Rajura Municipal Elections 2025 | सन्मान न दिल्यास स्वबळावर शिवसेना (उबाठा) चा काँग्रेसला थेट इशारा

Mahawani
0

Rajura Municipal Elections 2025 | राजुरा | विधानसभा क्षेत्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकांचं रणकंदन सुरू असताना, काँग्रेस-शिवसेना (उबाठा) युतीत फाटाफूट होण्याची ठिणगी पेटली आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे नव नियुक्त उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे यांनी थेट स्पष्ट इशारा दिला आहे—"युती टिकवायची असेल, तर सन्मान द्या; अन्यथा आम्ही राजुरा नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू."

२५ वर्षे निष्ठेने कार्य करणाऱ्या पिपरे यांचा थेट निर्वाणीचा इशारा — 'विधानसभेला साथ दिली, पण युतीमध्ये दुय्यम वागणूक का?'

Rajura Municipal Elections 2025 | राजुरा | विधानसभा क्षेत्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकांचं रणकंदन सुरू असताना, काँग्रेस-शिवसेना (उबाठा) युतीत फाटाफूट होण्याची ठिणगी पेटली आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे नव नियुक्त उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे यांनी थेट स्पष्ट इशारा दिला आहे—"युती टिकवायची असेल, तर सन्मान द्या; अन्यथा आम्ही राजुरा नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू."


शिवसेनेच्या २५ वर्षांच्या निष्ठेला केराची टोपली?

नितीन पिपरे हे नाव शिवसेना (उबाठा) गटाच्या राजुरा विभागात नवीन नाही. Rajura Municipal Elections 2025 तब्बल २५ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले पिपरे हे शहर प्रमुख, तालुका प्रमुख, वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख अशी अनेक पदं भूषवून आता विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख झाले आहेत. मात्र, या दीर्घकालीन निष्ठेनंतरही त्यांच्या पक्षाला काँग्रेसकडून सन्मान मिळत नसल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं आहे.


राजुरा शहर, गोवरी, सास्ती, आर्वी या भागात शिवसेनेचा भक्कम जनाधार आहे. आम्ही विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला रात्रीचा दिवस करून मदत केली. पण आजही आम्हाला स्थानिक निवडणुकीत जागा मागताना भिक मागावी लागते का? – नितीन पिपरे, शिवसेना (उबाठा)


काँग्रेसच्या जिंकण्यात शिवसेनेचा ‘गोपनिय’ वाटा

मागील विधानसभेत काँग्रेस उमेदवाराला शिवसेना (उबाठा) गटाचा मूक परंतु निर्णायक सहभाग होता. प्रचार, मते गोळा करणे, बूथ व्यवस्थापन अशा अनेक पातळ्यांवर शिवसैनिकांनी काम केलं. Rajura Municipal Elections 2025 मात्र, काँग्रेसने संपूर्ण जिल्ह्यात एकाही जागेसाठी शिवसेनेला उमेदवारी दिली नाही. "हे एकतर्फी युतीचं रूप आहे", असं भाजपमधून पक्षांतर केलेल्या काही राजकीय नेत्यांनीही टिप्पणी केली आहे.


पावसाळ्यानंतर राजकारण ढवळून निघणार!

पावसाळ्यानंतर निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या बैठका, इच्छुकांची चाचपणी, गुप्त चर्चा सुरू आहेत. अशातच शिवसेनेच्या या स्पष्ट भूमिका काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकते.


काँग्रेससाठी अडचणीचे संकेत

भाग शिवसेनेचा प्रभाव
राजुरा शहर भक्कम मतदारसंघ, अनुभवी कार्यकर्ते
गोवरी गतवर्षीच्या प्रचारात निर्णायक भूमिका
सास्ती स्थानिक नेतृत्व प्रभावी
आर्वी युवा कार्यकर्त्यांचा मोठा जमाव


जर या सर्व भागांत शिवसेना (उबाठा) स्वतंत्र लढली, तर काँग्रेसला किमान ४-५ जागांवर जबरदस्त फटका बसू शकतो. "शिवसेनेचा एकेक मतदार हाक देतो, तो खरा मतनिर्णायक ठरतो", असं एका वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.


'युती' की 'युद्ध'? – राजकीय समीकरणे ढासळणार का?

