Chandrapur Police Action | बियाणे घोटाळा, जंगलात जुगार आणि लोखंडी प्लेटांची चोरी

Mahawani
0

चंद्रपूर | जिल्ह्यातील प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेला सातत्याने आव्हान देणाऱ्या घटकांविरोधात अखेर पोलिसांनी घाम गाळणारी, ठोस आणि कठोर कारवाई केली आहे. १४ जून २०२५ या एकाच दिवशी, चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने बियाणे घोटाळा, जंगल परिसरातील जुगार अड्डा, आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या सोयीवर घाला घालणाऱ्या लोखंडी प्लेट चोरीसारख्या तिन्ही स्वतंत्र आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल केली.

बियाणे माफिया, जंगलात जुगारबाज आणि सरकारी माल चोरांच्या आवळल्या मुसक्या

Chandrapur Police Action: चंद्रपूर | जिल्ह्यातील प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेला सातत्याने आव्हान देणाऱ्या घटकांविरोधात अखेर पोलिसांनी घाम गाळणारी, ठोस आणि कठोर कारवाई केली आहे. १४ जून २०२५ या एकाच दिवशी, चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने बियाणे घोटाळा, जंगल परिसरातील जुगार अड्डा, आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या सोयीवर घाला घालणाऱ्या लोखंडी प्लेट चोरीसारख्या तिन्ही स्वतंत्र आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल केली.


या तिपटी गुन्ह्यांच्या तपशीलवार चिरफाड केल्यास, एक गोष्ट स्पष्ट होते — कायद्याच्या धास्तीशिवाय प्रशासन आणि समाजघटकांवर दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना ठोस प्रत्युत्तर देण्यास पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र, या कारवायांचा धडा प्रशासनातील इतर विभागांनी घेण्याची गरज तेवढीच तातडीची आहे.


१२ लाखांचे बियाणे जप्त — बियाणे माफियांना अखेर धडा!

१४ जून रोजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस ठाणे बल्लारपूरचे जवान पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विसापूर-बल्लारपूर रोडवर टाटा एस (MH40-AB-2356) या वाहनाला अडवून तपासणी केली असता, प्रचंड प्रमाणात अवैध बियाण्यांचा साठा सापडला. Chandrapur Police Action ज्यात ८०० नग पॉकेट्स – "चोर बीटी पुष्पा ५नी संशोधित हायब्रीड कापूस बियाणे", एकूण किंमत – ₹१२,००,०००/-

या बियाण्यांची कोणतीही वैध परवानगी नसल्याने, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून याची सखोल पडताळणी करून वाहन चालक इमरान खान (रा. चंद्रपूर) व मालक सुमित नगराळे (रा. आष्टी, गडचिरोली) यांच्यावर बियाणे अधिनियम १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, व अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले नक्की पण हा घोटाळा केवळ एका ट्रकमध्ये सापडलेल्या ८०० पॉकेट्सपुरता मर्यादित नाही — तो एक व्यापक बियाणे काळाबाजाराचे संकेत देतो करीता पोलीस प्रशासनाने कसून तपस करून याचे मूळ शोधून काढावे. 


जंगलात जुगार अड्ड्यांवर रेड — कायदा जंगलात हरवतोय का?

याच दिवशी, नागभीड पोलीस ठाणे हद्दीतील ‘बोंड राजोली’ जंगल परिसरात ५२ पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या टोळक्यांवर धाड टाकण्यात आली. Chandrapur Police Action धाडीत ₹२७,८००/- रोख, २ मोबाईल, ६ मोटारसायकल्स, एकूण किंमत: ₹३,४८,४००/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मात्र, एक महत्त्वाचा मुद्दा येथे दुर्लक्षित होत आहे:

जंगल परिसरातील या अड्ड्यांचे ‘मूक समर्थन’ स्थानिक राजकीय मंडळी किंवा काही अधिकारी करत आहेत का? कारण ही पहिली घटना नाही — आणि जर ठोस कार्यवाही झाली नाही, तर शेवटचीही ठरणार नाही.


लोखंडी प्लेट चोरी प्रकरण — शेतकऱ्यांच्या शेती पाणी योजनांवर हल्ला

२ मे रोजी ब्रम्हपुरी येथील प्रकाश कुथे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बेलदाटी शिवारातील बंधाऱ्यांवरील ₹६०,०००/- किंमतीचा लोखंडी ३० नग लोखंडी प्लेट्स चोरीस गेल्या होत्या. Chandrapur Police Action हे केवळ चोरीचे प्रकरण नाही. हे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर घाला आहे.


