Tribal Awakening Rajura : सत्काराच्या नावाखाली फक्त दिखावा

Mahawani
10 minute read
0

Rajura | A tribal community awareness meeting and a program organized to felicitate newly elected tribal ministers, MPs, and MLAs was held today, April 27, 2025, at the M.S. Kannamwar Auditorium in Rajura.

राजुरातील मेळाव्यात मंत्री आणि खासदार गायब, आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप!

राजुरा | आदिवासी समाज प्रबोधन मेळावा आणि नवनिर्वाचित आदिवासी मंत्री, खासदार, आमदारांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रम आज २७ एप्रिल २०२५ रोजी राजुरातील मा.सा. कन्नमवार सभागृहात पार पडला. परंतु अपेक्षेप्रमाणे या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नियोजित उद्घाटक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि अध्यक्ष खासदार डॉ. नामदेवराव किरसान हे दोन्ही मान्यवर अनुपस्थित राहिले. या गैरहजेरीमुळे उपस्थित हजारो आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप उसळला. Tribal Awakening Rajura सत्काराचे निमित्त घेऊन उभा करण्यात आलेला हा तमाशा, प्रत्यक्षात आदिवासी समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कितपत गंभीर आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


नेते गैरहजर, जनता उपस्थित; अपमान कुणाचा?

कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दूरदूर गावांमधून कष्ट करून आलेल्या आदिवासी बांधवांना, आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवला जाईल, आपल्या नेत्यांकडून धीर आणि मार्गदर्शन मिळेल, अशी आशा होती. Tribal Awakening Rajura परंतु मंचावरील प्रमुख चेहऱ्यांची अनुपस्थिती हा सामान्य जनतेच्या विश्वासावर केला गेलेला थेट प्रहार होता. तसेच समाजाच्या आराध्य देवी समोर ११ बकऱ्याचा नवस फेडणारे स्थानिक विद्यमान आमदार देखील या मेळाव्यात आमंत्रित होते परंतु ते क्षेत्रात उपस्थित असून देखील सदर मेळाव्यात अनुपस्थित असल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे.


❝ आम्ही आजपर्यंत फक्त मतांसाठी उपयोगात आणले जातो आणि नंतर आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. ❞

- एका ज्येष्ठ आदिवासी नेत्याची प्रतिक्रिया

❝ सत्काराच्या फुलाफळांची आम्हाला गरज नाही; आम्हाला हक्काची जमीन, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार पाहिजे. ❞

- अनेक आदिवासी नागरिकांची भावना


भव्य मेळाव्याच्या नावाखाली तुच्छ करणारा खेळ

या मेळाव्यात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. दोन अत्यंत महत्त्वाचे नेते — उद्घाटक आणि अध्यक्ष — अनुपस्थित राहिले आणि उरलेल्या मान्यवरांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेला. माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर आणि आमदार राजू तोडसाम यांनी कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु मूलभूत प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी सर्व काही औपचारिकतेपुरतेच मर्यादित राहिले.


एकेकाळी 'आदिवासी स्वाभिमानासाठी' रणरणणाऱ्या व्यासपीठावर आज केवळ पुरस्कार, प्रमाणपत्रे आणि कौतुकाच्या गोड शब्दांनीच कार्यक्रमाची शोभा वाढवली गेली. खऱ्या अर्थाने आदिवासी प्रश्नांवर — जसे की, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत होणाऱ्या अडचणी, शिक्षणातील वाढती दरी, आरोग्यसेवांची बिकट अवस्था — यावर साधी ठोस भूमिका घेतली गेली नाही. Tribal Awakening Rajura या विषयांवर कडाडून आवाज उठवण्याची गरज असताना, केवळ गुळमुळीत भाषणांनी उपस्थित जनतेची थट्टा केली गेली.


कुठे आहेत आमचे खरे प्रतिनिधी?

डॉ. अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही. त्यांची अनुपस्थिती केवळ व्यक्तिगत नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची आदिवासी प्रश्नांप्रती असलेली बेपर्वाई दाखवणारी आहे.


खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तसदी घेतली नाही. ही गोष्ट केवळ अपमानजनकच नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या राजकीय अस्तित्वावर थेट आघात करणारी आहे. Tribal Awakening Rajura सत्कार करून समाजाला गोंजारायचे आणि प्रत्यक्ष कृतीत त्यांना वाऱ्यावर सोडायचे, हा डाव आता उघड उघड दिसू लागला आहे.


कोण विचारेल आदिवासींना?

