Warora Teacher Case | विनयभंग प्रकरणातील शिक्षकांना अटक

Mahawani

स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर टिमने दाखवली अत्यंत तत्परता

Warora Teacher Case | Cartoon of police apprehending suspects
संग्रहित छायाचित्र

  • महावाणी : विर पुणेकर
  • ३० ऑगस्ट २०२४

वरोरा : येथील लोकमान्य महाविद्यालयामधील दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीला वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या रुममध्ये बोलावले. त्यांनी तिला चॉकलेट दिले आणि गळा लागणे व हग करणे अशी मागणी केली. विद्यार्थिनीने विरोध दर्शवला, पण शिक्षकांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने तीतून आपली कशीबशी सुटका केली आणि तत्काळ वरोरा पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. Warora Teacher Case


पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आणि सहा. पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार केले. सायबर पथकासह शोधमोहीम घेतल्यानंतर, आरोपी रेल्वे स्टेशनवर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. त्यांना तत्परतेने पकडून वरोरा पोलीस स्टेशनला आणले असून. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिक्य तांबडे करत आहेत.


वरोरा पोलीस प्रशासनाने अत्यंत तत्परतेने आणि प्रभावीपणे कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर टिमच्या कार्यक्षमतेमुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यश मिळाले आहे. 


#Molestation #Waroora #PoliceArrest #Teachers #MinorStudent #CyberTeam #LocalCrimeBranch #WomenSafety #Mahawani #MahawaniNews #Warora Teacher Case

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top