Murder of Haji Sarwar Sheikh | हॉटेल शाही दरबार मध्ये हाजी सरवर शेख यांची हत्या

Mahawani


पाच अज्ञात व्यक्तींचा गोळीबार ; आरोपींचे आत्मसमर्पण

पाच अज्ञात व्यक्तींचा गोळीबार

  • महावाणी : विर पुणेकर
  • १२ ऑगस्ट २०२४

चंद्रपूर : आज दुपारी ३ वाजता हॉटेल शाही दरबार बिंबा गेट, चंद्रपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. हाजी सरवर शेख हॉटेलमध्ये जेवण करत असताना, अज्ञात पाच व्यक्तींनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडून गंबीर जखमी केले. सदर गोळीबारात हाजी सोबत जेवण करत असलेले त्यांच्या दोन सहकारीही गंभीर जखमी झाले आहे. हाजी व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळावरून सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान हाजी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्या साथीदारांवर उपचार सुरु आहे. 


घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, हाजी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले, ज्याने त्यांचा शरीरावरील गंभीर जखमांमुळे "हाजी" यांचा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे मृत्यू झाला.


हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हाजी सरवर शेख यांचे काही पूर्वविवाद किंवा इतर कारणे हत्येमागील कारण असू शकतात.


या घटनेच्या पार्श्वभूमीवर, परिसरात मागील काही महिन्यांमध्ये वारंवार घडलेल्या हिंसक घटनांनी चिंता वाढवली आहे. याअगोदर राजुरा येथे दोन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये एका निष्पाप महिलेचा व युवकाचा जीव गेला आहे. त्याचप्रमाणे बल्लारपूरमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकण्याचे प्रकारही झाले होते, ज्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. याशिवाय, चंद्रपूरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये एका नेत्यावर गोळीबार झाल्याची घटना देखील घडली आहे. या सगळ्या घटनांमुळे परिसरात गोळीबाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.


या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत खालील कलमे लावण्यात आली आहेत:

कलम ३०२: खुनासाठी (Murder), कलम ३०७: खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), कलम ३४: सामान्य हेतूने गुन्हा (Acts done by several persons in furtherance of common intention)


पोलिसांचे म्हणणे:

चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले की, "ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हाजी सरवर शेख यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु त्यांच्या पूर्वविवादांमुळे ही घटना घडली असावी, असा संशय आहे. आरोपींनी आत्मसमर्पण केले असून त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. तपासाचा वेग वाढविण्यात आला आहे, आणि लवकरच या हत्येच्या मागील सत्य उघड होईल अशी अपेक्षा आहे."


पोलीस विभागाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे, तसेच आणखी काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे.


पोलीस अधीक्षकांनी असेही सांगितले की, "आम्ही पुरावे गोळा करत आहोत आणि घटनेशी संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहोत. तसेच, आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर IPC कलम 201 अंतर्गत कारवाई करण्यात येईल."


#MaharashtraNews, #ChandrapurCrime, #GadchiroliUpdates, #MaharashtraPolice, #DistrictCouncil, #MaharashtraDistricts, #VidarbhaNews, #CrimeInMaharashtra, #MaharashtraTheft, #MaharashtraPolitics, #MaharashtraAgriculture, #GovtJobsMaharashtra, #MaharashtraEmployment, #MaharashtraWeather, #MaharashtraEducation, #MaharashtraEconomy, #MaharashtraCrime, #MaharashtraLawAndOrder, #MaharashtraTraffic, #MaharashtraHealth, #MaharashtraDevelopment, #RuralMaharashtra, #Mahawani, #MahawaniNewHub, #MahawaniNews, #MaharashtraCulture, #MaharashtraFestivals, #MaharashtraSports, #MaharashtraInfrastructure, #MaharashtraTourism, #MaharashtraUpdates, #MaharashtraGovt, #MaharashtraTechnology, #MaharashtraEnvironment, #MumbaiNews, #PuneNews, #NagpurNews, #NashikNews, #AurangabadNews, #KolhapurNews, #ThaneNews, #SolapurNews, #SataraNews, #RaigadNews, #NandedNews, #AmravatiNews, #AhmednagarNews, #JalgaonNews, #YavatmalNews, #LaturNews, #DhuleNews, #BeedNews, #JalnaNews, #BhandaraNews, #WardhaNews, #OsmanabadNews, #PalgharNews, #SindhudurgNews, #RatnagiriNews, #ParbhaniNews, #WashimNews, #GondiaNews, #HingoliNews, #AkolaNews, #BuldhanaNews, #firingchandrapur #rajura #chandrapur #maharashtra #Crime #ballarpur #ghughus #हॉटेल शही दरबार मध्ये हाजी सरवर शेख यांची हत्या

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top