प्रशासनाचे आदिवासी समाजाबाबतचे धोरण फक्त कागदावर आहे का? सर्वसमावेशक विकासाच्या गोंडस घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात कोणतेही ठोस पाऊल उचलायचं नाही, अशीच परिस्थिती आहे. Tribal Awakening Rajura आदिवासी भागात अजूनही शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, आरोग्य सुविधा कोसळलेल्या आहेत आणि रोजगाराच्या संधी तर हाताच्या बोटांवर मोजाव्या लागतात. पाणी, वीज, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार दरबारी जी अपयशाची मालिका सुरू आहे, तिचे वास्तव प्रशासन नेहमीच झाकायचा प्रयत्न करते.


फक्त सत्कार, समस्या तशाच

राजुरा येथील आजचा प्रबोधन मेळावा आणि सत्कार सोहळा हा आदिवासी समाजाच्या वास्तव जीवनाला स्पर्शही न करणारा, केवळ औपचारिकतेचा खेळ झाला. मंचावर कौतुकाचे गोड बोल झाले, पण जमिनीवर प्रश्न अनुत्तरितच राहिले. "सत्काराचे मखमली फुल आमच्या पोटाची भूक भागवत नाही," असे म्हणणाऱ्या एका तरुण आदिवासी कार्यकर्त्याचे शब्द आज हजारो समाज बांधवांच्या मनातील सल व्यक्त करत होते.


📢 प्रशासनाला थेट प्रश्न

  • आदिवासी समाजाच्या खऱ्या प्रश्नांवर सरकारने कोणती ठोस पावले उचलली आहेत?
  • कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आणि अध्यक्षतेसाठी निमंत्रित केलेले मंत्री व खासदार कार्यक्रमात गैरहजर राहिल्याबद्दल कोणती जबाबदारी निश्चित होणार?
  • नुसत्या भाषणांनी आणि सत्काराने आदिवासी समाजाचा विकास होणार आहे का?
  • आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या समस्यांवर तात्काळ ठोस कृतीचा आराखडा कधी जाहीर होणार?


संघर्षाशिवाय बदल नाही

आजचा कार्यक्रम हा एक स्पष्ट इशारा आहे की, आदिवासी समाजाला स्वतःचा आवाज आणखी बुलंद करावा लागेल. नेत्यांची प्रतीक्षा करून वाया घालवायचा काळ संपला आहे. स्वतः संघटीत होऊन, शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी व्यवस्थेला धक्के देण्याची गरज आहे.


ज्यांना समाजाने निवडून दिलं, त्यांनीच जर समाजाकडे पाठ फिरवली, तर असा नेतृत्व वर्ग साफ करण्याची ताकदही आता आदिवासी समाजात आहे. Tribal Awakening Rajura 'सत्कार' नाही, 'हक्कांची लढाई' हाच आदिवासी समाजाचा खरा मार्ग आहे, हे या कार्यक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.


What happened at the Tribal Awareness Meet in Rajura on April 27, 2025?
The event saw massive public turnout but major leaders like the Tribal Development Minister and MP were absent, triggering public outrage.
Why were people upset at the Rajura Tribal Event?
Citizens were angered as key leaders skipped the event, and real issues like education, healthcare, and employment were ignored.
What demands were raised by the tribal community at Rajura?
The community demanded urgent action on land rights, better education, healthcare facilities, employment opportunities, and accountability from elected leaders.
Who attended the Rajura Tribal Meet despite the absence of key officials?
Former MLAs, local leaders, and thousands of tribal citizens attended and expressed their disappointment and call for stronger action.


#TribalAwakeningRajura2025 #TribalAwakeningRajura #TribalRights #Rajura #RajuraNews #RajuraUpdates #TribalAwakening #RajuraEvent #AdivasiRights #AdivasiVoice #Rajura2025 #RajuraPolitics  #TribalJustice #RajuraToday #AdivasiUnity #RajuraHighlights #RajuraLive #TribalIssues #RajuraDistrict #RajuraCity #Chandrapur #ChandrapurUpdates  #Gadchiroli #TribalLeaders #RajuraAdhikar #RajuraFight #TribalDemands #TribalNews #RajuraMela #RajuraGroundReport #AdivasiStruggle #RajuraMassMeeting  #TribalFuture #RajuraAssembly #RajuraMLA #RajuraMP #RajuraSatyagraha #TribalMovement #RajuraVikas #RajuraYouth #RajuraProtest #AdivasiYouth  #RajuraSocialJustice #RajuraVoice #RajuraEventCoverage #RajuraBreaking #RajuraGramSabha #RajuraPoliticalNews #RajuraDemand #RajuraLeadership  #TribalEmpowerment #JusticeForAdivasis

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top