राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुथवर वाद
वर्धा : जिल्ह्यातील उमरी मेघे भागात काल २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुथ व्यवस्थापनावरून वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. कराळे मास्तर Nitesh Karale यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु मुख्य दोषी अद्याप निश्चित झाले नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे Nitesh Karale आपल्या परिवारासह घराच्या दिशेने जात असताना रस्त्यात असलेल्या मतदान बुत पाहणी साठी थांबले असता त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता. उमरी मेघे परिसरात मतदान प्रक्रिया सुरू असताना, बुथवर लॅपटॉप लावण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल झाला. सदर घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेत कोणाचा मुख्य दोष आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी सांगितले की, भाजप कार्यकर्त्यांनी कराळे मास्तर यांना अचानक लक्ष्य केले. बुथच्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेला हा वाद प्रत्यक्ष हाणामारीपर्यंत पोहोचला. राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी कराळे मास्तर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गोंधळात परिस्थिती आणखी बिघडली होती.
अधिक वाचा: कढोलीत पैशांचा खेळ उघड; भाजप प्रचारकाला पकडले रंगेहात
या प्रकरणात पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरीही प्रकरणी मुख्य दोषी ठरवण्यात उशीर होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, निवडणुकीच्या काळात प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. Nitesh Karale
मतदानादरम्यान अशा घटना घडणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेसमोर आव्हान आहे. या प्रकारामुळे वर्धा जिल्ह्यातील शांततामय मतदान प्रक्रियेवर गालबोट लागले आहे. पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, निवडणूक आयोगानेही याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मी माझ्या गावावरून मतदान करून वर्धा मतदारसंघात जात होतो माझ्या बरोबर माझे कुटुंबही होते. उमरी या गावात जाणाऱ्या रस्त्यावर थांबून लोकांशी संवाद साधत होतो. त्याचवेळी पोलिसांनी सूचना दिली की, तुमच्या बुथवर दोन लोक ठेवा. समोरचा बुथ जो आमदार पंकज भोयर यांचा होता, तिथे आठ लोक बसले होते. तिथे ग्रामपंचायतीचे काही कर्मचारीही होते, ज्यांच्याकडे लॅपटॉप होता.
मी याची माहिती घेण्यासाठी पोलिसांना कळवले आणि त्या कर्मचाऱ्याला विचारण्यासाठी पुढे गेलो असता त्यावेळी भाजपचा उमरीमधील एक कार्यकर्ता माझ्यावर थेट धावून आला आणि माझ्यावर हल्ला केला. माझ्या पत्नीला शिवीगाळ केली, आणि हल्ल्यात माझ्या लहान मुलीलाही दुखापत झाली. - नितेश कराळे, मास्तर
#Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #MarathiNews #VeerPunekar #Chandrapur #Rajura #Korpana #WardhaNews #NCP #BJP #ElectionViolence #PoliticalClash #BoothClash #VotingDayIncident #WardhaElection #NiteshKarale #KaraleMaster #PoliticalNews #MaharashtraPolitics #BreakingNews #MarathiUpdates #WardhaViolence #BoothPolitics #ElectionTension #NCPvsBJP #PoliticalConflict #MarathiMedia #NewsAlert #CurrentAffairs #ElectionDayClash #MaharashtraElections #MarathiBreakingNews #MahawaniUpdates #NCPLeader #PoliceIntervention #VotingClash #Lokshahi #ElectionFights #KaraleStatement #WardhaUpdates #BJPWorkers #ElectionDayViolence #MaharashtraNews #PoliticalTensions #Shivigali #VotingIncidents #DemocracyAtStake #MarathiJournalism