गावागावातून पेटवलेली जनगणनेची जळती मशाल अखेर पोहचली दिल्ली दरबारी
चंद्रपूर: पासून दिल्लीपर्यंत जातनिहाय जनगणनेसाठी पेटलेली लढाई अखेर एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. केंद्र सरकारने अखेर ओबीसी समाजाच्या सर्वंकष मागणीला प्रतिसाद देत जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे. OBC Caste Census मात्र ही मंजुरी अचानक स्वर्गातून पडलेली कृपा नसून, ही आहे एका जिद्दी, विचारसंपन्न आणि समाजाभिमुख कार्यकर्त्याच्या – दिनेश पारखी Dinesh Parkhi यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाची पराकाष्ठा. ही केवळ त्यांच्या वैयक्तिक जिद्दीची नव्हे, तर ओबीसी समाजाच्या समविचारी लोकांची सामाजिक क्रांती आहे.
२०१९ पासून रणशिंग फुंकले!
दिनेश पारखी यांनी २०१९ सालापासूनच ओबीसी जनगणनेचा मुद्दा हातात घेतला. ३ सप्टेंबर २०१९ रोजी एका दिवसीय धरणे आंदोलनाने या लढ्याची सुरुवात झाली. OBC Caste Census नुसते आंदोलनच नाही, तर समाजाला जागवण्यासाठी १० सप्टेंबर २०१९ रोजी परिषद व चर्चासत्राचे आयोजन झाले. त्यानंतर १३ डिसेंबरला आंदोलन, २८ डिसेंबरला रॅली — ही सारी मोहीम केवळ कागदावरची नव्हे, तर हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रत्यक्षात राबवली गेली.
जनजागृती हीच खरी क्रांती, हे लक्षात घेऊन पारखी यांनी ‘घर-घर जनगणना जागृती मोहीम’ २९ जानेवारी २०२० पासून सुरू केली. कुणबी समाज मंडळासोबत ८-९ फेब्रुवारीला चंद्रपूरमध्ये शेतकरी मेळाव्यातून १००० पोस्ट कार्डसह सह्यांची मोहीम राबवली. ११-१२ जानेवारीच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात तर ४००० सह्यांचे संकलन झाले. OBC Caste Census ही केवळ मोहीम नव्हती, तर प्रत्येक सह्या मागे असलेल्या आवाजांचा स्फोट होता.
गावागावातून पेटवलेले रणदिवे
२०१९ च्या जूनपासूनच गावोगावी जाऊन पारखी यांनी जनगणनेच्या मुद्द्यावर जनजागृती केली. आर्वी, बामणी, गोवरी, भेदोडा, कवीटपेठ, कुकुडसाथ, चिंचोली, सोंडो, टेंबुरवाही, निमनी, नांदगाव, सोनूर्ली, अहेरी, जवाहर नगर, गडचांदूर, नागपूर, भद्रावती, पेल्लोरा, राजुरा (Rajura), बल्लारपूर, अंतरगाव, दिल्ली — एक ना दोन, तब्बल ७२ पेक्षा अधिक गावे आणि शहरांमध्ये त्यांनी ही मशाल पेटवत ठेवली.
सांस्कृतिक लढ्याला चालना
ओबीसी जनगणनेसाठी कविता आणि चारोळी स्पर्धा घेऊन त्यांनी या विषयाला केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आंदोलक रूप दिले. OBC Caste Census त्यांनी समाजाच्या विविध स्तरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या सर्व चळवळीचा ब्रीदवाक्य ठरले — "जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी".
वैयक्तिक त्याग आणि संकल्प
हा लढा केवळ सार्वजनिक नव्हता. पारखी यांनी स्वतःच वैयक्तिक संकल्प घेतला — "जोपर्यंत ओबीसी जनगणना होणार नाही, तोपर्यंत मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही".
हा घोष फक्त भावना नव्हती. हा ठाम निर्धार होता. स्वतःच्या आनंदाला तिलांजली देऊन त्यांनी समाजहितासाठी उभी राहिलेली ही भूमिका आज क्वचितच पाहायला मिळते. एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी संघर्षाचे एक नवे मापदंड निर्माण केले.
