Election Violation | कढोलीत पैशांचा खेळ उघड; भाजप प्रचारकाला पकडले रंगेहात

Mahawani

आदर्श आचारसंहितेचा भंग; गावकऱ्यांच्या संतापाचा उडाला भडका

Violation of the model code of conduct; Villagers' anger flared up


चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कढोली बु. येथे आज दिनांक. २० नोव्हेंबर २०२४ मतदानाच्या दिवशी एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले. गावकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रचारक हरिचंद्र कोरडे रा. घुघुस व पसार महादेव ठेंगणे यांना मतदानावर पैसे आणि प्रलोभनांचा वापर करत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताना रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्याकडे दोन काळ्या पिशव्या (कॉलेज बॅग) आणि भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रचार नोंदवह्या Election Violation सापडल्या. या वह्यांमध्ये "लाडक्या बहिणांचा लाडका दादा" असे लिहलेले आढळले. गावातील नागरिकांनी कोरडे यांना चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. याच वेळी, गावकऱ्यांनी कोरडे याच्या केलेल्या झडतीत मतदारांना पैसे वाटप करण्याचे पुरावे, प्रचार साहित्य, आणि गावातील भाजप कार्यकर्त्यांचे थेट संलग्न असल्याचे धक्कादायक पुरावे उघड झाले. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.


      


कालपासून गावात संशयास्पद हालचाली दिसून येत असल्याने गावकऱ्यांनी हरिचंद्र कोरडे आणि त्याचा पसार साथीदार महादेव ठेंगणे जे गावकऱ्यांसाठी अनोळखी असल्याने यांच्यावर पाळत ठेवली होती. ते गावातील मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे निदर्शनात आल्याने गावात कुचबुज पसरली होती. या व्यक्तींना आज गावातील काही नागरिकांनी प्रचार व गावातील मतदारांना पैश्याचे अमिश दाखवताना रंगे हात पकडले. याचे व्हिडिओ गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.


व्हिडिओत हरिचंद्र कोरडे यांनी स्पष्टपणे भाजपचे पदाधिकारी तथा राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश हिंगणे आणि इतर भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. व्हिडिओत राकेश हिंगाणे गावकऱ्यांच्या तावडीतून निसटताना स्पष्ट दिसत आहे.


अधिक वाचा: त्या ६,८५३ बोगस मतदारांपैकी कोणीच दोषी नाही?


गावकऱ्यांनी या घटनेवर तात्काळ कारवाई करत कोरडे यांना पकडले मात्र साथीदार महादेव ठेंगेने याला घटनास्थळावरून पसार होण्यात यश आले. कोरडे यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत कोरडे यांना चांगला चोप दिला. यामुळे गावातील वातावरण आणखी तापले आहे. "मतदानाच्या पवित्र प्रक्रियेला अशा प्रकारे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न कोण सहन करेल?" असे प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत.


कढोली बु. येथील घटना केवळ स्थानिक गावापुरती मर्यादित राहिली नाही. यापूर्वी गडचांदूर आणि गोंडपिपरी येथेही भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी अशा घटनांची वारंवारता ही निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उभे करते.


पोलीस प्रशासनाने कोरडे यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर लोकशाहीच्या शुद्धतेवर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.


आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन Election Violation करणे हे भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा आहे. अशा घटनांवर आयपीसी कलम १७१बी (मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी आर्थिक प्रलोभन देणे) आणि कलम १७१ई (मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न) अंतर्गत कारवाई होऊ शकते. या घटनेतही दोषींवर योग्य ती कठोर कारवाई झाली, तरच निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास राहील असे गावकर्यांनी सांगितले आहे.


मतदानाच्या पवित्र प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या या घटनेवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. दोषींना तातडीने अटक होऊन निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कडक पावले उचलली पाहिजेत.



#Mahawani #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #ElectionBribery #ElectionScam #Election2024 #BJPScandal #ChandrapurNews #RajuraNews #KorpanaNews #BriberyCase #VoterInfluence #ElectionViolation #AdarshCode #ECAction #PoliceInvestigation #BreakingNews #BriberyScandal #DemocracyUnderThreat #LocalPolitics #ChandrapurElections #RajuraPolitics #KorpanaUpdates #VoterBribery #ElectionCorruption #BJPUnderFire #VoteBuying #VoterRights #ChandrapurUpdates #ElectionTransparency #ScamAlert #BJPWorkerCaught #ElectionDayScandal #BJPCorruption #LocalNews #ElectionIntegrity #ChandrapurPolitics #RajuraUpdates #VoterProtection #ElectionLaw #BriberyInvestigation #BJPInfluence #ChandrapurPolice #ElectionAccountability #ChandrapurPolls #ElectionViolation

To Top