सोंडो ग्रामपंचायतिला राहिलेना गावकऱ्यांचे भान गावकरी शोधत आहे पाण्याचे स्थान.

 

आझाद फाउंडेशनचा तीव्र आंदोलनाचा इशारा, गावकऱ्यांमध्ये संताप


महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ मे २०२४

राजुरा/सोंडो : मागील एका आठवड्यापासून सोंडो गावात पाणी पुरवठा तसेच मागील पंधरा दिवसांपासून जल शुद्धीकरण यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने गावातील नागरिकांना मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची तथा महिलांना दैनंदिन घरेलू कामाकरिता भर उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होऊन पाण्या करिता वन वन करावी लागत आहे.

सदर गंभीर समस्येची आझाद फाउंडेशन राजुरा (Azad Foundation Rajura) तर्फे दखल घेण्यात आलेली असून मागील एका आठवड्यात चारदा या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ सय्यद (Asif Sayyad) हे ग्रामपंचायतीला आपल्या शिष्टमंडळ व गावकऱ्यांसोबत गेले असता ग्रामपंचायत प्रत्येक वेळी टाळे बंद अवस्थेत आढळून येत असून ग्रामसेविका दररोज ग्रामपंचायतिला हजेरी लावतात की नाही हा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे.

नुकतेच काल १० मे रोजी ग्रामपंचायत येथे निवेदन देण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत टाळे बंद अवस्थेत आढळून आली तसेच ग्रामसेविका निशा कालीवाले (Nisha Kaliwale) यांना आसिफ सय्यद यांनी सदर गंभीर समस्येवर पाठपुरावा करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी फोन केला असता त्यांच्याकडून उडवा उडवी चे उत्तर देत "आज पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल असे ग्रामसेविका यांच्या तर्फे आश्वासन देण्यात आले." असे असिफ सय्यद यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे. 

तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा !

जर आज पाणीपुरवठा नियमित प्रमाणे सुरू झाला नाही. तर आझाद फाउंडेशन, राजुरा तसेच समस्त गावकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा ग्रामसेविका यांना देण्यात आला.

यावेळी आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्यासोबत उपाध्यक्ष अक्षय डकरे, सचिव संतोष देरकर, यासोबत ग्रामपंचायतचे माजी सदस्य दादाजी उमरे, श्रीनिवास मिसलवार, सत्यपाल खोब्रागडे, डोमा घोटेकर, धनविजय झाडे, नितेश वडस्कर, अक्षय कालीवार, अमर असुटकर, बाबुराव मेश्राम, संतोष वडसकर, अमर वांढरे, रघुनाथ करमणकर, सिद्धांत उमरे, पत्रुजी गेडाम, व्यंकटेश आयलमेनवार, सुभाष वानखेडे, अरुण कांबळे, आशिष पुणेकर, शंकर मेश्राम, तथा मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते. (mahawani) (rajura) (grampanchyat sondo) (pani purwatha) (panchyat samiti rajura) (Jal Jeevan Mission)

  •  निशा कालीवले, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सोन्डो यांना भ्रमणध्वनी केला असता भ्रमणध्वनी स्वीकारला नाही.

To Top