सदर प्रकरणात आरोपी राकेश वैरकार, छगन गुरनुळे, सुरज मेश्राम व महेश सहारे यांना अटक करण्यात आली असून सहायक वाहन – महिंद्रा बोलेरो पिकअप ₹२,००,०००/-,  व लोखंडी प्लेट ₹६०,०००/- एकूण ₹२,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस यंत्रणेचं शाबासकीचं काम — पण पुरेसं नाही!

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही तिपटी कारवाई खरोखरच उल्लेखनीय आहे.

त्यात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, श्याम गव्हाणे, प्रमोद बानबले, दीपक कॉकेंडवार, बलराम झाडोकर आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील टीमने अत्यंत कुशलतेने आपले कर्तव्य पार पाडले. Chandrapur Police Action पण इथे एक स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल पोलीस कारवाई ही फक्त लक्षणावर उपचार आहे — आजारावर नाही.


बियाणे घोटाळा थांबवण्यासाठी कृषी विभागाची जबाबदारी निश्चित करावी लागेल. जंगल भागात जुगार अड्ड्यांना आश्रय मिळतो, हे स्पष्ट सूचित करतं की स्थानिक पातळीवर कुणीतरी ‘संरक्षण’ देत आहे. Chandrapur Police Action त्यावर कारवाईची गरज आहे. शासकीय पायाभूत सुविधा (बंधारे, लोखंडी प्लेट्स) चोरून खाजगी लोखंड बाजारात विकली जातात, यावर नियमन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रण आणण्याची गरज आहे.


प्रशासनाला ठोस प्रश्न:

  1. बियाणे प्रकरणात कृषी निरीक्षकांचा तपास सुरु आहे का?
  2. पैशांच्या मोबदल्यात जुगार अड्डे सुरू ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?
  3. जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांवर व शेतकऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेचे नियोजन कधी?
  4. गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करून शासनाच्या तिजोरीत भर कधी टाकणार?


ही एकाच दिवशी झालेली तीन मोठ्या गुन्ह्यांची कारवाई म्हणजे चंद्रपूर पोलिसांनी (chandrapur police) दाखवलेली ‘सर्जिकल स्ट्राईक’ आहे. मात्र, या कारवायांचा परिणाम दीर्घकालीन हवा असेल, तर प्रशासनाच्या इतर संबंधित विभागांनीही तत्काळ आणि पारदर्शक कारवाई सुरू केली पाहिजे. Chandrapur Police Action नाहीतर, हे फक्त ‘एक दिवसाचे धाडस’ म्हणून इतिहासात जमा होईल — आणि गुन्हेगारी पुन्हा नव्या रूपात डोके वर काढेल.


What crimes did Chandrapur Police solve in a single day?
Chandrapur Police solved three serious crimes in a single day: a seed scam involving misappropriated government seeds, a gambling den operated in a forest area, and theft of iron plates meant for public construction.
What is the seed scam about?
The seed scam involved unauthorized distribution and potential black-market sale of government-provided seeds, allegedly with involvement of agriculture department insiders or middlemen.
How did the gambling den operate in the forest?
A clandestine gambling setup was discovered in a remote forest patch. Police raided the spot and seized cash, playing materials, and detained several individuals involved.
What was stolen in the iron plate theft case?
Dozens of iron plates, originally procured for road or drainage construction work, were stolen. The police recovered stolen material and arrested suspects possibly linked with local contractors.


#ChandrapurPolice #SeedScam #GamblingRaid #ForestCrime #IronTheft #TripleCrimeDay #MaharashtraCrimeNews #PoliceAction #ChandrapurNews #BiyaneGhotala #ChoriUghadki #CrimeBusted #IndianPolice #DistrictCrime #ActionDay #IllegalGambling #ScamAlert #NewsUpdate #LocalNews #HotNews #MahaPolice #SeedFraud #ForestRaid #JungleGambling #ChandrapurToday #BreakingNews #CrimePatrolling #OneDayThreeCases #PoliceIntelligence #DistrictAlert #FastAction #NewsOfTheDay #TrioCrimes #CaughtInAction #UnderSurveillance #VillageCrime #ScamCracked #IronPlatesTheft #CriminalNetwork #CrimeControl #ChandrapurCrime #PoliceEfficiency #RuralCrime #DistrictNews #BoldAction #InvestigationSuccess #PoliceAlert #DailyCrimeNews #GrassrootsCrime #SpotlightNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top