दिल्ली दरबारी यश, पण युद्ध अपूर्ण
केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेस मान्यता दिली, हे खरेच मोलाचे आहे. पण याचा अर्थ असा नाही की लढा संपला. ही केवळ पहिली पायरी आहे. OBC Caste Census पुढील टप्पे अधिक कठीण असतील — योग्य प्रकारे, पारदर्शक आणि सुस्पष्ट जातनिहाय माहिती संकलित करणे, ती लोकांसमोर आणणे आणि नंतर त्यावर आधारित धोरणनिर्मिती सुनिश्चित करणे.
प्रश्न प्रशासनाला — इतके वर्ष डोळेझाक का?
या लढ्याला यश मिळण्यासाठी एवढा संघर्ष का लागला? प्रशासनाने यापूर्वीच का नाही जनगणना केली? लोकसंख्येच्या आकड्यांशिवाय योजना आखणं म्हणजे डोळे झाकून दिशा ठरवणं. OBC Caste Census मग केंद्र आणि राज्य सरकारांनी इतकी वर्षे हा मुद्दा टाळत का ठेवला? हीच खरी जबाबदारीची बोचक टिका आहे, जी आजही उत्तराची मागणी करते.
पारखींचा लढा म्हणजे लोकशाहीची खरी जाणीव
लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे. लोकशाही म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या, अधिकारांच्या, ओळखीच्या लढ्याची जाणीव. ही जाणीव निर्माण केली दिनेश पारखी Dinesh Parkhi यांनी. OBC Caste Census त्यांनी दाखवून दिलं की, एक सामान्य कार्यकर्ता जर ठरवलं तर संपूर्ण प्रशासनाच्या कानांवर पाय ठेवू शकतो.
जातनिहाय जनगणनेस मान्यता ही ऐतिहासिक घटना आहे, पण ती कुण्या सरकारची दयाळूपणा नसून एका समाजाच्या संघर्षाचं फलित आहे. आणि त्या संघर्षाच्या अग्रभागी उभे होते — दिनेश पारखी. त्यांना शतशः सलाम!
हा लढा अजून अपूर्ण आहे. OBC Caste Census आकडे संकलित होणार आहेत, त्यानंतर त्यावर आधारित अधिकार मागावे लागणार आहेत. पण एक गोष्ट निश्चित — ओबीसी समाजाने आपला आवाज बुलंद केला आहे आणि तो आवाज आता थांबणार नाही.
"हक्क मागून मिळत नाही, तो संघर्षातून मिळवावा लागतो — आणि हे पारखींनी करून दाखवलं!"
Who is Dinesh Parkhi and what is his role in the OBC caste census movement?
What is the significance of the OBC caste census in India?
When did the movement for the OBC caste census begin?
Has the Indian government approved the OBC caste census?
#OBC #OBCReservation #CasteCensus #DineshParkhi #SocialJustice #BackwardClasses #OBCRights #OBCVoice #Chandrapur #DelhiProtest #CasteEquality #OBCMovement #Census2025 #ModiGovt #MaharashtraPolitics #SocialReform #IndiaPolitics #CasteInIndia #JusticeForOBC #OBCUnity #OBCLeadership #InclusiveIndia #CasteDebate #EmpowerOBC #BackwardClassRights #DemocraticIndia #GrassrootsActivism #RuralMovement #CasteBasedCensus #ConstitutionalRights #BharatOBC #OBCPower #WeAreOBC #OBCMatters #SpeakForOBC #EqualParticipation #OBCDemand #CasteDisparity #CountOBC #IndiaCensus #UnityForOBC #RiseOBC #AwakeningOBC #OBCYouth #JusticeDelayedJusticeDenied #IndiaSocialCensus #VoiceOfTheVoiceless #CasteAwareness #RepresentationMatters #OBCEmpowerment #OBCCasteCensus #VeerPunekar