उपविभागीय अधिकाऱ्यांनी पेपरमील प्रशासनाला जनहिताच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास भाग पाडावे; अन्यथा ठिय्या आंदोलनाची पुकारू
![]() |
उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांना निवेदन देताना |
- महावाणी : विर पुणेकर
- ३० ऑगस्ट २०२४
बल्लारपूर : शहरातील वन्यजीव हल्ल्यांच्या वाढत्या घटनांसाठी पेपरमील लकडा स्टाॅक यार्डला प्रमुख कारणीभूत ठरवून आम आदमी पार्टीने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यांच्या मते, शहराच्या नागरीवस्तीच्या जवळ असलेला हा स्टाॅक यार्ड प्राणीहल्ल्यांसाठी जबाबदार आहे. Paper Mill Stock Yard Issue
पक्षाने याबाबत उपविभागीय अधिकारी साहेबांना अनेकदा निवेदन दिले असून, या निवेदनानंतर उपविभागीय अधिकारी व पेपरमील प्रशासन यांच्यात बैठकही झाली होती. या बैठकीत, पक्षाने जनतेच्या आरोग्य व जीवनाशी संबंधित प्रश्न पेपरमील प्रशासनाला दिले होते आणि त्यांचे लेखी उत्तर मागितले होते.
परंतु, उपविभागीय अधिकारी तसेच पेपरमील प्रशासनाने या प्रश्नांचे उत्तर देण्यास दुर्लक्ष केले आहे. यामुळे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखालील एका पत्राद्वारे आठ दिवसांत पेपरमील प्रशासनाला उत्तर देण्यास भाग पाडण्याची मागणी केली आहे. अन्यथा, उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पात्रातून देण्यात आला आहे. Paper Mill Stock Yard Issue
या पत्राद्वारे, स्टाॅक यार्ड, प्रदूषण, व सी.एस.आर फंडसंबंधी प्रश्नांवर तातडीने उत्तर देण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे. यावेळी शहर सचिव ज्योतिताई बाबरे, महिला अध्यक्ष किरण खन्ना, उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, मनिषाताई अकोले, अल्पसंख्याक शहराध्यक्ष असलम शेख, गणेश अकोले, ज्योती तोडेकर, सरमन बन्सल यांची उपस्थिती होती.
#PaperMill #StockYard #AAP #Ballarpur #Protest #EnvironmentalIssues #Paper MillStockYardIssue #MaharashtraNews #ChandrapurCrime #GadchiroliUpdates #MaharashtraPolice #DistrictCouncil #MaharashtraDistricts #VidarbhaNews #CrimeInMaharashtra #MaharashtraTheft #MaharashtraPolitics #MaharashtraAgriculture #mahawaniNews #mahawani #MahawaniNewsHub #VeerPunekar #GovtJobsMaharashtra #MaharashtraEmployment #MaharashtraWeather #MaharashtraEducation #MaharashtraEconomy #MaharashtraLawAndOrder #MaharashtraTraffic #MaharashtraHealth #MaharashtraDevelopment #RuralMaharashtra #MaharashtraCulture #MaharashtraFestivals #MaharashtraSports #MaharashtraInfrastructure #MaharashtraTourism #MaharashtraUpdates #MaharashtraGovt #MaharashtraTechnology #MaharashtraEnvironment #MumbaiNews #PuneNews #NagpurNews #NashikNews #AurangabadNews #KolhapurNews #ThaneNews #SolapurNews #SataraNews #RaigadNews #NandedNews #AmravatiNews #AhmednagarNews #JalgaonNews #YavatmalNews #LaturNews #DhuleNews #BeedNews #JalnaNews #BhandaraNews #WardhaNews #OsmanabadNews #PalgharNews #SindhudurgNews #RatnagiriNews #ParbhaniNews #WashimNews #GondiaNews #HingoliNews #AkolaNews #BuldhanaNews #ChandrapurUpdates #MaharashtraEvents #DailyNews #LocalUpdates #BreakingMaharashtra #ChandrapurLocal #RegionalNews #TopHeadlines