्त निवेदनांवर काम होणार का?

4. राजकीय नेते – नाव वापरले गेले तरी खोलात जाऊन दोषी शोधण्याची इच्छाशक्ती कुठे?


आंदोलन, आश्वासने आणि पुन्हा फसवणूक

भूतकाळात स्थानिक युवकांनी रोजगारासाठी संघर्ष केला, आंदोलने केली, काम रोकोसारखे तीव्र मार्ग अवलंबले. प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधींनी आश्वासनांची भोंगळी झूल चढवली. Coal Mine Scam मात्र आज पुन्हा त्याच युवकांना दलालांच्या दारात उभे राहावे लागत असेल, तर या संपूर्ण व्यवस्थेचा पराभवच म्हणावा लागेल.


आता काय करावे लागेल प्रशासनाला?

1. संपूर्ण प्रकरणाची CIDमार्फत चौकशी तात्काळ सुरु करावी.

2. बुद्धा कंपनीसह सर्व सब-कॉन्ट्रॅक्टर्सची कामगिरी व भरती प्रक्रिया तपासावी.

3. बेरोजगार तरुणांची यादी घेऊन, कोणाला नोकरी मिळाली, कोणी पैसे दिले याचा डेटा सादर करावा.

4. नाव वापरणाऱ्या लोकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा.

5. वेकोलीने CSR फंडाअंतर्गत स्थानिक तरुणांसाठी ‘स्थायी भरती प्रक्रिया’ लागू करावी.


रोजगार खाणीत आहे की दलालांच्या खिशात?

बल्लारपूर खाणीत लाखो रुपयांचे कोळसाचे उत्पन्न होते, पण त्याच खाणीतील रोजगार दलालांच्या खिशात जात असेल, तर ही केवळ फसवणूक नाही, तर स्थानीय जनतेवरील राजकीय-प्रशासकीय विश्वासघात आहे. Coal Mine Scam वेकोली, प्रशासन, बुद्धा कंपनी आणि स्थानिक प्रतिनिधी यांना हे स्पष्ट करून सांगावे लागेल की –

"स्थानिकांचा हक्क हिरावता येणार नाही. खाणीतला रोजगार विक्रीसाठी नाही!"


ह्या घोटाळ्याची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि स्थानिकांना त्वरित रोजगार हे तीन टप्पे आता अनिवार्य झाले आहेत. Coal Mine Scam अन्यथा, संघर्षाची नांदी पुन्हा एकदा सुरु होईल – आणि यावेळी ती केवळ मागणीसाठी नसेल, तर जबाबदारीसाठीही असेल.


What is the Ballarpur Coal Mine scam all about?
Over 70% of key operations in WCL’s Ballarpur project are outsourced. Locals were promised jobs, but outsiders were hired instead, reportedly through bribes and backdoor deals involving middlemen and company insiders.
Who is being accused in this scam?
Unnamed private agents, local political figures, and Buddha OB Handling company representatives are allegedly involved. Some reportedly used the name of MLA Deorao Bhangale to collect money from unemployed youth.
How much money was taken from job seekers?
Each unemployed youth was reportedly charged ₹30,000 to ₹40,000 under the false promise of a job. Hundreds of youth may have been scammed.
What action is being demanded now?
Locals are demanding a CID-level probe, immediate suspension of guilty subcontractors, criminal cases against middlemen, and priority employment for local youth in all ongoing coal projects.


#CoalMineScam #Ballarpurscam #Coalminefraud #Wclexposed #Localyouthcheated #Miningcorruption #Employmentfraud #Dalalraj #Politicalnexus #Wclnews #Buddhaobscam #Rajuranews #Chandrapurupdates #Jobscamindia #Miningjobsloot #Nojobsforlocals #Recruitmentscam #Corruptsystem #Fakepromises #Csrfailure #Outsidershired #Mpnamemisused #Scamalert #Coaltransportscam #Unemployedyouth #Jobracket #Wclfraud #Youthbetrayed #Miningpolitics #Jobforsale #Coalcorruption #Indiascamnews #Rajurapolitics #Exposethenexus #Demandinvestigation #Chandrapurscam #Employmentrights #Actiononscam #Coalscam2025 #Voiceforlocals #Politicalcoverup #Miningmafia #Stopfraud #Dalalnetwork #Jobformoney #Firneeded #Demandcidprobe #Ballarpurcoalnews #Wcljobcheating #Accountabilitynow #Scaminprogress #Mahawani #MahawaniNews #MarathiNews #VeerPunekarNews #Jobs #BJP #Elyashusen

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top