Rashtrasant Tukdoji Maharaj | राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी पेटवली स्वातंत्र्याची ज्योत

Mahawani
1 minute read
0

 

आगस्ट क्रांती पर्वानिमित्त श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सामुदायिक प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी पेटवली स्वातंत्र्याची ज्योत
प्राथना करता वेळीचे छायाचित्र

  • महावाणी : विर पुणेकर
  • ११ ऑगस्ट २०२४

राजुरा : श्रीगुरुदेव सेवा मंडळ, सहकार नगर रामपूरच्या वतीने "आगस्ट क्रांती पर्व" निमित्त सामुदायिक प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव राजूरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीता जीवन विकास परीक्षा, तालुका प्रमुख, मोहनदास मेश्राम यांची उपस्थिती होती. ( President Marotrao Rajurkar )


कार्यक्रमात मोहनदास मेश्राम यांनी महात्मा गांधी यांच्या "चलेजाव चळवळ आणि करो या मरो" या नाऱ्याला प्रतिसाद देत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले. वंदनीय महाराजांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा वापर करून, भजनांच्या माध्यमातून जनसामान्यात जागरूकता निर्माण केली. त्यांच्या प्रभावी भजनांमुळे ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध जनतेत लढण्याची ताकद निर्माण झाली आणि त्याच्या परिणामी चिमूर हे गाव १९४२ साली स्वतंत्र झाले. यामध्ये तुकडोजी महाराजांचे मोठे योगदान असल्याचे मेश्राम यांनी आवर्जून नमूद केले. ( Rashtrasant Tukdoji Maharaj )


अध्यक्ष मारोतराव राजूरकर यांनी आपल्या भाषणात जनसामान्यांवर होत असलेल्या ब्रिटिश अत्याचारातून सुटका करण्यासाठी महाराजांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या विचारांनी जनसमुदायात अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमात श्रीगुरुदेव सेवा मंडळच्या उपासक उज्वला धोबे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चौधरी यांनी केले, संचालन सुवर्णा चोखारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन देविदास वांढरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अनेक उपासक व उपासिकांनी परिश्रम घेतले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

#rajura #rampur #ShriGurudevSevaMandal #chandrapur #maharashtra #bhajan #kirtan #mahawani

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top