राजुरा परिसरात काँग्रेस-शिवसेना युती फारशी खोलवर रुजलेली नाही. ही युती राष्ट्रीय पातळीवर झाली असली तरी, स्थानिक पातळीवर ती निष्ठेवर नाही तर फक्त लाभावर आधारित आहे. Rajura Municipal Elections 2025 शिवसेना (उबाठा) गट जर स्वतंत्र लढतो, तर तो भाजपला थेट मदत न करता काँग्रेसचं गणित बिघडवू शकतो.


'सन्मान किंवा संघर्ष' — पिपरे यांचा निर्वाणीचा इशारा

नुकतीच झालेली नितीन पिपरे (Nitin Pipare) यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती, हा पक्षातील नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला विश्वास दर्शवतो. मात्र, त्याच वेळेस त्यांनी काँग्रेसच्या वागणुकीवर रोष व्यक्त करत, युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

दहा जागा आम्हाला योग्य वाटत नाहीत, पण दहा वर्षांची निष्ठा मात्र काँग्रेस विसरू पाहते आहे, नितीन पिपरे


जनतेचा सूर: 'स्वबळावरची लढाई स्वागतार्ह!'

महावाणीने घेतलेल्या थेट प्रतिक्रिया —

शिवसेनेला जर युतीत मान नाही मिळाला तर नक्कीच स्वबळावर लढायला हवं. राजकारणात आत्मसन्मान गरजेचा आहे. अमोल कोसूरकर, गोवरी


गेल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्तेचा आस्वाद घेतला, पण कार्यकर्त्यांना विसरलं. शिवसेनेचा निर्णय योग्य वाटतो. कुणाल कुडे, सास्ती


नितीन पिपरे हे कष्टाळू आणि निष्ठावान नेते आहेत. त्यांनी स्वतंत्र वाट चोखाळली, तर अनेक तरुण त्यांच्या मागे उभे राहतील. गणेश चोथले, आर्वी


काँग्रेसची कसोटीची वेळ

शिवसेना (उबाठा) गटाच्या या इशाऱ्याने काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच घाम फुटले आहेत. एकीकडे भाजपने तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे युतीतच विसंवाद वाढतो आहे. Rajura Municipal Elections 2025 युती टिकवायची असेल, तर काँग्रेसने राजकीय अहंकार सोडून निष्ठावान मित्रपक्षांना सन्मान द्यावा, हीच वेळची गरज आहे.


शिवसेना (उबाठा) गट स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास, राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच समीकरणे ढवळून निघणार हे निश्चित! काँग्रेस आता तरी जागेवर येईल का?


Why is Shiv Sena (UBT) threatening to go solo in Rajura elections?
Due to lack of respectful seat allocation by the Congress party despite their long-standing alliance and support in the past elections.
Who is Nitin Pipre and why is he significant in this context?
Nitin Pipre is a senior Shiv Sena (UBT) leader with 25 years of experience, recently appointed as Deputy District Chief of Rajura Assembly region.
What areas show Shiv Sena (UBT) influence in Rajura?
Shiv Sena (UBT) has significant grassroots presence in Rajura city, Gowari, Sasti, and Arvi, making them a decisive force in local polls.
What could be the political impact if Shiv Sena (UBT) contests independently?
It could severely dent Congress's chances, disrupt alliance dynamics, and potentially alter election outcomes in multiple municipal wards.


#RajuraMunicipalElections2025 #RajuraMunicipalPolls #ShivSenaUBT #CongressAllianceCrisis #NitinPipre #RajuraPolitics #MaharashtraPolitics #LocalBodyElections #MunicipalElection2025 #PoliticalShowdown #AllianceTensions #RajuraNews #ShivSenaLeadership #UBTVoice #RespectOrExit #CongressNeglect #GrassrootPolitics #UrbanPolls2025 #IndependentFight #AllianceBreakup #MarathiPolitics #ChandrapurDistrict #RajuraUpdates #LocalGovernance #PoliticalTurmoil #ElectionBattle #SeatsDispute #PowerStruggle #PoliticalTensions #NitinPipreSpeaks #CongressStrategy #MunicipalPowerPlay #UBTRising #RajuraWarRoom #PartyPolitics #VoteForChange #RespectForAllies #SwabalPolitics #RuralMandate #ElectoralThreat #CivicBodyElection #OppositionPolitics #RajuraCrisis #YutiPolitics #2025Elections #SeatsMatter #ShivSenaDemand #AlliancePolitics #RajuraVoters #MaharashtraUpdates #ShivSenaVoice #CongressDilemma #Mahawani #Marathinews #RajuraNews #ChandrapurNews #VeerPunekarReport #RajuraElection

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top